अन्न पदार्थ व्यावसायिकांना परवाना नुतनीकरण, नोंदणी करण्याचे आवाहन


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20:- जिल्ह्यातील सर्व अन्न पदार्थ व्यावसायिकांना आपले परवाना नुतनीकरण व नोंदणी करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न)अन्न  व औषध प्रशासन म.रा. पेण रायगड यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,किराणा, घाऊक विक्रेते,वितरक, किरकोळ विक्रेते, उत्पादक,हॉटेलचालक, रेस्टॉरंट चालक, पान शॉपधारक, दुध,मांस विक्रेते,अन्ने पदार्थ वाहतुकदार व इतर अन्न पदार्थ व्यावसायिकांना  अन्न सुरक्षा व मानदे कायदा-2006 नुसार परवाना अथवा नोंदणी  करुनच व्यवसाय करणे बंधनकारक आहे. विना परवाना अथवा नोंदणी व्यवसाय करणे गुन्हा असून कलम 63 नुसार 6 महिन्यापर्यंत शिक्षा व 5 लाख रुपये दंड होऊ शकतो. उत्पादक,वितरक व घाऊक विक्रेते यांना परवाना अट क्र.14 नुसार विमा परवाना अथवा नोंदणी धारकास अन्न पदार्थांची विक्री करणे किंवा विना परवाना अथवा नोंदणी धारकाकडून अन्न पदार्थांची खरेदी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. अन्न पदार्थ व्यावसायिकांना परवाना चे नुतनीकरणासाठी योग्य् त्या शुल्कासह दि.31 मार्च 2018 पूर्वी अन्न् व औषध  प्रशासन म.रा.रायगड पेण कार्यालयातून परवाना अथवा नोंदणी घेऊनच आपला व्यवसाय करावा व विना परवाना अथवा नोंदणी व्यवसाय करु नये.
 तसेच सर्व व्यावसायिकांच्या सोईसाठी महाराष्ट्र शासनाने परवाना अथवा नोंदणीकरीता ऑनलाईन सुविधा नवीन परवाना अथवा नोंदणी करीता योग्य त्या कागदपत्रासह नुतनीकरणाकरीता www.foodlicensing.fssai.gov.in  या  संकेत स्थळावर अर्ज सादर करावेत. तसेच परवाना शुल्क भरुन शुल्क भरल्याबाबतची प्रत नुतनीकरणाच्या अर्जासोबत www.mahakosh gov.in या संकेतस्थळावर सादर करावी.
अधिक माहितीसाठी प्रशासनाचा टोल फ्रि क्रमांक 1800222365 अथवा 02143-252085 कार्यालयीन दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे सहाय्यक आयुक्त (अन्न)अन्न  व औषध प्रशासन म.रा. पेण दि.तु.संगत, यांनी आवाहन केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक