Posts

Showing posts from October 16, 2022

पालकांकडून अर्भकाला होणारा एचआयव्ही संसर्ग रोखण्यात शासन-प्रशासनास यश -उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील

Image
  अलिबाग, दि.21 (जिमाका):-  एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आलेल्या महिलांना समुपदेशन व योग्य एआरटी औषधोपचार व बालकांना नेव्हीरपीन सिरप देऊन बालकांना होणारा एचआयव्ही संसर्ग टाळता येऊन बालकांच्या व महिलांच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण होऊन त्या सर्वांना जीवन जगण्याचे बळ मिळते. पालकांकडून अर्भकाला होणार एचआयव्ही संसर्ग रोखण्यात शासन-प्रशासनाचे काम समाधानकारक असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांनी नुकतेच येथे केले. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय या विभागाची जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण समितीची, जीपा व एएमटीसीटी याबाबतची सन 2022-23 मधील प्रथम व द्वितीय सत्राच्या त्रैमासिक आढावा सभा रायगड जिल्हाधिकारी बैठक सभागृहामध्ये जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्या, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील, जिल्हा कार्यक्रम

कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांना पनवेल मिशन वात्सल्य समितीकडून दिवाळीनिमित्त विविध वस्तूंचे वाटप

Image
  अलिबाग, दि.20 (जिमाका):-  कोविड-19 मुळे आई-वडील असे दोन्ही पालक गमावलेल्या चार अनाथ बालकांपैकी अनिकेत बाबू दडस (वय 17 वर्षे), स्वर्णिम अश्विन काकडे (वय 4 वर्षे) या दोन अनाथ बालकांना जिल्हाधिकारी तथा मिशन वात्सल्य समिती, रायगड चे अध्यक्ष डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समिती पनवेल, ग्राम स्वराज्य समिती महाराष्ट्र, रोटरी क्लब, हिंदाल्को कंपनी, युवा स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत दिवाळी सणानिमित्त मिठाई, फराळ, शालेय साहित्य आदी वस्तूंचे वाटप तहसिल कार्यालयात तहसिलदार तथा पनवेल मिशन वात्सल्य समितीचे अध्यक्ष विजय तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी राज कृष्णा पाटील (वय 15 वर्ष), सलोनी कृष्णा पाटील (वय 13 वर्षे) ही अनाथ भावंडे तहसिल कार्यालयात उपस्थित राहू न शकल्यामुळे मिशन वात्सल्य समिती पनवेल यांनी याची दखल घेत त्यांच्या घरी जावून मिठाई, फराळ, शालेय साहित्य आदी वस्तूंचे वाटप केले. याप्रसंगी बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री.चेतन गायकवाड. विस्तार अधिकारी श्रीमती वैशाली वैदू, हिंदाल्को कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री.लहू रौंधाल, ग्राम स्वराज्य समिती

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

  अलिबाग,दि.20(जिमाका):-  खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता दि.21 ऑक्टोबर 2022 अखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तथापि, ऑनलाईन पोर्टलवरील माहितीनुसार, मागील हंगामांचा विचार करता शेतकरी नोंदणी पूर्ण झाली नसल्याचे दिसते. या बाबीचा विचार करता, पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता, दि.10 नोव्हेंबर, 2022 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी याची नोंद घेवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चालू वर्षाचा 7/12, चालू बँक खाते व स्पष्ट दिसणारे आधारकार्ड यासह आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता खरेदी केंद्रावर स्वत: येवून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके व जिल्हा पणन अधिकारी केशव ताटे यांनी केले आहे. 00000

भारतीय उद्योजकता विकास संस्था, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांना करणार आत्मनिर्भर -महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या

  अलिबाग, दि.20 (जिमाका):-  भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआयआय) व टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड, मुंबई तसेच जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथे दिव्यांगांकरिता एक महिना कालावधीचा उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम जिल्हा उद्योग केंद्र सभागृह, अलिबाग येथे दि.18 ऑक्टोबर 2022 रोजी संपन्न झाला. या प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण प्रसंगी भारतीय उद्योजकता विकास संस्था, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांना आत्मनिर्भर करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या यांनी केले. भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआयआय) व टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड मुंबई द्वारा उदया प्रकल्पांतर्गत अलिबाग तालुक्यातील दिव्यांगांकरिता उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये व्यवसायाच्या विविध संधींची ओळख, संवाद कौशल्य, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, शासकीय कर्ज योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल तयार करणे, क्षेत्र भेट, बाजारपेठ

प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना अंबिया बहार 2022-23 चा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा

  अलिबाग, दि.20 (जिमाका):-  आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना शासनाने आंबा व काजू पिकांसाठी पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सुरू केलेली आहे. रायगड जिल्ह्याकरीता भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई ही कंपनी नेमलेली आहे. यांतर्गत नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळते. अर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी (आंबा व काजू) योजना एैच्छिक आहे. या योजनेंतर्गत जोखमीच्या बाबींमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीस नमूद कालावधी पर्यंत विमा संरक्षण दिले जाईल. फळपिक:-  काजू,  समाविष्ट धोके:-  1) अवेळी पाऊस (विमा संरक्षण कालावधी- दि.1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी), विमा संरक्षित रक्कम:- रु.1 लाख, 2) कमी तापमान (विमा संरक्षण कालावधी- दि.1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी), विमा संरक्षित रक्कम:- रु.1 लाख, 3) गारपीट (विमा संरक्षण कालावधी- दि.1 जानेवारी ते 30 एप्रिल), विमा संरक्षित रक्कम:- रु.33 हजार 333,  विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख:-  30 नोव्हेंबर 2022. फळपिक:-  आंबा,  समाविष्ट धोके:-  1) अवेळ

जिल्हा टी.बी.फोरम समन्वय समितीची आढावा बैठक संपन्न

Image
अलिबाग, दि.19 (जिमाका):-  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या जिल्हा टी.बी.फोरम समन्वय समितीची व जिल्हा कोमॉर्बिडीटी समन्वय समितीची सभा उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच पार पडली. यावेळी जिल्ह्यातील क्षयरुग्णांची स्थिती, त्यांच्याकरिता असणाऱ्या योजनांची माहिती, त्यांना आर्थिक लाभ घेताना (DBT) त्यात येणाऱ्या अडचणी, नि:क्षय मित्र याविषयी माहिती देण्यात आली. प्रधानमंत्री टी.बी. मुक्त अभियान या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात दि.9 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आली. या योजनेद्वारे क्षयरुग्णांना उपचार सुरू असेपर्यंत त्यांना दत्तक घेऊन पोषक आहार व सकस आहार वाटप करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी नि:क्षय मित्र होऊन क्षयरुग्णांना सहाय्य करावे, असे आवाहन करणारे परिपत्रक जारी केले होते. या आवाहनास जिल्ह्यातील विविध क्षेत्रांनी उत्तम प्रतिसाद दिला. जिल्ह्यात आतापर्यंत दहा नि:क्षय मित्र झाले असून,

महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील समान संधी केंद्राचे समाज कल्याण आयुक्त डॉ.नारनवरे यांच्या हस्ते उद्घाटन

Image
अलिबाग, दि.19 (जिमाका):-  डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड येथे दि.18 ऑक्टोबर 2022 रोजी समाज कल्याण, आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते समान संधी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी सांगितले की, समान संधी केंद्राच्या माध्यमातून भारत सरकार शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती योजना, परराज्य शिष्यवृत्ती योजना, स्वाधार योजना, स्टॅण्ड अप इंडिया योजना, जात प्रमाणपत्र पडताळणी, करिअर मार्गदर्शन इत्यादींबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, या उद्देशाने समान संधी केंद्र सुरु करण्यात आले आहे. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे चे महासंचालक धम्मज्योती गजभिये, समाजकल्याण कोकण विभाग प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुनील जाधव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड प्राचार्य श्री.शेजुळ, उपप्राचार्य श्री. सोनार, श्री.पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह महाड गृहपाल श्री.मोरे, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. 00000

जिल्ह्यातील 29 हजार 159 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर लाभ

  अलिबाग, दि.18 (जिमाका):-  राज्य सरकारने सन 2019 मध्ये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. त्‍यातील पुढील टप्प्यात शासनाने दि.29 जुलै 2022 रोजी नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची योजना जाहीर केली आहे. त्यानुसार सन 2017-18, सन 2018-19, सन 2019-20 या तीन वर्षापैकी कोणत्याही दोन वर्षात नियमित परतफेड करणाऱ्यांसाठी ही योजना आहे. तीन वर्षात किमान दोन वर्ष नियमित हप्ते फेडणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50 हजारापर्यंतचा लाभ शेतकऱ्याचे बँक खातेत थेट जमा होणार आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांची यादी राज्य सरकारने दि.14 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिध्द केली आहे. शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणानंतर ही रक्कम बचत खात्यावर वर्ग होईल. रायगड जिल्ह्यातील एकूण 29 हजार 159 कर्जदारांची माहिती राज्य सरकारच्या पोर्टलवर देण्यात आली आहे. यामध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 28 हजार 652 आणि राष्ट्रीयकृत बँकांतील 507 कर्जदारांचा समावेश आहे.  त्यातील पहिल्या टप्प्यात 13 हजार 300 लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात लाभ मिळणाऱ्यांच्या याद्या विविध कार्

महिलांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर महिन्याच्या तिसऱ्या तर तालुकास्तरावर महिन्याच्या चौथ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

  अलिबाग, दि.18 (जिमाका):-  महिलांचे प्रश्न तसेच समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर महिन्याच्या तिसऱ्या तर तालुकास्तरावर महिन्याच्या चौथ्या सोमवारी  “ महिला लोकशाही दिन ”  राबविण्यात येतो. सर्व स्तरातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणींची सोडवणूक करण्यासाठी व पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी महिला लोकशाही दिन राज्य, विभागीय, जिल्हा आणि तालुका पातळीवर राबविण्यात येतो. जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात सकाळी 11 वाजता सदर दिन चे आयोजन करण्यात येते. यादिवशी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. यासाठी समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह

सामाजिक न्याय विभागाचा 90 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

  अलिबाग, दि.18 (जिमाका):-  समाज कल्याण विभागाच्या स्थापनेस दि.15 ऑक्टोबर 2022 रोजी 90 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड कार्यालयाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अलिबाग येथे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील कर्मचारी, मुलांचे शासकीय वसतिगृह, अलिबाग येथील प्रवेशित व मुलींचे शासकीय वसतिगृह, अलिबाग येथील प्रवेशित उपस्थित होते. या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी श्री.अरुण उंडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक (नागरी हक्क संरक्षण शाखा, अलिबाग पोलीस ठाणे) श्री.विजय महाजन, व सेवानिवृत्त प्राध्यापक (जेष्ठ नागरिक) श्री.जोगळेकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम व कर्मवीर दादासाहेब गायकवाड या

“समग्र रायगड” कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

Image
अलिबाग, दि.17 (जिमाका):-  जिल्ह्यातील प्राचीन लेणी, गड किल्ले, समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्ट्स, धरणे, बंदरे, धबधबे-गिरीस्थाने, अभयारण्य, ऐतिहासिक-धार्मिक स्थळे अशा पर्यटन स्थळांसोबतच उद्योग-कारखाने, स्थानिकांच्या सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण योजना, पर्यटकांसाठी मार्गदर्शक नकाशे, अशा उपयुक्त माहितीचे संकलन असलेल्या जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या  “ समग्र रायगड - पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण ”  या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आज मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाले. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत तसेच राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, रायगड जिल्हाधिकारी तथा प्रभारी कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर आदी मान्यवर उपस्थित होते. हे कॉफी टेबल बुक तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, रायगड जिल्हा माहिती अधिक