“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” कार्यक्रमांतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या लाभाकरिता माणगाव येथे कार्यशाळा संपन्न

 

अलिबाग,दि.29 (जिमाका):- सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग कार्यालयाच्या वतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत शिष्यवृत्ती अर्ज भरणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व समान संधी केंद्र याबाबत माहिती देण्याकरिता माणगाव येथील डी.जी. तटकरे महाविद्यालय येथे दि.27 सप्टेंबर 2022 रोजी कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यक्रमादरम्यान महाविदयालयात समान संधी केंद्राची स्थापना करण्यात आली. भारत सरकार शिष्यवृत्तीचे शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील अर्ज भरण्यास दि.22 सप्टेंबर 2022 रोजी सुरुवात झाली आहे. त्याबाबत महाविद्यालये व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज लवकरात लवकर भरण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच महाडीबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. शिष्यवृत्तीच्या इतर योजनांचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार या योजनेचे मार्गदर्शन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री. सुनिल जाधव यांनी केले.

या कार्यशाळेमध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती. रायगड अलिबाग कार्यालयामार्फत जात पडताळणी प्रमाणपत्र काढताना विदयार्थ्यांना/पालकांना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन रायगड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्ष डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले.

या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्ष डॉ.भरत बास्टेवाड, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल जाधव, रायगड जात प्रमाणपत्र पडताळणी समिती संशोधन अधिकारी श्री.रविकिरण पाटील, डी.जी. तटकरे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.बबन खामकर व कर्मचारी उपस्थित होते.

00000 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक