Posts

Showing posts from December 11, 2022

18 डिसेंबर-अल्पसंख्यांक हक्क दिवस

                   दि.18 डिसेंबर…सर्वप्रथम सर्व अल्पसंख्यांक बंधू-भगिनींना आजच्या अल्पसंख्यांक हक्क दिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा…! संयुक्त राष्ट्र संघटनेने दि.18 डिसेंबर, 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्विकृत करुन प्रस्तृत केला आहे. त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावे तसेच याबाबतच्या वैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी, यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रतिवर्षी दि.18 डिसेंबर हा दिवस राज्यपातळीवर  “ अल्पसंख्याक हक्क दिवस ”  म्हणून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत राबविण्यात येतो, साजरा करण्यात येतो.                 या निमित्ताने पुढील लेखातून समजून घेवू या…या विषयाबाबतची अधिक माहिती….!      केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय, नवी दिल्ली-             दि.2 जानेवारी 2006 रोजी अल्पसंख्यांक मंत्रालयाने मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी आणि जैन या अधिसूचित अल्पसंख्यांकांच्या प्रश्नांशी संबंधित अधिक लक्ष क

धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता दि.20 डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ

    अलिबाग, दि.16 (जिमाका) :-  खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता दि.15 डिसेंबर 2022 अखेर पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि ऑनलाईन पोर्टलवरील माहितीनुसार, मागील हंगामाचा विचार करता शेतकरी नोंदणी पुरेशी झाली नाही.   त्यामुळे पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता दि.20 डिसेंबर 2022 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.    चालू हंगामामध्ये पुरेशा प्रमाणावर शेतकरी नोंदणी व्हावी, याकरिता यापूर्वी सूचित केल्यानुसार आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता नोंदणी सुरू झाली आहे, असे पणन विभागाचे कक्ष अधिकारी विजय मोरे यांनी कळविले आहे 0000000

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तारांकित, अतारांकित प्रश्नांबाबत सर्व शासकीय विभागांनी अभ्यासपूर्वक माहिती तयार ठेवावी -- पालकमंत्री उदय सामंत

  अलिबाग,दि.15 (जिमाका):-    लवकरच नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे.  या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याशी संबंधित असलेल्या तारांकित/अतारांकित प्रश्नांबाबत सर्व शासकीय विभागांनी अधिकृत माहिती अभ्यासपूर्वक तयार ठेवावी, असे राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचित केले.  हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त तारांकित/अतारांकित संदर्भांबाबतची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अलिबाग उपवनसंरक्षक अधिकारी आशिष ठाकरे, रोहा उपवनसंरक्षक अधिकारी आप्पासाहेब निकत, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील तसेच विविध शासकीय विभागांचे विभाग प्रमुख तसेच कार्यालय प्रमुख उपस्थित होते.   यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित अधिकाऱ्य

निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत हद्दीत कलम 144 प्रमाणे मनाई आदेश जारी

    अलिबाग,दि.15(जिमाका) :-  ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यामुळे दि.09 नोव्हेंबर 2022 रोजीपासून आचारसंहिता अंमलात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत, परिमंडळ 2 मधील पनवेल तहसिल विभागातील पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंध्रण, भाताण, कानपोली, केळवणे, नेरे, दिघाटी पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत शिरढोण, शिवकर, करंजाडे, तळोजा पोलीस ठाणे हद्दीत नितळस ग्रामपंचायत तसेच उरण तहसिल विभागातील उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राणसई, पुनाडे, सारडे, नवीन शेवा, धुतूम, कळंबुसरे, बोकडविरा, वशेणी, पागोटे, पिरकोन, चिलें, भेंडखळ, नवघर न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाणजे, डोंगरी, करळ, जसखार, मोरासागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घारापुरी या एकूण 28 ग्रामपंचायतीमधील निवडणूका होणार असून दि. 18 डिसेंबर 2022

ई-चावडी, ई-फेरफार व ई-हक्क प्रणालीबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न ई-चावडी प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित करण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्धार

Image
  अलिबाग,दि.15(जिमाका) :-  ई-चावडी प्रकल्पांतर्गत ई-चावडी प्रणाली विकसनाचे कामकाज असून अष्टसूत्री कामकाज पूर्ण असणाऱ्या गावांचा समावेश ई-चावडी प्रकल्पात करता येणार आहे. जिल्ह्यात प्रथम भाग अद्ययावतीकरण पूर्ण असणारी गावे निश्चित करणे आवश्यक आहे, जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यात ई-चावडी प्रकल्प कार्यान्वित करता येईल. या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार बुधवार, दि.14 डिसेंबर 2022 रोजी रिलायन्स टाऊनशिप नागोठणे येथे ई-चावडी, ई-फेरफार व ई-हक्क प्रणाली जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न झाले.    यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा राज्य संचालक, ई फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे श्रीमती सरिता नरके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी तथा DDE, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व नायब तहसिलदार (ई फेरफार), व प्रत्येक तालुक्यातील उत्कृष्ट कामकाज करणारे प्रत्येकी 2 तलाठी व 2 मंडळ अधिकारी आदि उपस्थित होते.      या बैठकीत ई-फेरफार व नव्याने विकसित ई-हक्क आज्ञावलीबाबत प्रशिक्षण व चर्चा  झाली. या बैठकीसाठी प

पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत — पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह

    अलिबाग,दि.15(जिमाका) :-  विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक/शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असलेल्या शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्ष ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू करण्यात आली आहे. आता याबरोबर जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी ही संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत इच्छुकांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन   पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. विविध

गोवर रुबेला लसीकरण विशेष मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे

  अलिबाग,दि.15(जिमाका) :-  जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून गोवर रुबेला लसीकरणासाठी दि.15 ते 25 डिसेंबर 2022 आणि दि.15 ते दि.25 जानेवारी 2023 या कालावधीत जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबविली जाणार आहे. या विशेष मोहिमेत आरोग्य विभागाकडून दि.26 जानेवारी 2023 पर्यंत सर्व लाभार्थी मुलांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून लसीकरण करण्यासाठी जिल्ह्यामध्ये पथके कार्यरत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे व जिल्हा माताबालसंगोपन अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी दिली आहे. या मोहिमेत 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील डोस देण्याचे राहिलेल्या मुलांना घरोघरी सर्वेक्षण करून नजिकच्या लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे.  यामध्ये शिल्लक राहिलेला पहिला किवा दुसरा डोस देण्यात येणार आहे.  त्यानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून पूर्व तयारी करण्यात आली आहे.  तसेच जिल्ह्यात 74 विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहेत.  त्याचप्रमाणे नियमित 1 हजार 760 लसीकरण सत्रामध्ये गोवर लसीकरण केले जाईल. या सर्वेक्षणात जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे एकूण 9 महिने ते 5 वर्षाच्या आतील डो

जुने टायर, इनर्व्हटर, इनर्व्हटर बॅटरी विक्रीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

  अलिबाग,दि.15 (जिमाका) :-  जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग या कार्यालयातील चारचाकी वाहनाचे जुने, निकामी एकूण 7टायर (मोठे-6 टायर, लहान-1 टायर) तसेच जुने नादुरुस्त इर्न्व्हटर नग-1, इर्न्व्हटर बॅटरी 2 नग यांची विक्री करावयाची आहे. त्यासाठी स्थानिक विक्रेत्यांनी आपली दरपत्रके बंद लिफाप्यात दि.23 डिसेंबर 2022 पर्यंत जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशेजारी, अलिबाग येथे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे. 00000

बारदानसाठा घेऊ इच्छिणाऱ्यांनी मोहोरबंद निविदा सादर कराव्यात--जिल्हा पुरवठा कार्यालय

अलिबाग,दि.15(जिमाका) :-  रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नमूद केलेल्या शासकीय गोदामांतून प्रत्येक गोदामांसमोर दर्शविल्याप्रमाणे उपयोगी/निरुपयोगी व तुकडा बारदानाचा साठा जसा असेल तसा व जेथे असेल तेथून या तत्वावर निविदा पध्दतीने विक्रीस काढण्यात आला आहे. हा बारदान साठा घेऊ इच्छिणाऱ्यांकडून मोहोरबंद निविदा मागविण्यात आल्या आहेत. विक्रीस काढलेल्या बारदान साठ्याचा तपशिल (अपसेट प्राईजसह) पुढीलप्रमाणे-- अलिबाग येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 2 हजार 149 किलो,  निरुपयोगी   बारदाने (नग)ज्यूट 4 हजार 443 किलो. पोयनाड येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 775 किलो,  निरुपयोगी   बारदाने (नग)ज्यूट 1899 किलो. पेण येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 7 हजार 822 किलो,  निरुपयोगी   बारदाने (नग)ज्यूट 1 हजार 684 किलो, तुकडा ज्यूट 246 किलो. मुरुड येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 1 हजार 826 किलो,  निरुपयोगी   बारदाने (नग) ज्यूट 2 हजार 673 किलो. माणगाव येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 2 हजार 5 किलो,  निरुपयोगी   बारदाने (नग) ज्यूट 6 हजार 351 किलो. गोरेगाव येथील गोदामात उपयोगी बारदान

प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षय मित्र बनविण्यासाठी औद्योगिक वसाहतींना भेटी

  अलिबाग,दि.15(जिमाका) :-  प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षय मित्र बनविण्यासाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वंदनकुमार पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद रोकडे यांनी औद्योगिक वसाहतींना भेटी दिल्या. दि.14 डिसेंबर 2022 रोजी खालापूर येथील वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्र,व खोपोली अंतर्गत असलेल्या औद्योगिक वसाहतींना भेटी देऊन त्यांना निक्षय मित्र बनवून क्षय रुग्णांना त्यांचे उपचार सुरू असेपर्यंत दत्तक घेऊन, त्यांना पोषक आहार देण्यासाठी माहिती देण्यात आली. गोदरेज कंपनी लि. चे श्री. तानाजी चव्हाण यांनी याबाबतचा सविस्तर प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर मंजूरीकरिता दिला आहे, तसेच जास्तीत जास्त क्षयरुग्णांना निक्षय मित्र साहाय्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले असून अत्याधुनिक तंत्रज्ञानासह असलेली Trunaat मशीनही मंजूर होईल, असेही त्यांनी सांगितले. या मशीनचा उपयोग खालापूरवासियांना होईल. खालापूरमधील क्षयरुग्णांना तपासणीसाठी व अहवालासाठी इतरत्र कोठेही जाण्याची आवश्यकता भासणार नाही, आता ती सुविधा जवळच्याच आरोग्य केंद्रात उपलब्ध होईल, अशी माहिती त्यांनी दिली.  याबाबत जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.

जिल्हा प्रशासनाकडून आयोजित कबड्डी चषक स्पर्धेतील विजेत्या संघांना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न पुरुष गटात पांडवादेवी,रायवाडी तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स,पनवेल अंतिम विजेते

Image
    अलिबाग,दि.15 (जिमाका) :-  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली  बुधवार, (दि.14 डिसेंबर 2022) रोजी पी.एन.पी. महाविद्यालय, वेश्वी, अलिबाग येथील क्रीडांगणावर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने रायगड जिल्हा प्रशासनाकडून आयोजित कबड्डी चषक स्पर्धा अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाली. सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी(सा.प्र.) सर्जेराव म्हस्के पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा प्रशासन अधिकारी श्याम कोशेट्टी, तहसिलदार विशाल दौंडकर, डॉ.सतिश कदम, केदार शिंदे, जगन्नाथ वरसोलकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, पीएनपी महाविद्यालयाचे विद्यार्थी, कर्मचारी  आदी उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:- महिला गट- प्रथम - कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल ,  द्वितीय -  भिल्लेश्र्वर क्रीडा मंडळ, किहीम, तालुका अलिबाग ,  तृतीय - टाकदेवी क्रीडा मंडळ, मांडवा, तृती

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन,डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता इच्छुकांनी अर्ज करावेत

  अलिबाग,दि.14(जिमाका): मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय , नौकानयन , डिझेल इंजिन देखभाल व परिचालन या प्रशिक्षणाच्या दि.01 जानेवारी 2023 पासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र रायगड-अलिबाग येथे सुरु होणा ऱ्या प्रशिक्षण सत्रासाठी रायगड जिल्ह्यातील युवकांकडून दि.31 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. या प्रशिक्षणां तर्गत प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण केंद्राच्या 57 फूट लांबी असलेल्या 63.35 टनेज क्षमतेच्या सिलेंडर संख्या 6 व 205   अश्वशक्तीचे इं जि न असलेल्या "मत्स्यप्रबोधिनी" नोंदणी क्र. IND-MH- 3- MM- 4266 या प्रशिक्षण नौकेद्वारे सागरी सफरीवर नेऊन प्रात्यक्षिक व सिध्दांतिक ज्ञान दिले जाणार आहे. त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे- प्रशिक्षण कालावधी दि. 01 जानेवारी 202 3 ते दि.30 जून 202 3 ( 6 महिने) आवश्यक   पात्रता- उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे , ( आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे), उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक , ( शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे), क्रियाशील मच्छिमार व किमा

पोलादपूर येथील मोरगिरी पिकनिक पॉईंट येथे कातकरी आदिवासी बांधवासाठी शिबीर संपन्न

Image
  अलिबाग,दि.14(जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली  महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांच्या अध्यक्षतेखाली पोलादपूर येथील मोरगिरी पिकनिक पॉईंट येथे श्रमजीवी संघटना महाड यांच्या सहाय्याने कातकरी आदिवासी बांधवासाठी  (दि.13 डिसेंबर 2022) रोजी शिबीर संपन्न झाले.  यावेळी तहसिलदार पोलादपूर श्रीमती दिप्ती देसाई , गटविकास अधिकारी धनंजय बी.जगताप, वैद्यकीय अधिकारी, निवडणूक नायब तहसिलदार, आदिवासी विकास विभाग, पेण  या कार्यालयाचे अधिकारी, श्रमजीवी संघटनेचे श्री.विठ्ठल कोळेकर तसेच इतर शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.   यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाकडील योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना सांगितली. या शिबिरात उपस्थित कातकरी आदिवासी बांधवांना 10 शिधापत्रिका, 36 निवडणूक (नवीन नाव नोंदणी), 3 लाभार्थ्यांना संजय गांधी योजना लाभ, ई-श्रम पोर्टलवर 31 जणांची नोंदणी, 51 दाखले वाटप,  23 उत्पनाचे दाखले, 28 जातीचे दाखले वाटप करण्यात  आले.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनामार्फत कबड्डी चषक स्पर्धेचे उत्साहात आयोजन “आपली माती-आपला खेळ, ले पंगा-खेल कबड्डी” घोषणांनी दुमदुमले पीएनपी महाविद्यालयाचे मैदान

    अलिबाग,दि.14(जिमाका):-   , जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली   बुधवार, दि. 14 डिसेंबर 2022 रोजी पी.एन.पी. महाविद्यालय, वेश्वी,   अलिबाग येथील क्रीडांगणावर रायगड जिल्हा प्रशासनाने आयोजित आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने   कबड्डी चषक स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह ॲड. आस्वाद पाटील, श्रीमती चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ राष्ट्रीय कबड्डीपट्टू श्री.दिलीप धुमाळ, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी यांच्या हस्ते मैदानावर श्रीफळ वाढवून संपन्न झाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्के-पाटील, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा प्रशासन अधिकारी श्याम पोशट्टी, तहसिलदार विशाल दौंडकर, पीएनपी महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, सीईओ संजय मिरजी, प्राचार्य डॉ.ओंकार पोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी सचिन निकम, रायगड जिल्हा कबड्डी अ

जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांची दूरदृष्टी आपदा मित्रांच्या पहिल्या 50 जणांच्या तुकडीचे सुरु झाले आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर

              अलिबाग,दि.14(जिमाका):-   राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,नवी दिल्ली यांच्याकडून राज्यातील 20 जिल्ह्यामध्ये आपदा मित्रांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकाराने रायगड जिल्ह्यातून 300 आपदा मित्रांच्या प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे.   त्यापैकी पहिल्या 50 जणांच्या तुकडीचे 12 दिवसांच्या प्रशिक्षण वर्गास काल दि.23 डिसेंबर 2022 रोजी महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह चवदार तळे येथे सुरु झाले.याचे उद्घाटन महाड प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांच्या हस्ते संपन्न झाले.   यावेळी महाड तहसिलदार सुरेश काशिद, नायब तहसिदार काशिनाथ तिरमिळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, नागरी संरक्षण दलाचे सहाय्यक उपनियंत्रक शशिकांत शिरसाट, काशिनाथ कुरकूटे, समाधान कडू, गणेश पाटील यांची उपस्थिती होती.   रायगड जिल्ह्यात नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तींमध्ये होत असलेली वाढ पाहता अशा प्रकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमा

इतर मागासवर्गीय घटकांना न्याय देण्यास कटिबध्द -- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग

Image
  अलिबाग,दि.13(जिमाका):-  भारतीय संविधानाने समाजातील दुर्बल घटकांना सबल घटकांच्या बरोबरीने विकासाची संधी दिली आहे. याच अनुषंगाने विमुक्त जाती,  भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने काय उपाययोजना कराव्यात, याचा अभ्यास व परिक्षण करुन याविषयीची माहिती दोन्ही सभागृहांना सादर करण्यास महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग कटिबध्द आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य ॲड.श्री.बालाजी किल्लारीकर(उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ) यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य रायगड जिल्हा दौऱ्यावर आले असून जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.                    यावेळी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य श्री. ज्योतीराम चव्हाण (निवृत्त सहसचिव,मंत्रालय),  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव, जातपडताळणी  समिती, रायगड उपायुक्त श्री.वासुदेव पाटील, संशोधन अधिकारी रविकिरण पाटील व विविध शासकीय विभागांचे कार्य