Posts

Showing posts from January 24, 2021

उत्कृष्ट् कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री कु.आदिती तटकरेंच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी सत्कार

        अलिबाग, जि.रायगड,दि.28 (जिमाका):- जिल्हयातील पोलीस दलातील उत्कृष्ट् कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी विशेष सत्कार करण्यात आला. सत्कारार्थी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे- गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक-2021 :- 1) श्री.हेमंत काशिनाथ पाटील,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, वाचक शाखा,अलिबाग 2)राजेंद्र रमाकांत मांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, जिविशा बेस कर्जत. श्री.किरणकुमार चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी, रोहा यांनी गडचिरोली या जिल्ह्यामध्ये नक्षलग्रस्त विभागात 2 वर्षापेक्षा जास्त काळ कठीण व खडतर सेवा समाधानकारकपणे पूर्ण करुन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल   विशेष सेवा पदक कठीण व खडतर कामगिरीबद्दल विशेष सेवा पदक:- 1) श्री. अंकुश बाळू कोळेकर, पोलीस शिपाई, जलद प्रतिसाद पथक, पोलीस मुख्यालय,2) श्री.तेनेश सुनिल पाटील- पोलीस शिपाई, जलद प्रतिसाद पथक, पोलीस मुख्यालय, 3) श्री.बालाजी पांडुरंग भोसले- पोलीस शिपाई, जलद प्रतिसाद पथक, पोलीस मुख्यालय, 4)श्री.गणेश कृष्णा पाटील- प

प्रजासत्ताक दिनी क्रीडा पुरस्कारप्राप्त दोन जणांचा पालकमंत्री कु.आदिती तटकरेंच्या हस्ते सत्कार

         अलिबाग, जि.रायगड,दि.28 (जिमाका):- जिल्हयातील गुणवंत खेळाडू पुरस्कार, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार आणि गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन करून त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने जिल्हयातील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा कार्यकर्ता यांच्याकरिता शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार दिला जातो.      जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणे येथील श्री.संदिप प्रल्हाद गुरव व पनवेल येथील श्री.देविदास महादेव पाटील या पुरस्कारार्थी खेळाडूंना प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. श्री.संदिप प्रल्हाद गुरव यांनी थायलंड येथे होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड तसेच व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट् कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) हा पुरस्कार मिळविला आहे. तसेच श्री.देविदास महादेव पाटील अपंगत्वावर मात करुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम सर्वांना बरोबर घेऊन जाणारे --- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

Image
    अलिबाग,जि.रायगड,दि.25 (जिमाका):- कोविड संकटाशी मुकाबला करीत महाविकास आघाडी सरकार विकास कामांना चालना देत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम सर्वांना बरोबर घेऊन जाणारे असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास खात्याचे मंत्री ना.जयंत पाटील यांनी माणगाव येथील कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलताना व्यक्त केले.             माणगाव येथील जलसंपदा भवनाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज (सोमवार, दि.25 जानेवारी रोजी) जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना.जयंत पाटील यांच्या हस्ते व रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.                यावेळी आमदार भरतशेठ गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, सुरेश लाड, प्रभाकर उभारे, माणगाव पंचायत समिती सभापती अलका जाधव, नगराध्यक्षा योगिता चव्हाण, बाबूशेठ खानविलकर, शेखरशेठ देशमुख, नाजीमभाई हसवारे, इकबालशेठ धनसे, माणगाव तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव- दिघावकर, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा तहसिलदार मैनक घोष, दिपकशेठ जाधव, अँड.

सर्व मतदार बनू..“सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरुक” विविध कार्यक्रमांनी “राष्ट्रीय मतदार दिवस” झाला उत्साहात साजरा मतदारांनी जागरुकपणे मतदान करावे --- जिल्हाधिकारी निधी चौधरी

Image
    अलिबाग,जि.रायगड,दि.25 (जिमाका) :-     मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. मतदान करताना आपली सद्सद् विवेक बुध्दी जागृत ठेवून मतदान करुन लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी सहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी   यांनी आज येथे केले.             राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने जिल्हा नियोजन सभागृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपजिल्हाधिकारी (रोहयो), रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.), सर्जेराव म्हस्के पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक)   वैशाली माने, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, तहसिलदार   सचिन शेजाळ, दिव्यांग आयकॉन साईनाथ पवार, प्रिझम सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी   आदी मान्यवर उपस्थित होते.             जिल्हाधिकारी निधी चौधरी पुढे म्हणाल्या की, भारत निवडणूक आयोगाने तंत्रज्ञानाचा वापर ज्या नवनवीन सुविधा बनविल्या त्या सुविधांचा आपण मोठ्या प्रमाणात वापर करावा.   दि

पालकमंत्री आदिती तटकरेंनी जिल्हावासियांना दिल्या "राष्ट्रीय मतदार दिना" निमित्त शुभेच्छा

