पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत तळा, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, रोहा तालुक्यातील पर्यटन विकासासाठी रु.20 कोटी 37 लक्ष निधीस प्रशासकीय मंजूरी तर रु.16 कोटी 22 लक्ष निधी वितरीत


अलिबाग, दि.29 (जिमाका):- कोकणातील ग्रामीण भागातील भूमीपुत्रांना त्यांच्या गावात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच कोकणातील विकास कामांची गती वाढविणे, ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाचा विकास होणाऱ्या गावांमध्ये पर्यटनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे व पर्यायाने गावांचा विकास करणे, या उद्देशाने राज्य शासनाने प्रादेशिक पर्यटन विकास ही योजना घोषित केली. या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्यासाठी रु.20 कोटी 37 लक्ष निधी मंजूर करण्यात यश मिळाले आहे. यापैकी रु.16 कोटी 22 लक्ष निधी शासनाकडून वितरितही करण्यात आला आहे.

रायगड जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा जिल्हा मानला जातो. या जिल्ह्याला भरभरून निसर्गसंपदा लाभली आहे. जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकास व्हावा, येथील पर्यटनाला चालना मिळावी, स्थानिकांना त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे अविरत प्रयत्न सुरू असून त्या दृष्टीने रायगड व त्याकरिता लागणारा निधी शासनाकडून मिळविण्याकरिता त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या या प्रयत्नांतूनच शासनाकडून जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासकामांसाठी तब्बल 20 कोटी 37 लाख 85 हजार रुपयांच्या विविध विकासकामांना शासनाची प्रशासकीय मान्यता मिळवून त्यापैकी 16 कोटी 22 लाख 52 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचे आदेश प्राप्त करून घेण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. राज्याच्या पर्यटन विकासासाठी प्राधान्याने सकारात्मक भूमिका घेणारे राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे राज्यमंत्री कु.तटकरे यांनी आभार मानले आहेत.

त्याची माहिती पुढीलप्रमाणे:-

कुडा लेणी, ता.तळा येथील पर्यटन मूलभूत सोयीसुविधा निर्माण करणे (प्रशासकीय मान्यता - रु.2 कोटी, वितरीत रक्कम – रु.1 कोटी 50 लाख),

देवकुंड, ता.माणगाव येथे पर्यटन सुविधा निर्माण करणे (प्रशासकीय मान्यता - रु.2 कोटी, वितरीत रक्कम – रु.1 कोटी 50 लाख),

श्रीवर्धन समुद्र किनारी अस्तित्वात असलेल्या धूप प्रतिबंधित बंधाऱ्याचे सुशोभिकरण करणे (प्रशासकीय मान्यता - रु.1 कोटी, वितरीत रक्कम – रु.60 हजार),

श्रीवर्धन शहरातील विविध ठिकाणी सुशोभीकरण पॉईंटची निर्मिती करणे (प्रशासकीय मान्यता - रु.25 लाख, वितरीत रक्कम – रु.25 लाख),

श्रीवर्धन नगरपरिषदेचे पर्यटक निवास इमारतीचे नूतनीकरण करणे (प्रशासकीय मान्यता - रु.12 लाख 75 हजार, वितरीत रक्कम – रु.12 लाख 75 हजार),

श्रीवर्धन मुख्य कमानी पासून समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करणे (प्रशासकीय मान्यता - रु.74 लाख 42 हजार, वितरीत रक्कम – रु.52 लाख),

श्रीवर्धन येथील भुवनाळे तलावाचे नूतनीकरण व सुशोभिकरण करणे (प्रशासकीय मान्यता - रु.49 लाख 96 हजार, वितरीत रक्कम – रु.49 लाख 96 हजार),

श्रीवर्धन येथील आ.ती.डॉ.श्री जिवनेश्वर कुंडाचे नूतनीकरण व सुशोभिकरण करणे (प्रशासकीय मान्यता - रु.49 लाख 9 हजार, वितरीत रक्कम – रु.49 लाख 9 हजार),

म्हसळा नगरपंचायत हद्दीत धार्मिक व सार्वजनिक स्थळे येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे (प्रशासकीय मान्यता - रु.1 कोटी 64 लाख 91 हजार, वितरीत रक्कम – रु.1 कोटी 15 लाख),

म्हसळा तालुक्यातील जासई नदीकिनारा विकसित व सुशोभिकरण करणे (प्रशासकीय मान्यता - रु.5 कोटी, वितरीत रक्कम – रु.4 कोटी),

दिवेआगार येथे केदारलिंग भैरव मंदिर सभा मंडप बांधणे (प्रशासकीय मान्यता - रु.69 लाख 36 हजार, वितरीत रक्कम – रु.69 लाख 36 हजार),

दिवेआगार येथे सिद्धनाथ भैरव मंदिर सभा मंडप बांधणे (प्रशासकीय मान्यता - रु.69 लाख 36 हजार, वितरीत रक्कम – रु.69 लाख 36 हजार),

देवखोल येथील कुसुमेश्वर मंदीर परिसर विकास करणे (प्रशासकीय मान्यता - रु.1 कोटी, वितरीत रक्कम – रु.70 लाख),

रोहा नगरपरिषद हद्दीतील कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पातील शिवसृष्टी परिसर सुशोभिकरण करणे (प्रशासकीय मान्यता - रु.1 कोटी 78 लाख, वितरीत रक्कम – रु.1 कोटी 50 लाख),

रोहा येथील शिवसृष्टीच्या परिसरात आरामदायी आणि गोल शिल्प तयार करणे (प्रशासकीय मान्यता - रु.2 कोटी 45 लाख, वितरीत रक्कम – रु.2 कोटी).

अशा प्रकारे एकूण 20 कोटी 37 लाख 85 हजार रुपयांच्या रायगड जिल्ह्यातील पर्यटनासंबंधीत विविध विकासकामांना शासनाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे आणि त्यापैकी 16 कोटी 22 लाख 52 हजार रक्कमेचे वितरण आदेशही देण्यात आले आहेत.

अशा प्रकारे जिल्ह्याचा विविध क्षेत्रातील विकास साधण्यासाठी पालकमंत्री या नात्याने कु.आदिती तटकरे या सतत कार्यरत आहेत. जिल्ह्यातील विविध विषयांबाबतच्या विकासकामांसाठी निधी मिळविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना राज्य शासनाकडून नेहमीच सहकार्य मिळत आले आहे, याकरिता पालकमंत्री कु.तटकरे यांनी राज्य शासनाचेही विशेष आभार मानले आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक