Posts

Showing posts from June 26, 2022

कोकण विभागीय आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्याकडे

Image
अलिबाग,दि.30 (जिमाका):-    कोकण विभागीय आयुक्त श्री.विलास पाटील (भा.प्र.से.) हे आज गुरुवार, दि.30 जून 2022 रोजीपासून नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. तद्नंतर प्रशासकीय कारणास्तव कोकण विभागीय आयुक्त या पदाचा अतिरिक्त कार्यभार रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर (भा.प्र.से.) यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आला आहे. 00000

जिल्हा सामान्य रुग्णालयात 3 जुलै रोजी इपिलेप्सी शिबिराचे आयोजन

Image
  अलिबाग,दि.30 (जिमाका):-  राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय आणि इपिलेप्सी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा रुग्णालयात इपिलेप्सी शिबिराचे रविवार, दि.03 जुलै 2022 रोजी सकाळी 09.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात इपिलेप्सी रुग्णावर योग्य पद्धतीने उपचार होण्यासाठी न्यूरॉलॉजिस्ट किंवा इपिलेप्सीलॉजिस्ट (अपस्मार चिकित्सक) यांच्याकडून निदान व औषध उपचार करण्याच्या दृष्टीने रुग्णाची तपासणी करण्यात येणार आहे. या इपिलेप्सी शिबिराकरिता दि.03 जुलै 2022 रोजी सकाळी 09.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत जिल्हा प्रशिक्षण केंद्र,जिल्हा रुग्णालय,रायगड अलिबाग येथे सीएमई आयोजित करण्यात आली आहे. या शिबिरात इपिलेप्सी फाऊंडेशन मुंबईचे न्यूरॉलॉजिस्ट डॉ.निर्मल सूर्या हे मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात औषधोपचार सल्ला मोफत देण्यात येणार असून औषधेही विनामूल्य पुरविले जाणार आहेत. या शिबिरात आकडी/फिट या रोगांसाठी आवश्यक लागणाऱ्या तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी या शिबिराचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी सहभागी होऊन उपचार करून घ्यावे

स्वयंसेवी संस्थांनी सुरु केलेल्या वृद्धाश्रमाची माहिती पाठविण्याचे आवाहन

  अलिबाग,दि.30 (जिमाका):-    जिल्ह्यात वृद्धापकाळ चांगल्या प्रकारे घालविता यावे यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांमार्फत अनेक प्रकारचे वृद्धाश्रम चालविले जातात. जिल्ह्यात सुरु असलेले वृद्धाश्रम व तेथे कार्यरत असणारे कर्मचारी यांची माहिती एकत्रित करून शासनाला सादर करण्याबाबत समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी निर्देश दिले आहेत. या वृद्धाश्रमांची माहिती तपशिलाप्रमाणे समाज कल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद यांच्याकडे तात्काळ सादर करावी. तसेच अधिक माहितीसाठी समाजकल्याण विभाग, रायगड यांच्या 02141-222079 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे समाजकल्याण अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे. समाज कल्याण विभागास माहिती कळविताना वृद्धाश्रमाचे पूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, संस्थेचे नोंदणी क्रमांक व दिनांक, वृद्धाश्रम जागेचा तपशील, वृद्ध प्रवेशित संख्या, प्रति वृद्ध, प्रति माह आकारण्यात येणारे शुल्क,वृद्धाश्रम मधील कार्यरत कर्मचाऱ्यांचे नाव, पदनाम, शिक्षण व नियुक्ती दिनांक ही माहिती आवश्यक आहे. ही माहिती राज्य मानवी हक्क आयोग यांना सादर करण्यात येणार आहे, त्यामुळे संबंधितांनी ही माहिती अचूक सादर क

नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदाचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नगरपरिषदांच्या संकेतस्थळावर 01 जुलै रोजी होणार प्रसिध्द

  अलिबाग,दि.30 (जिमाका):-   राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि.09 जून 2022 आदेशान्वये राज्यातील माहे एप्रिल 2020 ते मार्च 2022 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या तसेच मुदत समाप्त होणाऱ्या व नवनिर्मित अशा एकूण 207 नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 2022 जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमातील टप्पा क्र.7 नुसार कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडील अंतिम मान्यतेनंतर नगरपरिषदेच्या सदस्य पदांच्या आरक्षणाची (अधिसूचना कलम 10 नुसार) रहिवाश्यांच्या माहितीसाठी वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषदांच्या वेबसाईटवर शुक्रवार, दि.01 जुलै 2022 पर्यंत प्रसिध्द करण्याबाबत आदेशित केले आहे. राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील आदेशातील कार्यक्रमानुसार विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, कोकण भवन यांच्याकडील दि.29 जून 2022 अन्वये रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या आरक्षणास अंतिम मान्यता देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश विचारात

पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत तळा, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, रोहा तालुक्यातील पर्यटन विकासासाठी रु.20 कोटी 37 लक्ष निधीस प्रशासकीय मंजूरी तर रु.16 कोटी 22 लक्ष निधी वितरीत

Image
अलिबाग, दि.29 (जिमाका):-  कोकणातील ग्रामीण भागातील भूमीपुत्रांना त्यांच्या गावात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच कोकणातील विकास कामांची गती वाढविणे, ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाचा विकास होणाऱ्या गावांमध्ये पर्यटनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे व पर्यायाने गावांचा विकास करणे, या उद्देशाने राज्य शासनाने  “ प्रादेशिक पर्यटन विकास ”  ही योजना घोषित केली. या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्यासाठी रु.20 कोटी 37 लक्ष निधी मंजूर करण्यात यश मिळाले आहे. यापैकी रु.16 कोटी 22 लक्ष निधी शासनाकडून वितरितही करण्यात आला आहे. रायगड जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा जिल्हा मानला जातो. या जिल्ह्याला भरभरून निसर्गसंपदा लाभली आहे. जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकास व्हावा, येथील पर्यटनाला चालना मिळावी, स्थानिकांना त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे अविरत प्रयत्न सुरू असून त्या दृष्टीने रायगड व त्याकरिता ला

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हा शल्यचिकित्सक प्रशासकीय इमारत व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ग्रंथालय व व्याख्यान कक्ष इमारतीचे उद्घाटन संपन्न

Image
अलिबाग, दि.29 (जिमाका):-  अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले, ते केवळ सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच, याचा लाभ जिल्ह्यातील सर्व जनतेला निश्चित होईल, असे प्रतिपादन  पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले. अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय येथील जिल्हा शल्यचिकित्सक प्रशासकीय इमारत व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ग्रंथालय व व्याख्यान कक्ष इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजय सोनुने, सहाय्यक अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे आदी मान्यवर उपस्थित होते. त्या पुढे म्हणाल्या, हे  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्यासाठी सर्वांनी अथक परिश्रम घेतले व त्याचे फलित म्हणूनच आजचा दिवस आपण पाहत आहोत. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार

कर्जत तहसिलमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष

  अलिबाग, दि.29 (जिमाका):-  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार कर्जत तहसिल कार्यालय येथे आपत्ती व्यवस्थापन व आपत्ती निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामध्ये तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या दुर्घटनांबाबत सूचना देण्याकरिता तसेच अनुषंगिक माहितीसाठी या कार्यालयाच्या भ्रमणध्वनी- 9373922909 व दूरध्वनी- 02148-222037 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कर्जत तहसिलदार विक्रम देशमुख यांनी केले आहे. 00000

मौजे करंजखोल येथे दरडग्रस्त भागांची अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी केली पाहणी

Image
  अलिबाग, दि.29 (जिमाका):-  मौजे करंजखोल येथे दरडग्रस्त भागांची अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी पाहणी केली. तिथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांशी दरडीच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांची चर्चा केली. या भेटीदरम्यान महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशीद, सरपंच श्री.उतेकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांना अपर जिल्हाधिकारी श्री.यादव यांनी पावसाचा ऑरेंज अलर्ट किंवा रेड अलर्ट आला असल्यास तात्काळ गावातील काही तरुण मंडळींचा गट स्थापन करून संभाव्य दरडग्रस्त भागातील घरांची विभागणी करून दहा ते पंधरा घरांचा एक गट तयार करून तिथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी पथक तयार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिल व उपविभागीय कार्यालय यांच्याशी संपर्कात राहण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 00000    

दिलीप पाटील यांची एमपीएससीत “गरुडझेप”; “कर सहाय्यक” व “मंत्रालय लिपिक” पदाच्या पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण

Image
  अलिबाग, दि.29 (जिमाका):-  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या  “ गरुडझेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ”  केंद्रातील धोकवडे येथील सदस्य, माजी सैनिक दिलीप बाळकृष्ण पाटील हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या गट-क मधील  “ कर सहाय्यक ”  व  “ मंत्रालय लिपिक ”  या पदाच्या पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. श्री.दिलीप पाटील यांनी या यशाबद्दल जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे विशेष आभार मानून जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या  “ गरुडझेप स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र ”  व  “ गरुडझेप ॲप ”  या उपक्रमांचा लाभ घेण्याचे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवाहन केले. या यशाकरिता जिल्हा प्रशासनातर्फे अलिबाग तहसिलदार श्रीमती मीनल दळवी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.   00000

पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

  इच्छुकांनी लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन   अलिबाग, दि.29 (जिमाका):-  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड अलिबाग या कार्यालयामार्फत  “ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ”  च्या निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यातील कुशल / अकुशल उमेदवारांसाठी दि.30 जून 2022 या कालावधीत सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 या वेळेत ऑनलाईन रोजगार मेळावा-01 चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी  https://www.rojgar.mahaswayam. gov.in  या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर या वेबपोर्टलवरील Employment-Job Seeker (Find a Job)-Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील आपली सर्व माहिती अद्यावत करावी. तसेच ज्या उमेदवारांनी या विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी  https://www.rojgar.mahaswayam. gov.in  या वेब पोर्टलवर Employment-Job Seeker (Find a Job)-Register या ऑप्शन्सवर क्लिक करुन सर्व अद्यावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी, नोंदणी

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 23 मि.मी. पावसाची झाली नोंद

    अलिबाग,दि.29 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 23.60 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 291.37 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग- 68.00 मि.मी., पेण-46.00 मि.मी., मुरुड- 16.00 मि.मी., पनवेल- 13.00 मि.मी., उरण- 12.00 मि.मी., कर्जत- 8.40 मि.मी., खालापूर- 10.00 मि.मी., माणगाव- 16.00 मि.मी., रोहा- 10.00 मि.मी., सुधागड-30.00 मि.मी., तळा- 21.00 मि.मी., महाड-22.00 मि.मी., पोलादपूर- 12.00 मि.मी, म्हसळा-40.00 मि.मी., श्रीवर्धन- 17.00 मि.मी., माथेरान- 36.20 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 377.60 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 23.60 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 9.89 टक्के इतकी आहे. 00000

विशेष लेख: सुरु झाला पावसाळा..तर मग सूचना पाळा..आपत्ती टाळा..!

Image
  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याकडून नागरी/शहरी पूर आपत्ती प्रसंगी पूर्वतयारी व प्रतिबंधक उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून, काय आहेत मार्गदर्शक सूचना जाणून घेवूया लेखातून… v    प्रत्येक राज्यांमध्ये उच्चतम पूर पातळी ठरविणे. v    प्रत्येक शहरामध्ये तांत्रिकदृष्ट्या सक्षम समन्वय अधिकाऱ्यासह (नोडल ऑफिसर) नागरी पूर/पूर व्यवस्थापन यंत्रणा स्थापित करणे. v    प्रत्येक शहराने खालील परिस्थिती विचारात घेऊन नागरी पूर व्यवस्थापन आणि उपक्षमन यासाठी प्रमाणित कार्यपध्दती (SOP) लागू करावी. i) किनारवर्ती शहरे, ii) मुख्य / मोठ्या नदी किनान्यावरील शहरे, iii) धरणांजवळील/जलाशयांजवळील शहरे, iv) अंतर्गत शहरे, v) डोंगराळ प्रदेशातील शहरे, शहरांना वरीलप्रमाणे एक किंवा अनेक वैशिष्ट्ये असू शकतात. v    नागरी पूर व्यवस्थापनासाठी सर्व भागीदारांची क्षमता बांधणी व उत्तम समन्वयासाठी मान्सूनपूर्व कार्यशाळेचे आयोजन करणे, v    माहिती जनसंपर्क आणि शिक्षण, प्रत्येक शहराने पूर्वतयारीसह स्थानिक कल्याणकारी प्राधिकारी किंवा अन्य समाजगटांची प्रभागनिहाय यादी तयार ठेवावी व स

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक आपत्ती उपाययोजनांबाबत आढावा बैठक संपन्न

Image
अलिबाग,दि.27 (जिमाका):-  आगामी मान्सून कालावधीच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक आपत्ती उपाययोजना तसेच इतर विकासकामांबाबत आढावा बैठक जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उप वनसंरक्षक आशिष ठाकरे, पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉ.गणेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे व विविध शासकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील वीज पुरवठा, सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट, पूल दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, वाहतूक, कृषी बागायतदारांना नुकसान भरपाई, आरोग्य, नैसर्गिक आपत्ती प्रसंगी उपयोगी पडणारी तात्पुरती निवारागृहे, धोकादायक ठिकाणे व तेथील उपाययोजना, पोलीस व स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण कक्ष, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा आदी विषयांबाबत सविस्तर आढावा घेतला. नैसर्गिक आपत्तीत सर्व यंत्रणांनी सतर्क व सुसज्ज राहावे, आपापसात योग्य तो समन्वय