आंतरराष्ट्रीय क्रीडा विधेयक बालेवाडी, पुणे येथे होणार स्थापित

 

अलिबाग,जि.रायगड दि.22 (जिमाका) :- राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र अधिनियमाचे प्रारुप तयार करण्यासाठी, डॉ. खोले, माजी कुलगुरु, मुंबई विद्यापीठ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती.या समितीने अधिनियमाचे प्रारुप शासनास सादर केले.    

         आंतरराष्ट्रीय  क्रीडा  विद्यापीठ, महाराष्ट्र, 2020 लागू करण्याबाबत  मंत्रिमंडळाच्या दि. 09.12.2020 च्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानुसार याबाबतचे विधेयक (Bill) विधी मंडळाच्या दि. 14 व 15 डिसेंबर, 2020 रोजी झालेल्या अधिवेशनात ठेवण्यात आले. या विधेयकास विधीमंडळाच्या विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहांनी एकमताने मंजूरी दिली आहे.

            आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, बालेवाडी पुणे येथे स्थापन करण्यात येणार आहे.हे विद्यापीठ सन 2021-22 या वर्षापासून कार्यान्वित करण्याचे नियोजित केले आहे.

            राज्यात सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुण येथे सुरु आहे. या क्रीडा संकुलामध्ये विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. या संकुलामध्ये यापूर्वी आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन उत्कृष्टरित्या पार पडले आहेत.

              महाराष्ट्र राज्याला क्रीडा क्षेत्राची फार मोठी परंपरा आहे. राज्यामध्ये वेगवेगळ्या खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर नावलौलिक मिळविणारे बरेच खेळाडू आतापर्यंत घडले आहेत व यापुढेही घडणार आहेत.

क्रीडा सुविधांचा दर्जा वाढविणे तसेच आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय खेळाडू घडविणे याबरोबरच क्रीडा क्षेत्रात विविध शाखांचे (Faculty) मध्ये अभ्यासक्रम सुरु करुन तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यानुषंगाने भविष्यात क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.

              यासाठी क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध फॅकल्टीज उदा. sports sciences, sports medicine, sports technology, sports governing, sports management, sports media and communication, sports coaching and training,  यामध्ये अभ्यासक्रम / कोर्सेस सुरु करण्याबाबत नियोजित आहे.

              या विद्यापीठाकरिता सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथील सुविधा उपयोगात आणण्यात येणार आहेत. पुढील कालावधीत या विद्यापीठाकरीता स्वतंत्र इमारत व अन्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाकडून टप्प्याटप्प्याने रु. 400.00 कोटी इतका निधी देण्यात येणार आहे.

            या विद्यापीठासाठी सध्याच्या आवश्यकतेनुसार 213 पदे (नियमित वेतनश्रेणीतील 166 पदे व ठोक वेतनावरील 47 पदे) निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये कुलगुरु, रजिस्ट्रार त्यांची कार्यालयीन पदे, शिक्षकीय पदे व प्रशासकीय पदे यांचा समावेश आहे. तसेच विशेष तज्ञ मानधनावर / करार पध्दतीने आमंत्रित करण्यात येणार आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक