Posts

Showing posts from February 18, 2018

संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23-  संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)श्रीधर बोधे यांनी  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसिलदार के.डी.नाडेकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी  आद ी   उपस्थित होते. 00000

दहावी, बारावी परिक्षा जिल्ह्यात मनाई आदेश जारी

अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.23- रायगड जिल्ह्यात उच्च माध्यमिक परीक्षा (इ.12 वी) दि. 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2018 पर्यंत व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) दि. 1 मार्च ते 24 मार्च 2018 या कालावधीत होणार असल्याने 21 फेब्रुवारी ते 24 मार्च  2018 या कालावधीत  परीक्षा केंद्र परीसरात मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.   उच्च माध्यमिक परीक्षा (इ.12 वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) च्या परीक्षाचे संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत यादृष्टीने ज्या ज्या ठिकाणी परीक्षाकेंद्र व वितरणकेंद्र आहेत.  त्या सर्व परीक्षा केंद्रावर व वितरणाचे ठिकाणी परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाहीचा भाग म्हणून परीक्षेच्या कालावधीत रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत (पोलीस उप आयुक्त नवी मुंबई कार्यक्षेत्र वगळून) परीक्षा वितरण व परीक्षा केंद्रावरील 100 मीटरच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये   जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी मनाई आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार परीक्षा वितरण क

जिल्ह्यात मनाई आदेश

अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.22- जिल्ह्यात दि.25 रोजी दोन व दि.27 रोजी 6 ग्रामपंचायतीच्या  सार्वत्रिक निवडणूक व 148 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक मतदान होणार आहे. तसेच आगामी सण उत्सव पर्व लक्षात घेता या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, म्हणून   जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत (पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र वगळून) दि. 7 मार्च पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) चे मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी रायगड अलिबाग यांनी लागू केले आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल असे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे. 0000

कौशल्य विकासातून उन्नती साधा-आयुक्त डॉ.जगदीश पाटील

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21:- आदिवासी युवक युवतींनी प्रशिक्षण केंद्रातून आपल्या आवडीप्रमाणे प्रशिक्षण घेऊन आपली कौशल्य विकसित करावी व रोजगार मिळवावा. यातून स्वतःची व राज्याची  उन्नती साधता येईल, असे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी आज कोठींबे ता. कर्जत येथे केले. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत नाग्या कातकरी प्रशिक्षण केंद्राचे कोठींबे ता.कर्जत येथे आज कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांच्या  हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्या ठमाताई पवार या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. यावेळी प्रधानमंत्री कौशल्य विकास समन्वयक दिल्ली आशिष भावे. कर्जत येथील प्रांताधिकारी दत्ता भडकवाड, तहसिलदार अविनाश कोष्टी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. पाटील म्हणाले की, आदिवासी तरुण-तरुणींनी येथे  प्रशिक्षण घेऊन आपले उदरनिर्वाह  साधन सक्षम करावे आणि महाराष्ट्राला विकसित करावे. आशिष भावे म्हणाले की, आदिवासी बांधवांनी लाकुड, वीटभट्टी किंवा मोलमजुरी हेच उपजिविकेचे मार्ग न ठेवता या केंद्राच्या माध्यमातून आपण कौशल्य विकास करुन रोजगार

रमाई घरकुल योजना:लाभ घेण्याचे आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21- शहरी भागात नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रामध्ये राहणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द संवर्गातील अल्प, अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी रमाई घरकुल (नागरी) योजना सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येत आहे. शहरी भागातील कच्चे, मातीचे, गवती छपरांची घरे असणाऱ्या तसेच नगरपरिषद, नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये स्वत:ची जागा असणाऱ्या गरजू व्यक्तींना सदर योजने अंतर्गत पक्के बांधकाम केलेले घर बांधून देणे असा या योजनेचा उद्देश आहे. बहुतांशी अनुसूचित लोक हे कच्चया घरामध्ये राहतात. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पक्के घर बांधणे शक्य होत नाही. तसेच नोकरीसाठी ग्रामीण भागातील बहुतांशी लोक शहराकडे आलेले आहेत. शहरामधील वाढत्या किंमतीमुळे तेथे ते स्वत:चे घर घेऊ शकत नाही. पर्यायाने त्यांना झोपडपट्टीमध्ये राहावे लागते. शहरी भागातील अनूसचित जातीच्या लोकांचे राहणीमान उंचवावे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घरांच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यासाठी शासनाने ही महत्वाकांक्षी योजना आखली आहे. पात्र लाभार्थ्यास रक्कम रु.2 लाख 50 ह

पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21-  राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण हे गुरुवार दि.22  रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे- गुरुवार दि. 22 रोजी सायं. सहा  वा. एलिफंटा (घारापुरी) येथे आगमन व एलिफंटा (घारापुरी) येथील नवीन आस्थापीत विद्युत व्यवस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- एलिफंटा (घारापुरी) लेणी परिसर. रात्री सात वा. एलिफंटा (घारापुरी) येथून स्पीड बोटीने गेट व ऑफ इंडिया, मुंबईकडे प्रयाण. 00000

ऊर्जा मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21- राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवार दि.22  रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे- गुरुवार दि. 22 रोजी सायं. सहा  वा. एलिफंटा (घारापुरी) येथे आगमन व एलिफंटा (घारापुरी) येथील नवीन आस्थापीत विद्युत व्यवस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- एलिफंटा (घारापुरी) लेणी परिसर. रात्री सात वा. एलिफंटा (घारापुरी) येथून स्पीड बोटीने गेट व ऑफ इंडिया, मुंबईकडे प्रयाण. 00000

निवृत्तीवेतन, कुटूंब लाभ योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19- संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत इंदिरागांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना व राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना या योजना शासनाकडून मंजूर करण्यात आल्या असून त्यांची तपशिलवार माहिती पुढीलप्रमाणे- इंदिरागांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेचा लाभ जास्तीत जास्त् लाभार्थ्यांना मिळण्याकरीता मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णयान्वये तसेच जिल्हाधिकारी रायगड यांचेकडील पत्राच्या अनुषंगाने शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य  विभागाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील   कुटूंबातील 80 टक्क्याहून जास्त अपंगत्व असलेले तसेच एक किंवा बहू अपंगत्व असलेले (दोन किंवा त्यापेक्षा  जास्त अपंगत्व) लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योनजेमध्ये निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र राहतील. अशा लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रक्कम रु. दोनशे व राज्य शासनाकडून रक्कम रु.चारशे असे एकूण सहाशे प्रतिमहा निवृत्तवेतन मिळेल. जर असे लाभार्थी असतील तर त्यांनी ताबडतोब तहसिल कार्यालय अल

अन्न पदार्थ व्यावसायिकांना परवाना नुतनीकरण, नोंदणी करण्याचे आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20:- जिल्ह्यातील सर्व अन्न पदार्थ व्यावसायिकांना आपले परवाना नुतनीकरण व नोंदणी करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न)अन्न  व औषध प्रशासन म.रा. पेण रायगड यांनी केले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,किराणा, घाऊक विक्रेते,वितरक, किरकोळ विक्रेते, उत्पादक,हॉटेलचालक, रेस्टॉरंट चालक, पान शॉपधारक, दुध,मांस विक्रेते,अन्ने पदार्थ वाहतुकदार व इतर अन्न पदार्थ व्यावसायिकांना  अन्न सुरक्षा व मानदे कायदा-2006 नुसार परवाना अथवा नोंदणी  करुनच व्यवसाय करणे बंधनकारक आहे. विना परवाना अथवा नोंदणी व्यवसाय करणे गुन्हा असून कलम 63 नुसार 6 महिन्यापर्यंत शिक्षा व 5 लाख रुपये दंड होऊ शकतो. उत्पादक,वितरक व घाऊक विक्रेते यांना परवाना अट क्र.14 नुसार विमा परवाना अथवा नोंदणी धारकास अन्न पदार्थांची विक्री करणे किंवा विना परवाना अथवा नोंदणी धारकाकडून अन्न पदार्थांची खरेदी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. अन्न पदार्थ व्यावसायिकांना परवाना चे नुतनीकरणासाठी योग्य् त्या शुल्कासह दि.31 मार्च 2018 पूर्वी अन्न् व औषध  प्रशासन म.रा.रायगड पेण कार्यालयातून परवाना अथवा

रोह्यातील सर्व उद्योगांचे महिनाभरात सेफ्टी ऑडिट पूर्ण करा- पालकमंत्री चव्हाण यांचे निर्देश

Image
             अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20- रोहा औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजे 44 उद्योगांचे अग्निसुरक्षेसह सर्व प्रकारचे सेफ्टी ऑडीट येत्या महिनाभरात पूर्ण करा, असे निर्देश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आज रोहा येथे दिले.             रोहा येथील अँथिया डीआरटी ॲरोमॅटिक प्रा. लि. कंपनीला लागलेली भीषण आग आणि त्यानंतर झालेल्या आपद्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पालकमंत्री चव्हाण यांनी आज सकाळी रोहा येथील विश्रामगृहावर सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, आ. अवधूत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, मुंबई येथील एमआयडीसीचे अग्निशमन अधिकारी मिलिंद ओगले, औद्योगिक सुरक्षा  व आरोग्य संचालनालयाचे सह संचालक एस.पी ऱाठोड, उपसंचालक  विक्रम काटमवार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वाघमारे, भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी तसेच स्थानिक प्रांताधिकारी, तहसिलदार आदी अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्

छत्रपती शिवाजी महाराजांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.19 (जिमाका)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला व अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

प्रधानमंत्र्यांना दिले 'राजधानी रायगड' पुस्तक भेट

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.19 (जिमाका)- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूमिपूजन समारंभासाठी हेलिपॅडवर आगमन झाले, त्यावेळी त्यांच्या स्वागतप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी  'राजधानी रायगड' हे पुस्तक भेट दिले. यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, आ.मंदा म्हात्रे. नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी मान्यवर उपस्थित होते.  'राजधानी रायगड' हे पुस्तक कॉफी टेबल बुक स्वरुपात  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय माहिती कार्यालयामार्फत प्रकाशित करण्यात आले होते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमीपूजन 2022 पर्यंत पायाभूत सुविधा उभारणीमुळे मुंबई, महाराष्ट्राचा फायदा

Image
नवी मुंबई,दि.18:-   मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या वेगाने पायाभूत सुविधांची कामे सुरु आहेत, ते पाहता 2022 पर्यंत मोठा विकास झालेला आपण पाहाल, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी राज्यातील विकास कामांच्या अंमलबजावणीची प्रशंसा केली. हवाई वाहतूक आणि जल वाहतूक क्षेत्रातही झपाट्याने विकास होत असून यामुळे देशाला जागतिकीकरणाचा खरा लाभ मिळेल. मुंबईमधील जल, भूमि आणि आकाश अशा ठिकाणी सुरु असलेल्या विविध कामांमुळे खऱ्या अर्थाने विकास होईल, त्याचप्रमाणे शिवरायांचे प्रेरणा देणारे स्मारक देखील समुद्रात उभे राहिलेले असेल, असेही ते म्हणाले. नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्र्स्टच्या  चवथ्या कंटेनर टर्मिनलचे लोकार्पण इलेक्ट्रॉनिक पध्दतीने कळ दाबून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उलवे गावाजवळील कोंबडभुजे येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भव्य मैदानावर आयोजित या शानदार सोहळ्यास राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग, नौकानयन व ज