Posts

Showing posts from February 25, 2024

ग्रंथ समाजाला दिशा देण्याचे काम करतात --ॲड श्रीमती सुनीता जोशी ग्रंथ पूजन करून ग्रंथोत्सव 2023 चे उद्घाट

रायगड,दि.27(जिमाका):- ग्रंथ समाजाला दिशा देण्याचे व समाजाला सुधारण्याचे काम करतात, असे प्रतिपादन ॲड. सुनीता जोशी यांनी केले. सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय, डोंगरे हॉल, अलिबाग येथे ग्रंथोत्सव 2023 च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग, डॉ.हेमंत पवार, सार्वजनिक वाचनालय, अलिबाग, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाच्या उपाध्यक्षा श्रीमती शैलाताई पाटील, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोदार्डे, श्री.वणगे, रायगड जिल्हा ग्रंथालय सदस्य नागेश कुलकर्णी, श्री.रमेश धनावडे आदि उपस्थित होते. यावेळी मागदर्शन करताना ॲड.जोशी म्हणाल्या की, ग्रंथ हे गुरु, मित्र, मार्गदर्शक अशा अनेक भूमिका बजावत असतात. काय वाचावं, किती वाचावं यामुळे वाचक भरकटतो आहे, त्यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे. स्वतःला अद्यावत ठेवणे, स्पर्धेत टिकून रहाणे यासाठी वाचनाला पर्याय नाही. वाचनामुळे विचारात प्रगल्भता येते. नवे विचार मांडून समाजाला दिशा देणे हे ग्रंथाचे काम आहे. मोठ्यांची चरित्र आपल्याला प्रेरणा देतात. ग्रंथ स्वीकारणे किंवा नाकारणे हे सर्वस्व

महात्मा बसवेश्वर समता शिवा पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी अर्ज करावेत

    रायगड,दि.27(जिमाका):-   समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इच्छूक  व्यक्ती आणि संस्थांनी   महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी  दि.15 मार्च 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग, कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिर, सेंटमेरी स्कूलसमोर, श्रीबाग रोड अलिबाग येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सुनिल जाधव यांनी केले आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज सेवक, व्यक्ती यांना प्रतिवर्षी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराकरिता वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्टया विकास होण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, कलात्मक, सांस्कृतिक, समाल प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समजा प्रबोधनकार व समाज सेवक व त्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडून सन 2023-24 मध्ये देण्यात ये