नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावीची प्रवेश परीक्षा दि.20 जानेवारी रोजी

 

 

रायगड(जिमाका)दि.02 :- निजामपूर, ता.माणगाव येथील पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयाची इयत्ता सहावीसाठी प्रवेश परीक्षा 20 जानेवारी 2024 रोजी जिल्हयातील एकूण 15 तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर होणार आहे. संबंधित उमेदवारांनी त्यासाठीचे प्रवेशपत्र https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard व https://navodaya.gov.in या वेबसाईटवरुन डाउनलोड करुन घ्यावेत, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य  के. वाय. इंगळे यांनी दिली आहे.

रायगड जिल्हयातील 15 परीक्षा केंद्रांवर 2 हजार 39 विद्यार्थी यावेळी इयत्ता 6 वी वर्ग पात्रता परीक्षेसाठी बसत आहेत. एकूण 80 जागांसाठी यातून विद्यार्थी निवडले जाणार असून परीक्षा पात्र विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांच्या रजिस्ट्रेशन क्रमांकासह परीक्षा ओळखपत्रे https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard व https://navodaya.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. विद्यार्थी रजिस्ट्रेशन क्रमांक (USER ID) आणि विद्यार्थी जन्मतारीख हे ओळखपत्राचे पासवर्ड असणार आहेत.

सर्व परीक्षार्थीनी दि. 20 जानेवारी रोजी सकाळी ठिक 10 वा. परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. विद्यार्थी आणि पालकांना याबाबत काही माहिती हवी असेल तर त्यांनी संतोष चिंचकर 9881351601, केदार केंदेकर 9423113276, 7038215346, सचिन कुलकर्णी 9970024880 यांना संपर्क साधावा.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक