जिल्ह्यातील वनहक्क जमिनधारक शेतकऱ्यांनी एक रूपया पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा --जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्रीम.उज्ज्वला बाणखेले


 

अलिबाग,दि.27(जिमाका) :- जिल्ह्यातील वनहक्क जमिनीधारक शेतकऱ्यांनी एक रूपया पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा.  या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत दि.31 जुलै 2023 असल्याने जास्तीत जास्त वन हक्क जमिनीधारक शेतकऱ्यांनी सर्वसमावेशक पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे.

खरीप हंगाम 2023-24 मध्ये केवळ एक रूपया प्रति अर्ज दराने प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. जिल्हयात खरीप हंगामात भात व नाचणी या अधिसूचित पिकांचा समावेश करण्यात आलेला असून शेतकऱ्यांना टाळता न येणाजोग्या कारणांमुळे होणाऱ्या नुकसानीच्या जोखीम बाबींचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना वन जमिनीचे वाटप करण्यात आले आहे, अशा जमिनीची नोंद दळी प्लॉट (वनखंड) स्वरूपात आहे. अशा वनजमिनीबाबत 7/12 उतारे पिक विमा पोर्टलवर येत नसल्याने जिल्ह्यातील असे अनुसूचित जमाती व इतर वननिवासी अधिनियम 2006 अंतर्गत वैयक्तिक बन हक्कधारक शेतकऱ्यांचे नावे 7/12 उतारे निघत नाहीत. राज्यातील अनुसूचित जमाती व इतर वननिवासी अधिनियम 2006 अंतर्गत वैयक्तिक वन हक्कधारक त्यांस प्राप्त झालेल्या प्रमाणपत्राच्या आधारावर प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागासाठी वनपट्टाधारक च्या परिपत्रकान्वये पात्र आहेत. वनहक्कधारक (दळी प्लॉट) शेतकरी व 7/12 संगणीकृत न झालेल्या शेतकऱ्यांची जमिनधारणा दस्तावेजांच्या मर्यादा लक्षात घेवून जिल्हयातील भात व नाचणी पिक घेणारे व पिक विमा योजनेमध्ये सहभागी इच्छिणाऱ्या शेतक-यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी व अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांच्या सोबत समन्वय साधून राष्ट्रीयकृत बँक / जिल्हा सहकारी बँक येथे विमा हप्ता रूपये 1 व आवश्यक कागदपत्रे जमा करावीत.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक