Posts

Showing posts from December 31, 2023

शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची तयारी पूर्ण पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी

Image
  रायगड (जिमाका) दि.4 :-  ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत माणगाव तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम उद्या शुक्रवार दि.5 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित होत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी आज भेट देवून तयारीची पाहणी केली.        यावेळी आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.     पालकमंत्री श्री.सामंत यांनी व्यासपीठ, सभा मंडप, लोकप्रतिनिधींची व मान्यवर बैठक व्यवस्था त्याचबरोबर लाभार्थ्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग, बैठक व्यवस्था, जिल्ह्यातील सरपंचांची बैठक व्यवस्था, शासकीय विभागांमार्फत लावण्यात येणारे विविध स्टॉल, रोजगार मेळावा, कृषी प्रदर्शन, आरोग्य शि‍बिर स्थळ, पोलीस बंदोबस्त, वाहतुकीचे नियोजन आदींची पाहणी केली.      पालकमंत्री म्हणाले, राज्यात प्रथ

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
         अलिबाग, दि. 3 (जिमाका):- भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आद्यशिक्षिका आणि महान समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हा निवडणूक अधिकारी  श्रीमती स्नेहा उबाळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.       यावेळी तहसीलदार (सा.प्र.)उमाकांत कडनोर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील  कर्मचारी उपस्थित होते. 000000

शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या अनुषंगाने 5 जानेवारी रोजी वाहतूकीत बदल

  रायगड (जिमाका)दि.3:   रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे 5 जानेवारी रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी'  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जारी केले आहेत . शासन आपल्या दारी या कार्यक्रमाकरीता मोठ्या संख्येने जनसमुदाय, कार्यकर्ते येणार असून सुमारे 2 हजार बसेस व इतर लहान मोठी वाहने घेवून उपस्थित राहणार आहेत.  त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम सुस्थितीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून उपाय योजना म्हणून दि.05 जानेवारी 2024 रोजी 00.01 वाजल्यापासून दि.05 जानेवारी 2024 रोजी रात्रौ 23.00 वाजेपर्यतच्या कालावधीत दूध, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे. ऑक्सीजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना वगळून इतर सर्व जड-अवजड वाहनांना मुंबई गोवा महामार्ग क्र.66 या महामार्गावरु

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील युवक-युवतींनी नोंदणी करावी

  रायगड(जिमाका)दि.02  :-  जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2024 ,  फ्रान्स (ल्योन) येथे होणार असून   या स्पर्धेमध्ये भारतातील प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध 52 क्षेत्रामध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी महास्वयं वेबपोर्टलवर नोंदणी करावी ,  असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त श्रीम. अ.मु.पवार  यांनी केले आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2024 ,  फ्रान्स (ल्योन) येथे होणार असून याकरिता जिल्हा ,  विभाग ,  राज्य आणि देशस्तरावर स्पर्धा घेतली जाणार असून याद्वारे गुणवान कौशल्य धारक पात्र स्पर्धक निवडले जाणार आहेत. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि ही जगातील सर्वांत मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्ठता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलम्पिक खेळासारखीच आहे. यापूर्वी 46 जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये 62 सेक्टर मधून 50 देशातील 10 हजार उमेदवार समाविष्ट असून ही स्पर्धा 15 देशात 12 आठवड्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या पुढील जागतिक कौशल्य 202

नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावीची प्रवेश परीक्षा दि.20 जानेवारी रोजी

    रायगड(जिमाका)दि.02  :-  निजामपूर, ता.माणगाव येथील पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयाची इयत्ता सहावीसाठी प्रवेश परीक्षा 20 जानेवारी 2024 रोजी जिल्हयातील एकूण 15 तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर होणार आहे. संबंधित उमेदवारांनी त्यासाठीचे प्रवेशपत्र  https://cbseitms.rcil.gov.in/ nvs/AdminCard/AdminCard  व  https://navodaya.gov.in  या वेबसाईटवरुन डाउनलोड करुन घ्यावेत, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य  के. वाय. इंगळे यांनी दिली आहे. रायगड जिल्हयातील 15 परीक्षा केंद्रांवर 2 हजार 39 विद्यार्थी यावेळी इयत्ता 6 वी वर्ग पात्रता परीक्षेसाठी बसत आहेत. एकूण 80 जागांसाठी यातून विद्यार्थी निवडले जाणार असून परीक्षा पात्र विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांच्या रजिस्ट्रेशन क्रमांकासह परीक्षा ओळखपत्रे  https://cbseitms.rcil.gov.in/ nvs/AdminCard/AdminCard  व  https://navodaya.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. विद्यार्थी रजिस्ट्रेशन क्रमांक (USER ID) आणि विद्यार्थी जन्मतारीख हे ओळखपत्राचे पासवर्ड असणार आहेत. सर्व परीक्षार्थीनी दि. 20 जानेवारी रोजी सकाळी ठिक 10 वा. परीक्षा केंद्

01 डिसेंबर जागतिक एड्स दिन व पंधरवडा निमित्त आरोग्य व रक्त तपासणी शिबिर संपन्न

Image
    रायगड(जिमाका)दि.01:-    प्रकल्प संचालक,   महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार   जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग व       जिल्हा कारागृह अलिबाग    यांच्या   संयुक्त विद्यमाने अलिबाग कारागृहातील बंद्यांसाठी    कारागृह उपमहानिरीक्षक दक्षिण विभाग मुंबई योगेश देसाई  व   जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली    01 डिसेंबर   जागतिक एड्स दिन व पंधरवडानिमित्त (दि.29 डिसेंबर 2023) रोजी आरोग्य व रक्त तपासणी   शिबिर   संपन्न झाले. यावेळी कारागृह अधीक्षक अशोक कारकर, वरिष्ठ तुरुंग अधिकारी रामचंद्र रणनवरे, तुरुंग अधिकारी किशोर वारगे, शशिकांत निकम व कर्मचारी तसेच लायन्स क्लब श्रीबागचे अध्यक्ष संजय   रावले,    विभागीय अध्यक्ष श्रीम.प्रियदर्शिनी   संजय पाटील  विद्याधर पैठणकर सदस्य    उपस्थित होते.                  या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या   बंद्यांना जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक,   जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग,   जिल्हा रुग्णालय, अलिबा    संजय माने     यांनी एचआयव्ही/एड्स तसेच गुप्त