Posts

Showing posts from September 25, 2022

स्वदेस फाउंडेशन तर्फे जागतिक हृदयरोग दिन साजरा

Image
  अलिबाग,दि.30 (जिमाका):-   स्वदेस फाउंडेशनच्या डिजिटल स्वदेस उपक्रमांतर्गत दि.29 सप्टेंबर रोजी आरोग्य कार्यकर्ते,  हृदयरोगी रुग्णांचा परिवार यांच्यासोबत  “ जागतिक हृदय दिन ”  साजरा करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध पेडियाट्रिक कार्डियाक सर्जन डॉ.भरत दळवी यांनी हृदयरोगावर दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. डॉ.भरत दळवी हे ग्लेनमार्क कार्डियाक सेंटर, ब्रीच कॅंडी हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल आणि रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांसारख्या अत्यंत प्रतिष्ठित रुग्णालयांमध्ये सल्लागार म्हणून काम करत आहेत. आरोग्य कार्यकर्त्यांनी जन्मजात हृदयरोग कसे ओळखायचे, हृदयरोगावर कुठे आणि कोणत्या प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत, उपचारानंतर कशा प्रकारे काळजी घ्यायची, याविषयीचे सखोल व सोप्या पद्धतीने मार्गदर्शन डॉ.दळवी यांनी केले व आरोग्य कार्यकर्त्यांच्या व पालकांच्या शंकांचे निरसन केले. रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेसने फाउंडेशनने 2014 पासून आतापर्यंत हृदयविकाराचा त्रास असलेल्या 185 मुलांची यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांच्या मार्गदर्शनाखाली

नवरात्रोत्सवात ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपण व ध्वनीवर्धक यंत्रणा वापरण्यास जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांची परवानगी

  अलिबाग,दि.30 (जिमाका):-  रायगड जिल्हा कार्यक्षेत्रात सन 2022 या वर्षाच्या कालावधीत ध्वनी प्रदूषण (नियम व नियंत्रण) नियम, 2017 च्या नियम 5 उपनियम 3 नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यत जिल्ह्यात 15 दिवस निश्चित करण्यात आलेले आहेत. अधिसूचनेद्वारे नवरात्र उत्सवाच्या कालावधीत पंचमी, अष्टमी व नवमी असे एकूण तीन दिवस सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीची विहीत मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच दि.1 ऑक्टोबर 2022 या दिवशी नवरात्रोत्सवासाठी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत निर्देश दिलेले आहेत. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर करण्यास देण्यात आलेल्या सूटमध्ये बदल करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी त्यांना प्राप्त अधिकारातून प

सेवा पंधरवडा अंतर्गत विविध शैक्षणिक योजनांबाबत खारघर येथे मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

  अलिबाग,दि.29 (जिमाका):-  राज्य शासन व केंद्र शासन यांच्या वतीने सेवा पंधरवडा दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधी दरम्यान साजरा करण्यात येत आहे. यानुषंगाने सहायक आयुक्त, समाज कल्याण, रायगड व जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय, अलिबाग यांच्या वतीने दि.29 सप्टेंबर 2022 रोजी सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, खारघर येथे सेवा पंधरवडा अंतर्गत भारत सरकार शिष्यवृती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेबाबत तसेच विदयार्थ्यांना सामजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, मनी मार्जिन योजना, परदेशी शिष्यवृती, शासकीय वसतिगृह प्रवेश प्रकिया तसेच समान संधी केंद्र, जात  वैधता प्रमाणपत्र इत्यादी योजनेच्या अनुषंगाने विदयार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच 2022-23 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेचे अर्ज भरुन घेण्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनील जाधव व रायगड जिल्हा जात पडताळणी समिती संशोधन अधिकारी रविकिरण पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत “जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस” साजरा केला जाणार

  अलिबाग,दि.29 (जिमाका):-  शासनामार्फत  “ जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस ”  साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने दि.1 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह, जुने पनवेल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी ज्येष्ठ नागरिकांनी व ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रायगड समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे. 00000

“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” कार्यक्रमांतर्गत स्मार्ट ई-क्लासरुम चे उद्घाटन व शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

  अलिबाग,दि.29 (जिमाका):-  माणगाव तालुक्यातील   शासकीय निवासी शाळा जावळी येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांकरिता स्मार्ट ई-क्लासरुम   (Smart E-classroom) चे ऑनलाईन उद्घाटन मुंबई विभाग समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे व रायगड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.भरत बास्टेवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव व गृहपाल श्री.संदीप कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिक्षण पद्धतीत होणाऱ्या नवनवीन बदलानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, हे काळानुरूप अनिवार्य झाले आहे. त्यामुळे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांच्या प्रयत्नातून अनुसूचित जाती उपाययोजनेतून अत्याधुनिक पद्धतीचे ई-लर्निंग स्मार्ट क्लासरूम साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये दृकश्राव्यद्वारे विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापन करणे अत्यंत सोपे झाले आहे. खडू, फळा व डस्टर या साहित्याचा वापर न करता अत्यंत सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे अध्ययन, अध्यापन घेणे व अभ्यासाचे उत्कृष्ट पद्धतीने दृढीकरण करणे आता अत्यंत सोपे झाले अ

“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” कार्यक्रमांतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या लाभाकरिता माणगाव येथे कार्यशाळा संपन्न

  अलिबाग,दि.29 (जिमाका):-  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग कार्यालयाच्या वतीने  “ राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा ”  कार्यक्रमांतर्गत शिष्यवृत्ती अर्ज भरणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व समान संधी केंद्र याबाबत माहिती देण्याकरिता माणगाव येथील डी.जी. तटकरे महाविद्यालय येथे दि.27 सप्टेंबर 2022 रोजी कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमादरम्यान महाविदयालयात समान संधी केंद्राची स्थापना करण्यात आली. भारत सरकार शिष्यवृत्तीचे शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील अर्ज भरण्यास दि.22 सप्टेंबर 2022 रोजी सुरुवात झाली आहे. त्याबाबत महाविद्यालये व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज लवकरात लवकर भरण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच महाडीबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. शिष्यवृत्तीच्या इतर योजनांचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार या योजनेचे मार्गदर्शन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री. सुनिल जाधव यांनी केले. या कार्यशाळेमध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती. रायगड अलिबाग कार्यालयामार्फत जात पडताळणी प्रमाणपत्र काढताना विदयार्थ्यांना/पालकांना य

सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात आपत्ती व्यवस्थापन शिबिर संपन्न

  अलिबाग,दि.29 (जिमाका):-  महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येवून उच्च शिक्षणासाठी आपण साऱ्याजणी आपली व कुटुंबाची प्रगती करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहत आहात. आपल्या गावाचे आणि घराचे नाव उज्वल करा आणि नेहमीच्या जीवनात आपत्तीला सामोरे कसे जावे, याचे ज्ञान आत्मसात करा. हे ज्ञान आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि ग्रामस्थांनाही द्या, असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण व रायगड भूषण पनवेल नगरपालिकेचे माजी नगरसेवक शिवदास कांबळे यांनी पनवेल येथे केले. पनवेल येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रायगड भूषण आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील, संपादक नंदकिशोर धोत्रे, वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती मीनू नरहरे व आपत्ती सुरक्षा मित्र किशोर पाटील, विकास रणपिसे हे उपस्थित होते. प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जयपाल पाटील यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली तर पाहुण्यांचे स्वागत गृहपाल श्रीमती नरहरे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात श्रीमती नरहरे यांनी सामाजिक न्याय व

अनुसूचित जातीतील नवउद्योजकांसाठी स्टॅन्डअप इंडिया योजनेंतर्गत मार्जिन मनी मंजूरीबाबत कार्यशाळेचे आयोजन

  अलिबाग,दि.29 (जिमाका):-  केंद्र शासनाने स्टॅन्डअप इंडिया ही योजना घोषित केली आहे. या योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांतील नवउद्योजक लाभार्थ्यांना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2020-21 पासून योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांना 10% स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारात स्टॅन्डअप इंडिया योजनेंतर्गत 75% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15% सबसिडी राज्य शासनामार्फत देण्यात येते. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजकांनी घेण्याकरिता दि.30 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्र, यशवंतनगर, शिळफाटा, खोपोली, ता.खालापूर येथे कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेसाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील उद्योजकांनी उपस्थित राहावे, तसेच या योजनेच्या सविस्तर माहितीकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कच्छी भवन, नमीनाथ मंदिराजवळ, सेंट मेरी स्क

शासन आणि प्रशासनाने एकत्रित राहून लोककल्याणकारी कामे करणे अपेक्षित -पालकमंत्री उदय सामंत

Image
अलिबाग,दि.28 (जिमाका):-  लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी लोकसेवेसाठी बांधील आहेत. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने एकत्रित राहून परस्पर समन्वयाने लोककल्याणकारी कामे करणे अपेक्षित आहे. या विचारधारेने सर्वांनी मिळून रायगड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवून आणू या, असे आवाहन राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आज केले. रायगड जिल्ह्याचा जिल्हा वार्षिक नियोजन आराखडा तसेच इतर नियोजित विकासकामांबाबतची आढावा बैठक आज मलबार हिल येथील सह्याद्री शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनील जाधव, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव आणि विविध शासकीय विभागांचे विभाग प्रमुख तसेच कार्यालय प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री श्री.सामंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचित केले की, अधिकाऱ्यांनी पारदर्शकपणे जलद गतीने विकासकामे पूर्ण करावीत. सर्वांनी रायग

जितक्या गरजा कमी तितके आयुष्य सुखी -शाहू पाटोळे

Image
अलिबाग,दि.27 (जिमाका):-   मानवी आयुष्य हे खूप सुंदर आहे. यात भौतिक सुखाच्या मागे न लागता जितक्या गरजा कमी तितके आयुष्य सुखी, हा सुखाचा मूलमंत्र पूर्वांचल राज्यातील लोकांची आयुष्य जगण्याची पद्धत अभ्यासली की मिळतो, असे प्रतिपादन लेखक तसेच पत्र सूचना कार्यालयाचे माजी अधिकारी शाहू पाटोळे यांनी आज येथे केले. राजा राममोहन रॉय यांची पुण्यतिथी व जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग येथे प्रसारमाध्यम प्रतिनिधींसोबत अनौपचारिक संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कोकण विभागीय उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री.पाटोळे यांनी पूर्वांचल राज्यातील आपले अनुभव सांगताना तेथील समाज व्यवस्था, संस्कृती, राहणीमान, आहार-विहार, निसर्ग सौंदर्य, प्रशासकीय व्यवस्था, तेथील पत्रकारिता आदी विषयांबाबत उपस्थित प्रसारमाध्यम प्रतिनिधींना अगदी दिलखुलासपणे माहिती दिली. या संवादातून पूर्वांचल राज्याबद्दल अतिशय उपयुक्त माहिती मिळाल्याबाबत सर्वांनी आनंद व्यक्त केला. सुरुवातीस उपसंचालक डॉ.मुळे यांनी उपस्थितांना शाहू पाटोळे यांच्या कार्याविषय

जिल्हा निर्यात कार्यशाळेमुळे पुस्तकी ज्ञान व प्रत्यक्ष व्यावसायीक अनुभव यातील अंतर कमी होईल -जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

Image
अलिबाग,दि.26 (जिमाका):-  गुंतवणूकवृद्धी, निर्यात, व्यवसाय सुलभीकरण व एक जिल्हा एक उत्पादन या विषयांचा अंतर्भाव असलेली एकदिवसीय जिल्हा निर्यात कार्यशाळा जिल्ह्यातील सर्व सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग क्षेत्रातील निर्यातक्षम उद्योजकांना मार्गदर्शन व्हावे, याकरिता आयोजित करण्यात आली आहे.  या कार्यशाळेच्या माध्यमातून पुस्तकी ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव यातील अंतर कमी होऊ शकेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज येथे व्यक्त केला. उद्योग विभाग, उद्योग संचालनालय आणि लघुउद्योग विकास बँक ऑफ इंडिया आयोजित  “ गुंतवणूक, आयात-निर्यात, व्यवसाय सुलभीकरण, आणि एक जिल्हा एक उत्पादन ”  या विषयावरील जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित  जिल्हा निर्यात  कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते आज संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय प्रबंधक श्रीमती शंपा बिश्वास, विदेश व्यापार महासंचालनालयाचे महासंचालक सुदर्शन येलाराम, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या, जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले, पणन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक भास्कर

“माता सुरक्षित तर घर सुरक्षित” मोहिमेंतर्गत महिलांनी आरोग्य तपासणी शिबिरांचा लाभ घ्यावा -मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील

Image
  अलिबाग,दि.26 (जिमाका):-   महिला ही घराचा केंद्रबिंदू असते. तिच्या आरोग्याबाबतचे महत्व लक्षात घेऊन महिलांच्या आरोग्य सुरक्षितेसाठी  “ माता सुरक्षित तर घर सुरक्षित ”  ही मोहीम राबविण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या मोहिमेंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य तपासणी शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात  “ माता सुरक्षित तर घर सुरक्षित ”  ही मोहीम दि.26 सप्टेंबर 2022 पासून राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद गवई, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कटारे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर, कार्यक्रमाचे नोडल ऑफिसर बालरोगतज्ज्ञ वर्ग 1 डॉ.रोकडे, पॅथॉलॉजिस्ट डॉ.श