    अलिबाग,जि.रायगड,दि.25 (जिमाका) :-   पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील जनतेला ‘राष्ट्रीय मतदार दिना’च्या शुभेच्छा दिल्या असून देशातील लोकशाही व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक   युवक-युवतीने मतदारयादीत नाव नोंदविण्याचे आवाहन केले आहे.     लोकशाही व्यवस्थेत मतदार हाच खरा राजा असून घटनेने त्याला दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा त्याने सदुपयोग करायला हवा. प्रत्येक मतदाराने   त्याला मिळालेल्या मतदानाच्या अधिकारात विवेक बुद्धीने मतदान करून चांगले लोकप्रतिनिधी निवडून देणे, ही काळाची गरज आहे. मात्र मतदानाचा हक्क बजाविण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने मतदारयादीत आपले नाव असल्याची खात्री करायला हवी. स्थानिक स्वराज संस्था, विधानसभा, लोकसभा अशा प्रत्येक निवडणुकीत आपण मतदानाचा हक्क बजाविणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्यच आहे, त्यामुळेच देशाची लोकशाही सुदृढ होणार असल्याचे सांगून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी प्रत्येक नागरिकाने मतदारयादीत आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी तसेच मतदारयादीत नाव नसल्यास   मतदारयादीत नाव समाविष्ट करून घेण्याची कार्यवाही पूर्ण

कृषी विभागाची Autoreply व्हाट्सअप सुविधा कार्यान्वित

    अलिबाग, जि.रायगड,दि.25 (जिमाका):- कृषी विभागाच्या विविध योजना आणि उपक्रम यांची माहिती शेतकऱ्यांना मोबाईल मध्येच तात्काळ मिळावी, याकरिता व्हाट्सअप Autoreply ची सुविधा सुरू करण्यात आली आहे..       मोबाईलवर कृषी विभागाच्या योजनांची माहिती मिळविण्यासाठी 8010550870 या व्हाट्सअप क्रमांकावर नमस्कार किंवा Hello हा शब्द टाईप करून पाठविल्यास आपणास स्वागत संदेश प्राप्त होतो. त्यामध्ये कृषी विभागाच्या प्रचलित योजनांबाबत संक्षिप्त शब्द दिलेले आहेत.उदाहरणार्थ well, Mech, Hort.इत्यादी शब्द टाईप करून वरील क्रमांकावर पाठविल्यास आपणास पाहिजे असणाऱ्या योजनेची माहिती उपलब्ध होते.     तरी या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांनी केले आहे. 00000000

महाराष्ट्र पर्यटनावर आधारित ‘महा व्हिडिओग्राफी स्पर्धा’

  अलिबाग,जि.रायगड,दि.25 (जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत ‘महा व्हिडिओग्राफी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती, वारसा इत्यादी दर्शविणे आणि देश-विदेशातील पर्यटकांना राज्यात येण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्दिष्ट आहे.   या स्पर्धेत सर्व वयोगटातील तसेच छंदप्रेमी, हौशी, व्यावसायिक व्हिडिओग्राफर्स यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी केले आहे.      राज्यातील किल्ले, लेणी, वन्यजीव, समुद्रकिनारे, मुख्य धार्मिक स्थळे, वारसास्थळे आणि महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण बाबी यापैकी कोणत्याही विषयावर प्रवेशिका आधारित असणे आवश्यक आहे. निवडलेले व्हिडिओज महाराष्ट्र पर्यटनाच्या संकेतस्थळावर व सोशल मीडियावर प्रसिद्ध केले जातील. पर्यटन संचालनालयाच्या वतीने निवडलेल्या सहभागींना रोख बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात येतील. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी तसेच स्पर्धेच्या अटी जाणून घेण्यासाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाह

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 च्या माध्यमातून बेरोजगार उमेदवारांना नि:शुल्क कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार संधी

  अलिबाग,जि.रायगड,दि.25 (जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार   व उद्योजकता विभागाद्वारे राबविण्यात येणारी केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 च्या माध्यमातून बेरोजगार उमेदवारांना नि:शुल्क कौशल्य प्रशिक्षण व तदनंतर कौशल्य प्रमाणपत्र व रोजगार, स्वयंरोजगार संधी प्राप्त होणार आहे.     तरी कौशल्य प्रशिक्षण घेण्यास पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपली नोंदणी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSft8cX_DKR7jJG6407Dc7vh__Wttz0iTCmy0oHCUBhKPZe4w/viewform?usp=pp_url या लिंक च्या माध्यमातून करावी. तसेच ज्या उमदेवाराना ऑनलाईन लिंक च्या माध्यमातून नोंदणी करणे शक्य नसेल त्यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड अलिबाग वैभव निवास,भंडार आळी, चेंढरे, अलिबाग.येथे ऑफलाईन फॉर्म भरून नोंदणी करावी.   उमेदवारांनी नोंदणी केल्यानंतर संबंधित प्रशिक्षण संस्थेद्वारे आपली पात्रता व इच्छुकता तपासून आपली निवड अंतिम करण्यात येईल, असे   सहाय्यक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास, श्री.पवार यांनी कळविले आहे. 0000000