बारदानसाठा घेऊ इच्छिणाऱ्यांनी मोहोरबंद निविदा सादर कराव्यात--जिल्हा पुरवठा कार्यालय


अलिबाग,दि.15(जिमाका) :- रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नमूद केलेल्या शासकीय गोदामांतून प्रत्येक गोदामांसमोर दर्शविल्याप्रमाणे उपयोगी/निरुपयोगी व तुकडा बारदानाचा साठा जसा असेल तसा व जेथे असेल तेथून या तत्वावर निविदा पध्दतीने विक्रीस काढण्यात आला आहे. हा बारदान साठा घेऊ इच्छिणाऱ्यांकडून मोहोरबंद निविदा मागविण्यात आल्या आहेत. विक्रीस काढलेल्या बारदान साठ्याचा तपशिल (अपसेट प्राईजसह) पुढीलप्रमाणे--

अलिबाग येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 2 हजार 149 किलो, निरुपयोगी  बारदाने (नग)ज्यूट 4 हजार 443 किलो. पोयनाड येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 775 किलो, निरुपयोगी  बारदाने (नग)ज्यूट 1899 किलो.

पेण येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 7 हजार 822 किलो, निरुपयोगी  बारदाने (नग)ज्यूट 1 हजार 684 किलो, तुकडा ज्यूट 246 किलो.

मुरुड येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 1 हजार 826 किलो, निरुपयोगी  बारदाने (नग) ज्यूट 2 हजार 673 किलो.

माणगाव येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 2 हजार 5 किलो, निरुपयोगी  बारदाने (नग) ज्यूट 6 हजार 351 किलो. गोरेगाव येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 851 किलो, निरुपयोगी  बारदाने (नग) ज्यूट 1 हजार 393 किलो.

रोहा येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 630 किलो, निरुपयोगी  बारदाने (नग) ज्यूट 7 हजार 863 किलो, तुकडा ज्यूट 989 किलो.

सुधागड येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 1 हजार 663 किलो, निरुपयोगी  बारदाने (नग) ज्यूट 3 हजार 604 किलो.

तळा येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 1 हजार 190 किलो, निरुपयोगी  बारदाने (नग)ज्यूट 893 किलो.

महाड येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 415 किलो, निरुपयोगी बारदाने (नग) ज्यूट 597 किलो. बिरवाडी येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 542 किलो, निरुपयोगी  बारदाने (नग) ज्यूट 918 किलो. 

म्हसळा येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 951 किलो, निरुपयोगी  बारदाने (नग) ज्यूट 3 हजार 256 किलो.

पोलादपूर येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 1 हजार 316 किलो, निरुपयोगी बारदाने (नग) ज्यूट 2 हजार 773 किलो.

श्रीवर्धन येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 1 हजार 452 किलो, निरुपयोगी  बारदाने (नग) ज्यूट 1 हजार 782 किलो.

पनवेल येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 2 हजार 400 किलो, निरुपयोगी  बारदाने (नग)ज्यूट 16 हजार 557 किलो.

उरण येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 2 हजार 178 किलो, निरुपयोगी  बारदाने (नग) ज्यूट 3 हजार 840किलो. 

कर्जत येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 1 हजार 517 किलो, निरुपयोगी  बारदाने (नग) ज्यूट 2 हजार 982किलो. खोपोली येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 380 किलो, निरुपयोगी  बारदाने (नग) ज्यूट 4 हजार 164 किलो. चौक येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 1 हजार 333 किलो, निरुपयोगी  बारदाने (नग) ज्यूट 1 हजार 637 किलो.  कशेळे येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 466 किलो, निरुपयोगी  बारदाने (नग) ज्यूट 2 हजार 919 किलो. नेरळ/माथेरान येथील गोदामात उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 705 किलो, निरुपयोगी  बारदाने (नग) ज्यूट 2 हजार 102 किलो,  असे एकूण उपयोगी बारदाने (नग) ज्यूट 32 हजार  566 किलो, निरुपयोगी  बारदाने (नग) ज्यूट 74 हजार 330 किलो,  तुकडा ज्यूट 1 हजार 235 किलो  विक्रीसाठी उपलब्ध आहे.

या बारदानांची अपसेट किंमत उपयोगी बारदाने प्रति नग रुपये 11.25, निरुपयोगी  बारदाने  प्रति नग रु.5.25  तर  तुकडा ज्यूट प्रति किलो रु.2.25 इतकी आहे.

बारदान साठा खरेदी प्रक्रियेसाठी निविदा भरताना निविदाधारकाने नमूद अपसेट किंमती एवढे दर अथवा त्यापेक्षा जास्त दर निविदेमध्ये नमूद करणे आवश्यक आहे. ज्या निविदाधारकांच्या निविदेमध्ये अपसेट दरापेक्षाही कमी दर दर्शविले असल्यास त्या निविदाधारकाची निविदा रद्द करण्यात येईल.

याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा. बारदान साठा घेऊ इच्छिणाऱ्या निविदाधारकांनी विहीत वेळेत आपल्या मोहरबंद निविदा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, अलिबाग येथे सादर कराव्यात, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक