Posts

Showing posts from January 6, 2019

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11:- राज्याचे परिवहन, खारभूमी विकास मंत्री ना.दिवाकर रावते हे   शनिवार दि.12 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- शुक्रवार दि.11 रोजी सायंकाळी 6.20 वा. नागाव अलिबाग येथे आगमन व मुक्काम.   शनिवार दि.12 रोजी सकाळी साडेनऊ वा.नागाव अलिबाग येथून शासकीय मोटारीने सिध्दाश्रम, केतकीचा मळा, अलिबागकडे प्रयाण.   स.दहा वा. सिध्दाश्रम केतकीचा मळा येथे आगमन व राखीव.   स.सव्वा दहा वा. सिध्दाश्रम, केतकीचा मळा येथून शासकीय मोटारीने दत्ता पाटील विधी महाविद्यालय, अलिबागकडे प्रयाण.   स.साडे दहा वा. दत्ता पाटील विधी महाविद्यालय अलिबाग येथे आगमन व महर्षी विनोद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेस उपस्थिती.   स.10.45 वा. दत्ता पाटील विधी महाविद्यालय, येथून नागावकडे प्रयाण.   स.11.15 वा. नागाव येथे आगमन,राखीव व मुक्काम. रविवार दि.13 रोजी दुपारी तीन वा. नागाव येथून शासकीय मोटारीने मांडवाकडे प्रयाण.   दु.साडेतीन वा. मांडवा येथे आगमन व स्पीड बोटीने मुंबईकडे प्रयाण. 00000

अल्पसंख्याक समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचवा- उपाध्यक्ष ज.मो.अभ्यंकर

Image
   अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11:- शासन अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबवित असून या योजना अल्पसंख्याक समाजातील शेवटच्या घटकांपर्यत पोहचवाव्यात, असे प्रतिपादन अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष ज.मो.अभ्यंकर  यांनी आज येथे केले.  शासकीय विश्रामगृह अलिबाग येथील आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मागदर्शन करताना श्री.अभ्यंकर म्हणाले की, जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी शासन अनेक नाविण्यपूर्ण योजना राबवित असते. या योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचली पाहिजे.   या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.  यावेळी त्यांनी अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी आपल्या असलेल्या समस्यांची निवेदन दिली ती स्वीकारुन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगितले. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, शिक्षणाधिकारी श्रीमती दराडे तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.   00000

केंद्रीयमंत्री ना.अनंत गीते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10:- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गीते हे   दि.11 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- शुक्रवार दि.11 रोजी सकाळी दुपारी एक वा. इंदापूर ता.माणगाव येथे आगमन.   दु.तीन वा.इंदापूर येथून म्हसळाकडे प्रयाण. दु.चार वा. म्हसळा येथे आगमन.   सायं.चार ते सात पर्यंत स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती.     सायं. सात वा. म्हसळा येथून दिवेआगर ता.श्रीवर्धनकडे प्रयाण.    सायं.साडे सात वा.दिवेआगर येथे आगमन व मुक्काम. शनिवार दि. 12 रोजी सकाळी दहा वा. दिवेआगर येथून दिघीकडे प्रयाण.   10.45 वा. दिघी येथे आगमन.   दुपारी साडेबारा वा. दिघी येथून वाखळघरकडे प्रयाण.   दु.एक वा.वाखळघर येथे आगमन.   दु.साडे तीन वा. वाखळघर येथून दापोली जि.रत्नागिरीकडे प्रयाण. 00000

गोवर रुबेला लसीकरण मोहिम : जिल्ह्यात आजअखेर 5 लाख 86 हजार बालकांना लसीकरण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण अभियानात रायगड जिल्ह्यात बुधवार (दि.09 जानेवारी 2019) अखेर जिल्ह्यातील 5 लाख 86 हजार 799 बालकांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.   जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल (बुधवार दि.9) दिवसाअखेर जिल्ह्यातील 65 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 15 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 446 विद्यार्थ्यांना तर 50 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 6 हजार 746 विद्यार्थ्यांना अशा एकूण 7 हजार 192 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.   तर मोहिम सुरु झाल्यापासून आज अखेर एकूण 3 लाख 4 हजार 746 मुले   व 2 लाख 82   हजार 53 मुली असे एकूण 5 लाख 86 हजार 799 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी   माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी   डॉ.सचिन देसाई यांनी दिली आहे.   या अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य यंत्रणा 5658 शाळांपर्यंत पोहोचली

'सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा' बांधकाम कामगारांना शासनातर्फे पनवेल येथे विविध लाभांचे वाटप कामगारांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध- ना.संभाजीराव पाटील- निलंगेकर

Image
अलिबाग , जि. रायगड (जिमाका) दि. 10 :- इमारत बांधकाम कामगारांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शासन कटिबद्ध असून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना शिक्षण , आरोग्य , निवास या सुविधा पुरविण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाने २८ योजना तयार केल्या आहेत , असे प्रतिपादन राज्याचे कामगार , कौशल्य विकास व उद्योजकता कामगार , भूकंप पुनर्वसन माजी सैनिकांचे कल्याण मंत्री ना.संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी आज खांदेश्वर पनवेल येथे केले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील नोंदित बांधकाम कामगारांना लाभ वाटप सोहळा आज फोर कोर्ट एरिया , खांदेश्वर रेल्वे स्टेशन , खांदेश्वर , नविन पनवेल येथे ना.संभाजीराव  पाटील- निलंगेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास राज्याचे बंदरे , वैद्यकीय शिक्षण , माहिती तंत्रज्ञान , अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण , इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव , पनवेल महानगर पालिकेच्या महापौर डॉ.कविता चौतमोल , उपमहापौर विक्र

मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान धनंजय माळी यांची नांदगाव येथे भेट व पाहणी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.9- मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (VSTF) अंतर्गत नांदगांव ग्रामपंचायत क्षेत्रात महाराष्ट्र राज्य गृह निर्माण संचालक व ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्यकारी अधिकारी धनंजय माळी यांनी नांदगाव ता.सुधागड या गावात शनिवारी (दि.5) मुक्कामी राहून ग्रामस्थांशी संवाद साधला. या भेटीत माळी यांनी गावातच मुक्काम व सहभोजन करित रात्र सभेत आवास योजना,समाज परिवर्तन, वार्षिक उत्पन्न वाढण्यासाठीचे पर्याय,अशा अनेक विषयांवर ग्रामस्थांशी चर्चा केली विनोद मानेकर, सरपंच, ग्रामस्थ, ग्रामपरिवर्तक,ग्रामसेवक उपस्थित होते.यावेळी त्यांनी ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानाचे स्वयंमुल्यनिर्धारणाबाबत ग्रामपरिवर्तकांचा आढावा घेतला व अडचणी असलेल्या समस्या सोडविण्याचे नियोजन केले. तसेच गेल्या दिड वर्षात ग्रामविकास आराखडा नुसार झालेल्या कामांचाआढावा घेतला. गावातील भूमिहीन कुटुंबांना स्वयंरोजरासाठी कौशल्य विकासावर भर देऊन शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले. या दौऱ्यात माळी यांनी   शिवार फेरी केली. तसेच जलसंधारण ची कामे करण्यासंदर्भात पाहणी   केली.   या भेटी करिता गट व

गोवर रुबेला लसीकरण मोहिम : जिल्ह्यात आजअखेर 5 लाख 79 हजार बालकांना लसीकरण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.9- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण अभियानात रायगड जिल्ह्यात मंगळवार (दि.08 जानेवारी 2019) अखेर जिल्ह्यातील 5 लाख 79 हजार 607 बालकांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.  जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल (मंगळवार दि.8) दिवसाअखेर जिल्ह्यातील 67 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 16 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 939 विद्यार्थ्यांना तर 51 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 9 हजार 408 विद्यार्थ्यांना अशा एकूण 10 हजार 347 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.  तर मोहिम सुरु झाल्यापासून आज अखेर एकूण 3 लाख 1 हजार 40 मुले  व 2 लाख 78  हजार 567 मुली असे एकूण 5 लाख 79 हजार 607 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी  माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ.सचिन देसाई यांनी दिली आहे.  या अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य यंत्रणा 5593 शाळांपर्यंत पोहोचली आहे.

“सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा” बांधकाम कामगारांसाठी लाभ वाटप सोहळा आज

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.09:- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील नोंदित बांधकाम  लाभ वाटप सोहळा कार्यक्रम गुरुवार दि.10 जानेवारी रोजी फोर कोर्ट एरिया, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, खांदेश्वर, नविन पनवेल येथे राज्याचे कामगार, कौशल्य विकास व उद्योजकता कामगार, भूकंप पुनर्वसन माजी सैनिकांचे कल्याण मंत्री ना.संभाजीराव निलंगेकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. लाभ वाटप सोहळा या लाभ वाटप सोहळ्याचे उद्घाटन गुरुवार दि.10 रोजी सकाळी साडे दहा वा. राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भूकंप पुनर्वसन,माजी सैनिक कल्याण मंत्री ना.संभाजी पाटील-निलंगेकर  यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना. अनंत गिते हे राहणार असून राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण, आरोग्य, परिवहन, कामगार, राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री ना.विजय देशमुख,  इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक

‘रायगड ई-बुक’ चे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

Image
मुंबई, दि.8- रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची समग्र माहिती पर्यटकांना उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांनी तयार केलेल्या ‘रायगडःपर्यटन विविधा’, या ई-बुकचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन   करण्यात आले. तसेच रायगड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना माहिती देणाऱ्या मोबाईल ॲपचेही उद्घाटन करण्यात आले.             मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयात समिती सभागृहात हा कार्यक्रम आज पार पडला.यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण, पर्यटन राज्यमंत्री ना. मदन येरावार,नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.             श्री. फडणवीस यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे या ई पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे ई- पुस्तक महाजालकावर www.raigadtourism.com येथे तसेच मराठी ई- पुस्तकांच्या सर्व दालनांवर उपलब्ध असेल. तसेच रायगड जिल्ह्याचे संकेतस्थळ www.raigad.nic.in येथेही या ई- बुकची लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. तर

कौशल्य विकास व उद्योजकता,कामगार मंत्री ना.संभाजी पाटील-निलंगेकर यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8:- राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भूकंप पुनर्वसन,माजी सैनिक कल्याण मंत्री ना.संभाजी पाटील-निलंगेकर हे गुरुवार दि.10 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- गुरुवार दि.10 रोजी सकाळी 9.45 दहा वा. आ.प्रशांत ठाकूर, वि.स.स. पनवेल यांचे निवासस्थान श्री सदन पुरोहित हॉस्पिटलजवळ, एम.सी.सी. एच.सोसायटी, पनवेल येथे आगमन व राखीव.   सकाळी 10.10 वा. श्री सदन पुरोहित हॉस्पिटलजवळ, एम.सी.सी. एच.सोसायटी, पनवेल   येथून खांदेश्वर नवीन पनवेलकडे प्रयाण. स.10.25 वा. खांदेश्वर रेल्वेस्टेशन समोर, फोर कोर्ट एरिया नवीन पनवेल येथे आगमन   व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ “ सन्मान कष्टाचा आनंद उद्याचा ” लाभ वाटप कार्यक्रमास उपस्थिती.    स्थळ : खांदेश्वर रेल्वे स्टेशन समोर, फोर कोर्ट एरिया नवीन पनवेल.   दुपारी बारा वा. खांदेश्वर, नवीन पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहारकडे प्रयाण. 00000

गोवर रुबेला लसीकरण मोहिम : जिल्ह्यात आजअखेर 5 लाख 69 हजार बालकांना लसीकरण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण अभियानात रायगड जिल्ह्यात सोमवार (दि.07 जानेवारी 2019) अखेर जिल्ह्यातील 5 लाख 69 हजार 260 बालकांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.   जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल (सेामवार दि.7) दिवसाअखेर जिल्ह्यातील 40 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 15 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 280 विद्यार्थ्यांना तर 25 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 5 हजार 750 विद्यार्थ्यांना अशा एकूण 6 हजार 30 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.   तर मोहिम सुरु झाल्यापासून आज अखेर एकूण 2 लाख 95 हजार 674 मुले   व 2 लाख 73   हजार 586 मुली असे एकूण 5 लाख 69 हजार 260 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी   माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी   डॉ.सचिन देसाई यांनी दिली आहे.   या अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य यंत्रणा 5526 शाळांपर्यंत पोहोचली

लोकशाही दिनी 3 अर्ज दाखल

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7 -    या महिन्याचा लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली   जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी   एकूण 3 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 3 अर्ज कारवाईसाठी संबंधित विभागांकडे सूपूर्द करण्यात आले. विभागनिहाय प्राप्त अर्ज संख्या याप्रमाणे-   महसूल विभाग-1, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अलिबाग-1, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख रायगड-1 असे एकूण 3 अर्ज प्राप्त झाले आहेत. 00000

पेण येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते मराठा आरक्षण दाखले वितरण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 7   – पेण येथील उपविभागीय कार्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमात   राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते मराठा समाज आरक्षण दाखल्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी   सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, पेणचे आमदार धैर्यशील पाटील, माजी आमदार देवेंद्र साटम, पेणच्या उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड,   तहसिलदार अजय पाटणे,   मिलिंद पाटील,   शरद कदम,   वैकूंठ पाटील, गंगाधर पाटील, बंडू खंडागळे, हिमांशु कोठारी,   प्रविण बैकर, संदीप पाटील, ललित पाटील आदी उपस्थित होते. यावेळी ना. चव्हाण म्हणाले की,   हे शासन लोकांच्या हितासाठी काम करीत असून लोक हिताचे निर्णय घेऊन   समाजातल्या शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना न्याय देत आहे. मराठा समाजातील लोकांना हे दाखले मिळण्यात काही अडचण येत असल्यास नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.     00000

इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ : वास्तूनिर्मिकांच्या कल्याणासाठी जिल्ह्यास 5कोटी 24 लक्ष रुपये निधी आतापर्यंत 5271 लाभार्थ्यांना 2 कोटी 63 लाख रुपयांचे वितरण

Image
अलिबाग,जि.रायगड,दि.7(जिमाका)- आपल्या श्रमांनी वास्तूनिर्मिती करुन निवारा उभारुन देणाऱ्या कसबी कामगारांना आयुष्यात उत्तम आरोग्य, त्यांच्या पुढच्या पिढीला शिक्षण आदी सुविधा व सुरक्षितता देण्यासाठी शासनाने इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची निर्मिती केली आहे. रायगड जिल्ह्यात या मंडळाच्या योजना कामगार उप आयुक्त कार्यालय, रायगडमार्फत राबविण्यात येतात. जिल्ह्यातील वास्तू निर्मिकांच्या कल्याणासाठी जिल्ह्याला 5 कोटी 24 लक्ष 84 हजार रुपये निधी प्राप्त झाले असून आतापर्यंत 5271 लाभार्थी कामगारांना   2 कोटी 63 लाख 36 हजार 400 रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. या निधीतून कामगारांचे शिक्षण, आरोग्य या सारख्या सुविधांची पूर्तता करण्यात येत आहे. यासंदर्भात कामगार उप आयुक्त कार्यालय, नवीन पनवेल   यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन आणि सेवाशर्ती) अधिनियम 1996 अंतर्गत नोव्हेंबर 2018 अखेरीस 455 आस्थापना नोंदीत करण्यात आल्या आहेत.   तसेच इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळामध्ये नोव्हेंबर 2018 अखेरीस 21663 कामगारांची लाभार्थी कामगार म्हणून नोंदणी झालेली आहे.  

आदर्श पतसंस्था कार्यालय उद्घाटन : ग्राहकांचा विश्वास,संचालकांची मेहनत हिच सहकाराची विश्वासार्हता - ना.रविंद्र चव्हाण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 7- सहकारी संस्थांनी चांगल्या पध्दतीने काम करावे, ग्राहकांमधील विश्‍वास संपादन करून तो टिकवणे महत्त्वाचे आहे. संचालकांची मेहनत ही सहकार चळवळ पुढे नेण्याचे काम करते. ग्राहकांचा विश्वास आणि संचालकांची मेहनत हिच सहकार चळवळीची विश्वासार्हता आहे, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आज येथे केले. येथील आदर्श   पतसंस्थेच्या ‘आदर्श भवन’ या मुख्य कार्यालयाच्या वास्तूचा उद्घाटन सोहळा आज   पार पडला. या सोहळ्यास उद्घाटक म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद सदस्य आ. जयंत पाटील हे होते. यावेळी   सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, अलिबाग-मुरुडचे आमदार सुभाष उर्फ पंडितशेट पाटील,अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांतशेट नाईक सहकार भारतीचे महासचिव डॉ. उदय जोशी, जिल्हा उपनिबंधक पी.एम खोडका आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ना. चव्हाण म्हणाले की, पतसंस्थेतील संचालक,कर्मचारी

मंत्री, आमदार महोदयांनी केले चाचणी मतदान

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 7- भारत निवडणूक आयोगातर्फे आगामी लोक्सभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर  मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्र यावरील मतदानासंदर्भात जनजागृती अभियान सुरु आहे. या अभियानात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थिर मतदान व व्हीव्हीपॅट यंत्र जनजागृती पथकाने स्थापन केलेल्या चाचणी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण, तसेच आमदार महोदय, अन्य लोकप्रतिनिधींनी चाचणी मतदान करुन पाहिले. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर आपण दिलेले मतदान नेमके कुणाला गेले याबाबत शंकेला वाव असू नये यासाठी व्हीव्हीपॅट यंत्र संलन्ग करण्यात आले आहे. या यंत्रावर आपण मतदान यंत्रावर ज्या चिन्हाचे बटन दाबले त्याच चिन्हाचे अंकन केलेली कागदी स्लिप येते ती सात सेकंद मतदारासमोर राहते व नंतर यंत्रात जमा होते. याद्वारे आपण जे बटन दाबले त्याच चिन्हाला मतदान झाले याची खात्री मतदाराला होते. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने  उपस्थित पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्यासह अन्य आमदार व लोकप्रतिनिधींनी स्वतः चाचणी यंत्रावर मतदान केले व व्हीव्हीपॅट यंत्र

जिल्हा नियोजन समितीची बैठक : जिल्ह्यासाठी 265 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर पाणीपुरवठा योजनांच्या निधीला प्राधान्य -ना.चव्हाण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 7- जिल्हा नियोजन समितीने सन 2019-20 या वित्तीय वर्षासाठी 265 कोटी 5 लक्ष रुपयांच्या जिल्हा विकासआराखड्यास आज मान्यता दिली. विकास आराखड्याचे नियोजन करतांना राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत जिल्ह्यात राबवावयाच्या पाणी पुरवठा योजनेतून होणाऱ्या कामांसाठी केंद्राकडून मिळणाऱ्या निधीला समायोजित निधीची अधिकाधिक तरतूद करण्यास प्राधान्य दिले आहे,असे राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान,अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण   राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित सदस्यांना सांगितले. येथील जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात पार पडली. या बैठकीस   पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, सिडकोचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, विधानपरिषद सदस्य आ.बाळाराम पाटील, आ. निरंजन डावखरे, आ. अनिकेत तटकरे, विधानसभा सदस्य आ. सुभाष उर्फ पंडीतशेट पाटील, आ. मनोहर भोईर, आ. भरतशेट गोगावले,   जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मु