मंत्री, आमदार महोदयांनी केले चाचणी मतदान


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 7- भारत निवडणूक आयोगातर्फे आगामी लोक्सभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर  मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्र यावरील मतदानासंदर्भात जनजागृती अभियान सुरु आहे. या अभियानात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थिर मतदान व व्हीव्हीपॅट यंत्र जनजागृती पथकाने स्थापन केलेल्या चाचणी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण, तसेच आमदार महोदय, अन्य लोकप्रतिनिधींनी चाचणी मतदान करुन पाहिले.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर आपण दिलेले मतदान नेमके कुणाला गेले याबाबत शंकेला वाव असू नये यासाठी व्हीव्हीपॅट यंत्र संलन्ग करण्यात आले आहे. या यंत्रावर आपण मतदान यंत्रावर ज्या चिन्हाचे बटन दाबले त्याच चिन्हाचे अंकन केलेली कागदी स्लिप येते ती सात सेकंद मतदारासमोर राहते व नंतर यंत्रात जमा होते. याद्वारे आपण जे बटन दाबले त्याच चिन्हाला मतदान झाले याची खात्री मतदाराला होते.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने  उपस्थित पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्यासह अन्य आमदार व लोकप्रतिनिधींनी स्वतः चाचणी यंत्रावर मतदान केले व व्हीव्हीपॅट यंत्रावर त्याच चिन्हाची चिठ्ठी येत असल्याची खात्री केली. या चाचणीत जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, आ. बाळाराम पाटील, आ. अनिकेत तटकरे, आ. सुभाष उर्फ पंडीतशेट पाटील, आ. भरतशेट गोगावले,  आ, मनोहर भोईर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील आदींनी स्वतः चाचणी मतदान केले व खात्री करुन घेतली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड