ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मतदान यंत्रांबाबत जनजागृती मोहिम


नवी मुंबई, दि.20 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती मोहिम राबविण्याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेप्रमाणे दि.13 डिसेंबर 2018 पासून ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याप्रमाणे कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये अशा मोहिमांचे आयोजन प्रस्तावित करण्यात येत आहे. तसेच या अनुषंगाने या जनजागृती मोहिमेदरम्यान वापरण्यात येणारी मतदान यंत्रे व अधिकारी/कर्मचारी यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याबाबत कोकण विभागातील सर्व पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या जनजागृती मोहिमेत सहभागी होऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मतदान यंत्रांबाबत जास्तीत जास्त माहिती प्राप्त करावी असे आवाहन विभागीय महसूल आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी विभागातील सर्व मतदारांना केले आहे.


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक