Posts

Showing posts from July 23, 2023

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न महावितरणाचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे दिले निर्देश

Image
    अलिबाग,दि.29 (जिमाका):-  मागणाव तालुक्यात महावितरण विभागाच्या वीज संदर्भात असलेल्या समस्या व इतर विभागांच्या कामकाजाचा आढावा यासंदर्भात शासकीय विश्रामगृह, माणगांव येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.  या बैठकीत त्यांनी मागणाव तालुक्यात महावितरण संदर्भातील सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावेत, असे निर्देश महावितरण अधिकाऱ्यांना दिले.   यावेळी तहसिलदार विकास गारुडकडर, गटविकास अधिकारी संदिप जठार, महावितरण अधीक्षक अभियंता पेण श्री.मुलाणी, कार्यकारी अभियंता रोहा प्रदीप डाळू, उपकार्यकारी अभियंता माणगांव सागर बामणकर, प्रभारी कार्यकारी अभियंता गोरेगाव, चंद्रकांत केंद्रे, नगर पंचायत मुख्याधिकारी संतोष माळी उपस्थित होते.    या बैठकीत वारक नळपाणी पुरवठा योजना, व्होल्टेज प्रश्न, विघवली हायस्कूल विद्युत पोल शिफ्टिंग, ढालघर फाटा नवीन डी. पी. बसविणे, सेल्फी पॉईंट जंक्शन बॉक्स प्रश्न, काकल, गौळवाडी पथदिवे प्रश्न, माणगांव शहरात चक्रीवादळात तात्पुरती केलेली कामे सुरळीत कायमची करणे, चिंचवली, सोन्याची वाडी विद्युत प्रश्न, वाढीव वीज बिल प्रश्न, वडवली

पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) पुढील पंधरा दिवसांकरिता रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद

       अलिबाग,दि.29(जिमाका):- जिल्ह्या तील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाट रस्त्यावरील दुर्घटना टाळण्यासाठी  जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी आजपासून पुढील पंधरा (15) दिवसांकरिता  पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अपर पोलीस अधीक्षक रायगड-अलिबाग यांच्या पत्रानुसार आंबेनळी घाट रस्ता हा अरूंद व घाट वळणाचा असल्याने रस्त्याचे बाजूला असणारा डोंगरकडा हा या भागात पडणाऱ्या पावसामुळे भूस्खलन होवून डोंगरावरील माती व मोठमोठे दगड रस्त्यावर आल्याने तसेच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खोल दरी असल्याने हा घाट रस्ता वाहतुकीस धोकादायक असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.  या रस्त्यावरून वाहतुक सुरू ठेवल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवून मोठया प्रमाणांत जिवित व वित्तीय हानी होण्याची दाट शक्यता आहे. त्या कारणास्तव हा रस्ता  बंद करण्यात येऊन, पर्यायी रस्ता पोलादपूर खेड-चिपळूण-पाटण- कराड-कोल्हापूर तसेच पाटणकडून सातारामार्गे पुण्याकडे असा पर्यायी मार्ग आहेत, असे अभिप्राय सादर केले आहेत. या पार्श्वभूमीवर

उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

                   अलिबाग,दि.28(जिमाका):-  राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे:                शनिवार, दि.29 जुलै 2023 रोजी रात्रौ सोईनुसार रत्नागिरी येथून मोटारीने अलिबाग, जि.रायगडकडे प्रयाण. मध्यरात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथे आगमन व राखीव. रविवार, दि.30 जुलै 2023 रोजी सकाळी 11.00 वा. रायगड जिल्हा नियोजन समिती बैठक. स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन, अलिबाग. दुपारी नियोजन समिती बैठकीनंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमानुसार रायगड जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या अँड्राईड मोबाईल ॲपचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन, अलिबाग. दुपारी 1.00 वा. रायगड जिल्हा डोंगरी विभाग विकास समिती बैठक. स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन, अलिबाग. दुपारी 1.30 वा. रायगड जिल्हा शबरी घरकुल योजना सन-2023-24 बैठक. स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन, अलिबाग. दुपारी 2.00 वा. पत्रकार परिषद, स्थळ : जिल्हा नियोज

जिल्ह्यातील वनहक्क जमिनधारक शेतकऱ्यांनी एक रूपया पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा --जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्रीम.उज्ज्वला बाणखेले

  अलिबाग,दि.27(जिमाका) :-  जिल्ह्यातील वनहक्क जमिनीधारक शेतकऱ्यांनी एक रूपया पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा.  या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत दि.31 जुलै 2023 असल्याने जास्तीत जास्त वन हक्क जमिनीधारक शेतकऱ्यांनी सर्वसमावेशक पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे. खरीप हंगाम 2023-24 मध्ये केवळ एक रूपया प्रति अर्ज दराने प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. जिल्हयात खरीप हंगामात भात व नाचणी या अधिसूचित पिकांचा समावेश करण्यात आलेला असून शेतकऱ्यांना टाळता न येणाजोग्या कारणांमुळे होणाऱ्या नुकसानीच्या जोखीम बाबींचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना वन जमिनीचे वाटप करण्यात आले आहे, अशा जमिनीची नोंद दळी प्लॉट (वनखंड) स्वरूपात आहे. अशा वनजमिनीबाबत 7/12 उतारे पिक विमा पोर्टलवर येत नसल्याने जिल्ह्यातील असे अनुसूचित जमाती व इतर वननिवासी अधिनियम 2006 अंतर्गत वैयक्तिक बन हक्कधारक शेतकऱ्यांचे नावे 7/12 उतारे निघत नाहीत. राज्यातील अनुसूचित जमाती व इतर वननिवासी अधिनियम 2006 अंतर्गत वैयक्तिक वन हक्कध

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसनसाठी सर्व विभागांनी सामूहिक प्रयत्न करावे --मदत व पुनर्वसनमंत्री मा.ना.अनिल पाटील कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश

Image
  अलिबाग,दि.27(जिमाका):-   इर्शा ळवाडी   दुर्घटनाग्रस्त लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सामूहिक प्रयत्न करावे तसेच कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिल्या असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व    पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापनमंत्री अनिल पाटील यांनी केले.              इर्शाळवाडी येथील पुनर्वसन कार्याचा आढावा व पाहणी संदर्भात खालापूर येथील तात्पुरत्या निवारा शिबिराच्या    पाहणीप्रसंगी ते बोलत होते.   आगमन   झाल्यानंतर मंत्री श्री.पाटील यांनी प्रथम निवारा शिबीरातील आदिवासी नागरिकांची भेट घेतली व त्यांना देण्यात आलेल्या तेथील सोयी-सुविधांची पाहाणी केली. तसेच त्यांच्याशी चर्चा करुन अडचणींबाबत माहिती घेतली. यावेळी दरड दुर्घटनेतील मृत व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांनी विविध शासकीय अधिकाऱ्यांकडून पुनर्वसन कामाचा आढावा घेतला. यावेळी बैठकीला जिल्हा पुनर्वसन अधिकारी भरत वाघमारे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सर्जेराव बढे, उपविभागीय अधिकारी श्री.अजित नैराळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवमाने, जिल्

बँकांनी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे-जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे

Image
      अलिबाग,दि.26(जिमाका) :-  शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटपासोबतच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेच्या लाभार्थ्यांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी बँकांकडून कर्ज वितरीत करण्यात येते. शेतकऱ्यांना व लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे बँकांना दिलेले उदिष्ट हे निर्धारीत वेळेत पूर्ण करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी दिले.  जिल्हास्तरीय बँकर्स समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी रिझर्व्ह बँकचे जिल्हा विकास अधिकारी नरेंद्र कोकरे, बँक ऑफ इंडिया चे रायगड विभाग प्रमुख मुकेश कुमार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक  विजयकुमार कुलकर्णी,जिल्हा विकास अधिकारी नाबार्ड प्रदीप अप सुंदे, जिल्हा उद्योग केंद्र चे महा व्यवस्थापक जी एस हरल्या, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सीईओ मंदार वर्तक, विविध महा मंडळाचे अधिकारी, सर्व बँकेचे जिल्हा प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.  ज्या बँकांचे पिक कर्ज  वाटपाचे प्रमाण 75 % पेक्षा कमी आहे. त्या बँकांच्या वर  कायदेशीर कारवाही करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी बँकांना दिला. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची उद्योग उ

जिल्हाधिकारी कार्यालयात कारगिल विजय दिवसानिमित्त आदरांजली अर्पण

  अलिबाग,दि.26(जिमाका) :-  जिल्हाधिकारी कार्यालय राजस्व' सभागृहामध्ये आज दि. २६ जुलै २०२३ कारगिल विजय दिवस लेफ्टनंट कर्नल वैजनाथ माने,    जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांचे उपस्थितीत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व शहिदअमर जवान प्रतिमेस फुले वाहून श्रध्दांजली अर्पण केली. याप्रसंगी सर्व उपस्थितांनी स्तब्धता पाळून आदरांजली वाहीली.   कार्यक्रमास शहीद जवान निलेश तुणतुणे यांची वीर माता, वीर पिता यांचा शाल श्रीफळ तसेच साडी देऊन सन्मान करण्यात आला.   जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे श्री गोविंदराव मारुती साळुंखे, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कारगिल युध्दा विषयी थोडक्यात माहिती सांगितली.   ले. कर्नल राहुल बैजनाथ माने    यांनी कारगिल युध्द तसचे भारतीय सेनेविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमास सुबेदार नरेश रामचंद्र पवार आपल्या परिवारासह, विधवा, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व आजी सैनिक उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमामध्ये तरुण मुला/मुलीना सैन्यामध्ये भरती होणेबाबत मार्गदर्शन    केले. कार्यक्रमास शासकिय अधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिक

खरीप हंगाम सन 2023 पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा-- कृषी आयुक्त सुनील चव्हाण

    अलिबाग,दि.26(जिमाका) :-  राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करुन उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका,नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या 11 पिकांसाठी पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिकस्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी :  पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी दि.31 जुलै तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी दि.31 ऑगस्ट 2023 अशी   आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्र

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार गणेश मंडळांनी दि.5 सप्टेंबर पर्यंत अर्ज करावेत

  अलिबाग,दि.26(जिमाका) :- गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही    उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या  mahotsav.plda@gmail.com  या इमेलवर दि.5 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.            धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना सहभागी होता येईल. सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पुरस्कारासाठी निवड पुढील निकषांच्या आधारे करण्यात येईल.                 पर्यावरणपूक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट (थर्माकोल/प्लॅस्टीक विरहीत), ध्वनीप्रदूषण रहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, इ.समाज सामाजिक सलोखा प्रबोधन, सजावट/देखावा किंवा स्वांतत्र्याच्या चळवळीसंदर्भात    छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट/देखावा, गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबीर, वर्षभर गड किल्ले,

पीएम किसान योजनेंतर्गत 14 व्या हप्त्याचे गुरुवारी वितरण कृषि विज्ञान केंद्र रोहा व कर्जत, खार संशोधन केंद्र पनवेल येथे कार्यक्रम

    अलिबाग,दि.26(जिमाका) :-  कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पी.एम.किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याना आयोजित 14 व्या हप्त्याचा लाभ वितरीत करण्यासाठी राजस्थान मधील सिकर येथे भव्य संमेलन आयोजित केले आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थीना अदा करावयाच्या 14 व्या हप्त्याचे वितरण मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दि.27 जुलै 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता केले जाणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kissan ) देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना 14 व्या हप्त्यातील एप्रिल 2023 ते जुलै 2023 देय लाभ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सीकर, राजस्थान येथून ऑनलाईन समारंभामध्ये वितरीत होणार आहे. या समारंभाचे थेट प्रक्षेपण कृषि विज्ञान केंद्र रोहा, प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र कर्जत, खार संशोधन केंद्र पनवेल, ग्रामपंचायत स्तरावरून तसेच तालुक्यातील गावोगावी कृषी विभागामार्फत मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांनी या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन केले आहे. तरी या

इर्शाळगड दरड दुर्घटनाग्रस्तांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट

    अलिबाग,दि.23 (जिमाका):-  खालापूर मधील इर्शाळगड येथील  दुर्घटनास्थळी आज  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच दरड दुर्घटनाग्रस्तांची पंचायत मंदिर येथे    सांत्वनपर भेट घेतली.  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी सांगितले की, इर्शाळगड दरड दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन करताना त्यांना शेती रोजगार आणि घर   देऊन त्यांचे पुनर्वसन करावे. अशा दरड दुर्घटना कायम स्वरूपी टाळण्यासाठी डोंगर कपारीत राहणाऱ्या राहिवासीयांचा देशव्यापी सर्व्हे करून त्यांचे कायमस्वरूपी सुरक्षितस्थळी पुनर्वसन केले पाहिजे. अशा दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन वन विभागाच्या जमीनीवर होऊ शकते. तसे संपूर्ण देशात डोंगरकपारीवर राहणाऱ्या लोकांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी त्यांचे सुरक्षित स्थळी पुनर्सवन केले पाहिजे. त्यासाठी एखादी नवीन योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयातून कारण्यासाठी आपण प्रयत्न करु असे केंद्रीय राज्यमंत्री श्री.आठवले म्हणाले.  इर्शाळगड दुर्घटनाग्रस्तांना केंद्र सरकार तर्फे मदत मिळवून देऊ तसेच रिपब्लिकन पक्षातर्फे    एकूण रु.5 लाख सांत्वनपर मदत

इरशाळवाडी आपत्ती मधून बचावलेल्या लोकांच्या पाठीशी शासन ताकदीने उभे --पालकमंत्री उदय सामंत सायं 5.30 पासून बचावकार्य कायमस्वरूपी थांबाविल्याचे केले जाहीर

Image
    अलिबाग,दि.23 (जिमाका):-  इर्शाळवाडी  दुर्घटनेतून बचावलेल्या 144 लोकांच्या पाठीशी शासन ताकदीने उभे आहे. या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्हातील अन्य धोकादायक वाडया आणि गावांचे पुनर्वसन करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. दि.19 जुलै पासुन सुरु असलेली बचाव कार्य मोहीम आज दि.23 जुलै रोजी सायं. 5.30 पासून थांबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.  इर्शाळवाडी येथील बचाव कार्याचा आढावा व पाहणी संदर्भात खालापूर पोलीस स्टेशन येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ.महेश बालदी, आ.महेंद्र थोरवे, विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, विशेष  पोलीस निरीक्षक प्रविण पवार, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बढे , एनडीआरएफ कंमाडर श्री.तिवारी उपस्थित होते. पालकमंत्री ना.उदय सामंत म्हणाले की, दि.19 जुलै 2023 रोजी इरर्शाळवाडी

इरशाळवाडी घटनेतील पीडितांचे सामान्यजीवन पूर्ववत सुरू व्हावे यासाठी शासन स्तरावरून मोठे प्रयत्न

    अलिबाग,दि.23 (जिमाका):-   इरशाळवाडी येथील दरडग्रस्त पीडितांचे जनजीवन सुरळीत व्हावे आणि त्यांचे पुनर्वसन व्हावे या दृष्टीने शासकीय स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत त्यांचे तात्पुरते निवारे सुसज्ज करणे या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना उपचार करून बरे करणे आणि मानसिक दृष्ट्या समुपदेशनाद्वारे त्यांना आधार देणे आदी कामे सुरू आहेत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालय रायगड अलिबाग च्या पथकाने इर्शाळवाडी येथील दरडग्रस्त जखमी व्यक्तींना ग्रामीण रुग्णालय चौक येथे जाऊन त्यांचे मनोबल वाढविले तसेच त्यांना भविष्यात ताकदीने उभे राहण्यासाठी समुपदेशन केले. त्यानंतर दराडग्रस्त गावातील व्यक्तींना व मृतांच्या नातेवाईकांना तात्पुरत्या निवारा केंद्र (रेस्क्यु कॅम्प ) येथे जाऊन मानसिक आधार देऊन समुपदेशन केले. श्रीमती प्रफुल्ला कांबळे क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट, श्रीमती धनेश्वरी  कडू, समाजसेवा अधीक्षक मनोविकृती आणि श्री.विशाल दामोदरे, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता यांनी समुपदेशनाचे कार्य केले. डॉ.अर्चना सिंह, मानसोपचारतज्ञ  यांनी आवश्यकता असेल त्या पीडित व्यक्तींना औषधोपचार केले.

इरसालवाडी येथे मदत व बचाव कार्य करून आपदग्रस्तांचे तात्पुरते तसेच कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे निर्देश जारी

अलिबाग,दि.23 (जिमाका):-  दि.19 जुलै 2023 रोजी इरसालवाडी, ता.खालापूर येथे दरड कोसळून नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढावले आहे. त्याअनुषंगाने मदत व बचाव कार्य करून आपदग्रस्तांचे तात्पुरते तसेच कायम पुनर्वसनाकामासाठी विविध शासकीय विभाग आणि अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.  उपविभागीय अधिकारी पनवेल श्री. राहूल मुंडके,आपदग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनाकामी आवश्यक यंत्र सामुग्री तसेच मनुष्यबळ पनवेल व नवी मुंबई महानगरपालिकेकडून उपलब्ध करुन घेणे. जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड श्री.शाम पोशेट्टी, आपदग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनाकामी आवश्यक यंत्र सामुग्री तसेच मनुष्यबळ पेण, अलिबाग, खोपोली, खालापूर व कर्जत नगरपरिषदांकडून उपलब्ध करुन घेणे. उपविभागीय अधिकारी  पेण श्री.प्रविण पवार, आपदग्रस्तांना देणेकामी संसारउपयोगी साहित्य उपलब्ध करून घेणे, हे साहित्य साठवणूकीकामी दिलेल्या कंटेनरमध्ये व्यवस्थितरित्या साठवून ठेवणे,या साहित्यांचे सूचनांप्रमाणे कुंटुंबनिहाय वाटप करणे, या साहित्याचा आवक व जावक हिशोब ठेवणे व तो वेळोवेळी जिल्हाधिकारी यांना सादर करणे उप

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
        अलिबाग, दि.23 (जिमाका):- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात  त्यांच्या प्रतिमेला उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) जीवन देसाई यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.   यावेळी तहसिलदार ज्ञानदेव पवार, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. 00000