महात्मा बसवेश्वर समता शिवा पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी अर्ज करावेत

 

 

रायगड,दि.27(जिमाका):- समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इच्छूक व्यक्ती आणि संस्थांनी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी दि.15 मार्च 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग, कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिर, सेंटमेरी स्कूलसमोर, श्रीबाग रोड अलिबाग येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सुनिल जाधव यांनी केले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज सेवक, व्यक्ती यांना प्रतिवर्षी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते.

या पुरस्काराकरिता वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्टया विकास होण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, कलात्मक, सांस्कृतिक, समाल प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समजा प्रबोधनकार व समाज सेवक व त्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडून सन 2023-24 मध्ये देण्यात येणाऱ्या महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक