Posts

Showing posts from February 2, 2020

शनिवारी लोकअदालतीचे आयोजन

शनिवारी लोकअदालतीचे आयोजन अलिबाग-दि. 06(जिमाका- रायगड जिल्ह्यातील सर्व जिल्हा, तालुका, सहकार व कामगार न्यायालयात शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2020 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये रायगड जिल्ह्यात न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे कलम 138 एन.आय.ॲक्ट, विवाह प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी दावे,फौजदारी व दिवाणी अपिले, भूसंपादन प्रकरणे, सहकार न्यायालय व कामगार न्यायालयाची एकूण 4441 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच वादपूर्व प्रकरणे, रक्कम वसूलीची प्रकरणे, नगरपालिका व ग्रामपंचायतची पाणी पट्टी व घर पट्टी वादपूर्व प्रकरणे तसेच वीज वितरण कंपनीची व राष्ट्रीयकृत बँकाची वादपूर्व प्रकरणे अशी 20434 प्रकरणे सामंजस्याने तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. अशी माहिती संदिप स्वामी,न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग यांनी दिली. तरी रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभा इंगळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा   व सत्र न्यायाधीश, रा

रायगड जिल्ह्यात पर्यटन वृद्धीसाठी अधिक सेवा सुविधांची गरज - मा.राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 3 -    रायगड जिल्ह्यात पर्यटन वृद्धीच्या अनेक संधी आहेत. मात्र पर्यटन वाढीसाठी अधिक सेवा सुविधा निर्माण करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्राचे राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. रायगड जिल्ह्याच्या नियोजन भवन येथे आज राज्य व केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी योजनांचा आढावा मा.राज्यपाल यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री ना.आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे आदि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्य शासनाच्या महात्मा फुले कर्ज मुक्ती योजना, शिवभोजन, मुख्यमंत्री सोलर पंप योजना, अमृत आहार, माझी कन्या भाग्यश्री, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, कातकरी अभियान, आयुष्यमान भारत या सह केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल सुरु -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 2 -    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या रायगड किल्ल्याला भेट देऊन मला विशेष ऊर्जा मिळाली. रायगड किल्ल्याच्या विकासासाठी सुरु असलेल्या कामाबद्दल मी समाधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने देश सुरु आहे असे उदगार महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले. मा.राज्यपाल यांनी आज दुपारी रायगड किल्ल्याला भेट दिली. तेथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यांच्या समवेत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री ना.आदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर आदि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रायगड किल्ल्यावर सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभागाच्या सहकार्याने विविध विकास कामे सुरु आहेत. त्यांची प्रत्यक्ष पाहणी मा.राज्यपाल महोदयांनी केली. रायगड किल्ल्यावर असलेल्या विविध भागात स्वत: जावून पाहणी केली. तत्पूर्वी मा.राज्यपाल महोदयांनी र

कुहिरे ग्रामपंचायत हद्दीतील गावांच्या विकास कामांना प्राधान्य दिले जाईल ---पालकमंत्री श्रीमती आदिती तटकरे

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका)- ग्रामीण भागाचा विकास व्हावा, तेथील लोकांना लोकहिताच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून शासन विकासाच्या महत्वपूर्ण योजना राबवित आहे. या योजनांच्या माध्यमातून कुहिरे ग्रामपंचायत हद्दीतील गावांच्या विकास कामांना प्राधान्य दिले जाईल असे, प्रतिपादन   राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा श्रीमती आदिती तटकरे यांनी आज येथे केले.    कुहिरे येथील विविध विकास कामांच्या भूमिपुजन   प्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.   यावेळी कुहिरे ग्रामपंचयातीच्या सरपंच श्रीमती प्रज्ञा जवके, उपसरपंच मनोहर पारधी, तहसिलदार पेण श्रीमती अरुणा जावध तसेच कुहिरे ग्रामपंचायत हद्दीतील आदीवासी वाडीतील आणि कुहिरे गावातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री श्रीमती तटकरे म्हणाल्या की, कुहिरे गावातील काही प्रलंबित कामे असतील किंवा नव्याने कामे करायची असतील तर त्या विकास कामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल.    तसेच कुहिरे ग्रामपंचायत हद्दीत