सामाजिक न्याय विभागाचा 90 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 

अलिबाग, दि.18 (जिमाका):- समाज कल्याण विभागाच्या स्थापनेस दि.15 ऑक्टोबर 2022 रोजी 90 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड कार्यालयाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अलिबाग येथे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील कर्मचारी, मुलांचे शासकीय वसतिगृह, अलिबाग येथील प्रवेशित व मुलींचे शासकीय वसतिगृह, अलिबाग येथील प्रवेशित उपस्थित होते.

या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी श्री.अरुण उंडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक (नागरी हक्क संरक्षण शाखा, अलिबाग पोलीस ठाणे) श्री.विजय महाजन, व सेवानिवृत्त प्राध्यापक (जेष्ठ नागरिक) श्री.जोगळेकर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची दि.15 ऑक्टोबर 2022 रोजी जयंती असल्याने, त्यांच्याही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी कार्यालय अधिक्षक श्रीमती माधुरी पाटील यांनी सामाजिक न्याय विभागाची प्राथमिक माहिती उपस्थितांना दिली.

त्यानंतर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती दिली. रायगड जिल्हा परिषदेचे प्र. जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितिन मंडलिक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय महाजन यांनी नागरी हक्क संरक्षण योजनेसंबंधी उपस्थितांना माहिती दिली. यानंतर मुख्य अतिथी उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सेवा पंधरवडा कार्यक्रमाच्या पुस्तिकेचे अनावरण व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त प्राध्यापक श्री.जोगळेकर, भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी, दिव्यांग लाभार्थी व वसतिगृह प्रवेशित यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक देवून सत्कार करण्यात आला.

त्यानंतर वसतिगृह प्रवेशित कु.विजय रामा उघडे यांनी त्याचे मनोगत व्यक्त केले. सदर मनोगतात त्यांनी वसतिगृहातील प्रवेश व जीवनाबददल विवेचन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे व्याख्याते सेवानिवृत्त प्राध्यापक श्री.जोगळेकर यांचे प्रबोधनपर व्याख्यान झाले.

या व्याख्यानामध्ये त्यांनी वसतिगृह प्रवेशितांना उपयुक्त अशी राष्ट्रपुरुषांच्या कार्याची महती सांगितली. मुलींचे शासकीय वसतिगृह, अलिबाग येथील प्रवेशित कु.मानसी नागांवकर हिने उपस्थित मान्यवर, अधिकारी-कर्मचारी व वसतिगृहाच्या मुलामुलींचे आभार मानले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक