Posts

Showing posts from December 20, 2020

जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांनी मानीव अभिहस्तांतरण मोहिमेचा लाभ घ्यावा

    अलिबाग,जि.रायगड दि.24 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भाग मिळून एकूण 4 हजार 75 गृहनिर्माण संस्था असून या संस्थांपैकी विकासक, बिल्डर, जागामालक यांच्या असहकार्यामुळे संस्थांचे अभिहस्तांतरण खूपच अल्प प्रमाणात झालेले आहे. वास्तविक पहाता सहकारी संस्था नोंदणी झाल्यानंतर 4 महिन्यात विकासकानी संस्थेच्या इमारतीचे अभिहस्तांतरण करुन देण्याची जबाबदारी विकासक यांची असूनदेखील विकासक यांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले असल्यामुळे गृहनिर्माण संस्था अभिहस्तांतरणापासून वंचित राहिलेल्या आहेत.                  शासनाने या बाबतीत इमारतीचे मानीव अभिहस्तांतरण करण्यासाठी मोलाचा वाटा उचलून विकासक यांना बाजूला ठेवून गृहनिर्माण संस्थांना मानीव अभिहस्तांतरण करण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे. शासन अधिसूचना क्रमांक 129 दिनांक 27 सप्टेंबर 2010 तसेच शासन निर्णय क्रमांक माहस-2008/प्र.क्र.24/भाग-2/दुवपू-2 दिनांक 25 फेब्रुवारी 2011 अन्वये महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकाबाबत अधिनियम 1963 मध्ये दिनांक 25 फेब्रुवारी 2008 रोजी सुधारणा करण्यात आलेले आहेत व त्यांना सदर अधिनियमातील कलम 5,10 व

दि.31 जानेवारी पर्यंत अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करुन घ्या

  अलिबाग,जि.रायगड दि.24 (जिमाका) :- रायगड जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाऱ्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना व इतर योजनांमध्ये अनधिकृत नळ कनेक्शनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले आहे. बऱ्याच ठिकाणी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अथवा त्यासाठीची अनामत रक्कम व पाणीपट्टी न भरताच अनधिकृतरित्या नळ कनेक्शन घेऊन त्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या लाभधारकांनी असे अनधिकृत नळ कनेक्शन घेतले आहेत, त्यांनी ते नळ कनेक्शन लोकवर्गणी व दंडाची रक्कम भरून अधिकृत करून घेण्याची किंवा तसे न केल्यास अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे.     ज्या ठिकाणी अशी अनधिकृत नळ कनेक्शन घेण्यात आली आहेत, अशी अनधिकृत नळ कनेक्शन रक्कम रु.5000/- लोकवर्गणी मधून अनामत रक्कम आणि दंडाची रक्कम रु.1000/- दि.31 जानेवारी 2021 पर्यंत आपल्या क्षेत्र हद्दीतील उप अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, रायगड जिल्हा परिषद, उपविभाग यांच्या कार्यालयात भरणा करावी व अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावे. मात्र दि. 21 जानेवारी 2021 पर्यंत ल
Image
  अलिबाग,जि.रायगड दि.24 (जिमाका) :- सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांनी दिलेल्या दि. 25 एप्रिल 2020 रोजीच्या मार्गदर्शिकेप्रमाणे संपूर्ण देशात प्रत्येक जिल्हा न्यायालयामध्ये मुख्य प्रवेशद्वारासमोर ई-सेवा केंद्र स्थापन करणेबाबत कळविले होते. केंद्रीय प्रकल्प समन्वयक, उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडील दि. 09 मे 2020 रोजीच्या आदेशानुसार जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग येथे मुख्य प्रवेशद्वारावर मंगळवार दि.22 डिसेंबर 2020 रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विभा प्र. इंगळे यांच्या हस्ते ई-सेवा केंद्राचे उद्घाटन झाले.       यावेळी अलिबाग मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा सरकारी वकिल व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. न्यायालयीन प्रशासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या ऑनलाईन सुविधांमुळे न्यायालयातील प्रकरणाची माहिती घेणे आता पक्षकारांना अधिक सोईचे होणार आहे. ई-सेवा केंद्र न्यायालयीन कामकाजाच्या वेळेपर्यंत सुरू राहणार आहे.         तरी ई-सेवा सुविधांचा पक्षकारांनी व वकीलांनी लाभ घ्यावा,असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती विभा प्र. इंगळे यांनी केले आहे.       या ई-सेवा केंद्रामार

पेट शॉप व डॉग ब्रीडिंग सेंटर यांना महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळामार्फत नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे बंधनकारक

  अलिबाग,जि.रायगड दि.22 (जिमाका) :- महसूल व वन आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसन विभागाच्या दि.31 मे 2020 च्या शासन निर्णयानुसार निर्बंध शिथिल करणे व टाळेबंदी टप्म्याटप्प्याने उठविण्याच्या अनुषंगाने माहे-ऑगस्ट 2020 मध्ये सर्व पेट शॉप व डॉग ब्रीडिंग सेंटर यांना महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळामार्फत नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे आवश्यक होते. परंतु अद्यापही नोंदणी न करताच अजूनही काही ठिकाणी पेट शॉप व व डॉग ब्रीडिंग सेंटर सुरूच ठेवल्याचे निदर्शनास आले आहे.             संबंधित पेट शॉप व व डॉग ब्रीडिंग सेंटर यांच्या मालकांनी तात्काळ प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करूनच दुकाने सुरु ठेवावीत, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त, पशुसंवर्धन महाराष्ट्र तथा सदस्य संचिव महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ यांनी महानगरपालिका,स्थानिक संस्था, पोलीस यंत्रणेसह इतर सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.   तसेच जिल्ह्यात अनोंदणीकृत असलेल्या पेट शॉप व व डॉग ब्रीडिंग सेंटर तात्काळ बंद करण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार संबंधित पेट शॉप व डॉग ब्रीडिंग सेंटर यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, अलिबाग

“युवा महोत्सव- जल्लोष तरुणाईचा 2020” चे ऑनलाइन आयोजन 26 डिसेंबर रोजी

              अलिबाग,जि.रायगड दि.22 (जिमाका) :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय,अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. 26 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे.                  या युवा महोत्सवामध्ये युवक-युवतींना आपल्या विविध सुप्त कला गुण प्रदर्शित करण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होत आहे.जिल्हास्तरावर प्रावीण्य मिळविणा-या युवा कलाकारांना   शासनाच्या वतीने आयोजित राज्य व राष्ट्रीय पातळीवरील युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात येणार असून युवा महोत्सवासाठी 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक / युवती सहभाग घेऊ शकतात.जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन स्पर्धात्मक पद्धतीने केले जाणार आहे.             कलाप्रकार:- लोकनृत्य, कलाकार संख्या- 20, वेळ मर्यादा मिनिटांमध्ये-15.   कलाप्रकार:- लोकगीत- कलाकार संख्या-06, वेळ मर्यादा मिनिटांमध्ये-07, कलाप्रकार:- एकांकिका (इंग्रजी/हिंदी), कलाकार संख्या-12, वेळ मर्यादा मिनिटांमध्ये-45, कलाप्रकार:- शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी), कलाकार संख्या-01, वेळ मर्यादा मिनिटांमध्ये-15,

आंतरराष्ट्रीय क्रीडा विधेयक बालेवाडी, पुणे येथे होणार स्थापित

  अलिबाग,जि.रायगड दि.22 (जिमाका) :- राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र अधिनियमाचे प्रारुप तयार करण्यासाठी, डॉ. खोले, माजी कुलगुरु, मुंबई विद्यापीठ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती.या समितीने अधिनियमाचे प्रारुप शासनास सादर केले.              आंतरराष्ट्रीय   क्रीडा   विद्यापीठ, महाराष्ट्र, 2020 लागू करण्याबाबत   मंत्रिमंडळाच्या दि. 09.12.2020 च्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानुसार याबाबतचे विधेयक (Bill) विधी मंडळाच्या दि. 14 व 15 डिसेंबर, 2020 रोजी झालेल्या अधिवेशनात ठेवण्यात आले. या विधेयकास विधीमंडळाच्या विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहांनी एकमताने मंजूरी दिली आहे.             आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, बालेवाडी पुणे येथे स्थापन करण्यात येणार आहे.हे विद्यापीठ सन 2021-22 या वर्षापासून कार्यान्वित करण्याचे नियोजित केले आहे.             राज्यात सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुण येथे सुरु आहे. या क्रीडा संकुलामध्ये विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स

शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलद्वारे विविध कृषी योजनांचा लाभ घ्यावा

  अलिबाग,जि.रायगड दि.22 (जिमाका) :- कृषी विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर “ शेतकरी योजना ” या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “ एकाच अर्जाद्वारे ” देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधूनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधारकार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.              महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ आहे.या संकेतस्थळावरील “ शेतकरी योजना ” हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट,सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून वरील संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर प्रमाणिक करुन घ्यावा लागेल.