Posts

Showing posts from August 26, 2018

भात पिकावरील खोडकिड प्रतिबंधासाठी उपाययोजना

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29 कर्जत तालुक्यात या वर्षीच्या खरीप हंगामात 9170 हेक्टर वर भात पिकाची लावणी झाली असून आतापर्यंत 3500 मि.मी. इतका पाऊस झाला आहे.   सद्यस्थितीत भात पिकाची जोमदार वाढ झाली असून भातपिक वाढीच्या अवस्थेत आहे.   मर्यादित ठिकाणी खोडकिड्यांचा प्रादूर्भाव झाला आहे परंतु पिक आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या खाली आहे.   कृषि विभागामार्फत यासंदर्भात cropsap (कीड रोग सर्वेक्षण व सल्ला पध्दत) नावाची ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात करण्यात आली असून कर्जत तालुक्यात 23 कृषि सहाय्यक व 4 कृषी पर्यवेक्षक यांचेमार्फत दिवसाआड कीड व रोगांची निरीक्षणे घेऊन ऑनलाईन प्रणालीवर नोंदवली जातात.   कोणतीही कीड तसेच रोग आढळल्यावर संबधित शेतकरी यांना त्यासंबंधी उपाययोजना सांगितल्या जातात.   या प्रकल्पांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत प्रमुख किडी व रोगांचे भित्तीपत्रके लावण्यात आली असून कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक यांचेमार्फत कीड व रोगांची ओळख व त्यासंबधीच्या उपाययोजनांसाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरु आहे.   खोडकिड्यांच्या संदर्भात कर्जत तालुक्यात भात पिकात 2225 एवढे कामगंध सापळे बसविण्यात आल

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार ; 28 सप्टेंबर पर्यंत अर्ज मागविले

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29 शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क, ड, वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये पन्नास हजार, तीस हजार, वीस हजार, दहा हजार रोख रक्कम व शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.             राज्यस्तरीय प्रत्येक एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांनी प्रत्येक रुपये पंचवीस हजार रोख रक्कम, शाल, श्रीफळ, आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभाग स्तरावर प्रत्येक एक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रु

राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी अर्ज मागितले

अलिबाग,जि.रायगड दि.1 (जिमाका) -   केंद्र शासनाच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय कल्याण विभाग नवी दिल्ली यांनी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर युवकांच्या विकासासाठी राष्ट्रीय, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 13 ते 15 वयोगटातील युवक-युवती व स्वयंसेवी संस्थांकडून राष्ट्रीय युवा पुरस्कार 2016-2017 करिता नामांकने मागविली आहेत.    आवश्यक माहिती व अर्ज wwwyas.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.   या पुरस्काराचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहेत. युवा पुरस्कार (वैयक्तिक)- सदर पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रुपये चाळीस हजार (प्रति युवक-युवतींसाठी).   युवा पुरस्कार (संस्था) – प्रति संस्थेसाठी सदरच्या पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रुपये दोन लक्ष अशा स्वरुपाचा असेल.    जिल्ह्यातील इच्छुकांनी 4 सप्टेंबर पर्यंत आपले अर्ज तीन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे दुपारी बाराच्या आत सादर करावेत.   तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहुली-संगम रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महा

पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा दौरा

अलिबाग,जि.रायगड दि.1 (जिमाका) - राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण हे मंगळवार दि. 4   रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. मंगळवार दि.4 रोजी सकाळी 11 वा. खोपोली येथे आगमन व रायगड जिल्ह्यातील गणेशोत्सवानिमित्त करावयाच्या उपाययोजना व पूर्वतयारीबाबत बैठक. स्थळ : राजश्री शाहू महाराज सामाजिक सभागृह खोपोली.   दुपारी एक वा. खोपोली येथून ऐरोलीकडे प्रयाण. 00000

लोकराज्य वाचक अभियान : लोकराज्य वाचणे ही एक चांगली सवय- डॉ. अजित गवळी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1-   राज्य शासनाचे मुखपत्र असलेले ‘लोकराज्य’ मासिकात विविध शासकीय योजनांची अधिकृत आणि विश्वासार्ह माहिती दिलेली असते. हे मासिक अत्यंत माहितीपूर्ण आणि वाचनीय आहे. ही माहिती वाचून आपल्या ज्ञानात वाढ होते, म्हणूनच लोकराज्य वाचणे ही एक चांगली सवय आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी आज येथे केले. लोकराज्य वाचक अभियानांतर्गत अलिबाग येथील डोंगरे हॉल येथील सार्वजनिक वाचनालयात   वाचकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने हे ही उपस्थित होते. यावेळी   उपस्थित मान्यवरांचे लोकराज्य अंक भेट देऊन स्वागत करण्यात आले. डॉ. गवळी वाचकांशी संवाद साधतांना पुढे म्हणाले की, आपले ज्ञान अद्यावत करण्यात लोकराज्यच्या माहितीचा खूप उपयोग होतो. स्पर्धा परीक्षेसाठीही ते आवश्यक असते.   असा हा लोकराज्य प्रत्येकाने अवश्य वाचायला हवा. आपल्या जवळच्या लोकांना, मित्रांना वाचवयास सांगा, असे आवाहन डॉ. गवळी यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी वळवी म्हणाले की, लोकर

इंडिया पोस्ट पेमेंट बँक घरापर्यंत बँकसेवा पोहोचवून पोस्टाचं नातं होणार अधिक दृढ -ना.अनंत गिते

Image
अलिबाग,जि.रायगड दि.1 (जिमाका) - देशभरात पोहोचलेल्या पोस्टाच्या   1 लाख 55 हजार टपाल कार्यालयाच्या विस्तीर्ण शाखांमार्फत ग्रामीण जनतेशी जोडलेले टपाल विभागाचे नाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकद्वारे बँकसेवा थेट घरापर्यंत पोहोचवून अधिक दृढ होईल, असा विश्वास केंद्रीय अवजड उद्योग मंत्री ना.अनंत गिते यांनी आज येथे व्यक्त केला. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शुभारंभानिमित्त अलिबाग येथील मुख्य पोस्ट ऑफीस येथे आयोजित समारंभात ना.गिते बोलत होते. यावेळी आ.सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲङ आस्वाद पाटील, नवी मुंबई विभागाच्या पोस्टमास्तर जनरल शोभा मधाळे, अलिबाग पोस्ट ऑफीस अधिक्षक व्ही.सी.घोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.    यावेळी ना.गिते यांच्या हस्ते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या विशेष कव्हरचे अनावरण करण्यात आले.   तसेच बँकेच्या खातेधारकांना क्यू आर कोड कार्डचे   वितरणही करण्यात आले. आपल्या संबोधनात ना.गिते म्हणाले की, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करुन घरापर्यंत बँकसेवा पोहोचविण्याचा प्रशंसनीय प्रयत्न आहे.   या बँकेसेवेमुळे ग्रामीण भागातील जनतेला

राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी मागितले अर्ज

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1 -    केंद्र शासनाच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय कल्याण विभाग नवी दिल्ली यांनी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर युवकांच्या विकासासाठी राष्ट्रीय, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 13 ते 15 वयोगटातील युवक-युवती व स्वयंसेवी संस्थांकडून राष्ट्रीय युवा पुरस्कार 2016-2017 करिता नामांकने मागविली आहेत.   आवश्यक माहिती व अर्ज wwwyas.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  या पुरस्काराचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहेत. युवा पुरस्कार (वैयक्तिक)- सदर पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रुपये चाळीस हजार (प्रति युवक-युवतींसाठी).  युवा पुरस्कार (संस्था) – प्रति संस्थेसाठी सदरच्या पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रुपये दोन लक्ष अशा स्वरुपाचा असेल.   जिल्ह्यातील इच्छुकांनी 4 सप्टेंबर पर्यंत आपले अर्ज तीन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे दुपारी बाराच्या आत सादर करावेत.  तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहुली-संगम रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 12.21 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 12.21 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2862.55 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 2.00 मि.मि., पेण-9.10 मि.मि., मुरुड-3.00 मि.मि., पनवेल-2.80 मि.मि., उरण-7.00 मि.मि., कर्जत-5.60 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-17.00 मि.मि., रोहा-19.00 मि.मि., सुधागड-5.00 मि.मि., तळा-36.00 मि.मि., महाड-9.00 मि.मि., पोलादपूर-21.00, म्हसळा-13.80मि.मि., श्रीवर्धन-35.00 मि.मि., माथेरान-5.10 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 195.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 12.21 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   91.09 टक्के इतकी आहे. 00000c

आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज मागविले

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.31- राज्यात सध्या कार्यरत असलेली सर्व महा ई सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्रे, नागरी सुविधा केंद्रे तसेच   संग्राम केंद्रे यांना आपले सरकार सेवा केंद्र हे नाव देऊन सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरचे एकसारखे ब्रँडिग करण्यात येत आहे.   ‘आपले सरकार सेवा केंद्र’ यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी माहिती व तंत्रज्ञान महामंडळावर सोपविण्यात आलेली आहे.   प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात एक आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येईल.   मात्र 5000 पेक्षा अधिक लोकसंख्या (2011 च्या जनगणनेनुसार) असलेल्या ग्रामपंचायतीत किमान दोन केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.    शहरी भागासाठी आपले सरकार केंद्रासाठी महानगरपालिका व नगरपरिषद दहा हजार लोकसंख्येसाठी एक केंद्र, प्रत्येक नगर पंचायत क्षेत्रात किमान एक केंद्र स्थापन करण्यात येईल. पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नगर पंचायतीत किमान दोन केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.   सध्या रिक्त आलेल्या आपले सरकार सेवा केंद्राची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://raigad.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.   रिक्त असलेल्

निवृत्तीवेतन धारकांचा बुधवारी मेळावा

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.31- येथील जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत बुधवार दि.5 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जंजीरा सभागृह, पोलीस परेड मैदान अलिबाग येथे सर्व निवृत्तीवेतन धारकांचा मेळाव्याचे आयोजन केले आहे. कोषागारात निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी या   मेळाव्यास हजर राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, फिरोज मुल्ला, रायगड-अलिबाग यांनी केले आहे. 00000

जिल्हयात मनाई आदेश

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.31- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न् निर्माण होऊ नये याकरीता जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत (पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र वगळून) बुधवार दि.5रोजी मध्यरात्री पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3)चे मनाई आदेश,अपर जिल्हा दंडाधिकारी रायगड अलिबाग यांनी लागू केले आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल असे अपर जिल्हादंडाधिकारी   यांनी कळविले आहे. 00000

जिल्ह्यातील 121 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.31- ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या राज्यातील 1041 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून त्यात रायगड जिल्ह्यातील 121 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.तसेच सरपंच पद रिक्त असलेल्या तीन ग्रामपंचायतींची सरपंच पदासाठी थेट निवडणूक होणार आहे. या कार्यक्रमात दि.5 ते 11 सप्टेंबर सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळात नामनिर्देशन पत्र मागविणे व सादर करणे,   दि.12 सप्टेंबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी सकाळी 11 ते छाननी संपेपर्यंत, नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा व निवडणूक चिन्ह   नेमून देण्याचा दिनांक शनिवार दि. 15 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत,    आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक बुधवार दि.26 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायं. साडेपाच दरम्यान. मतमोजणी गुरुवार दि.27 सप्टेंबर , निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्धी शनिवार दि.29 सप्टेंबर रोजी करण्यात येईल. या प्रमाणे कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण शाखेने कळविला आहे. 00000

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण डिसेंबर 2019 अखेर पूर्ण करणार-ना.चंद्रकांत पाटील

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.31- मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे गणेशोत्सावापूर्वी तातडीने भरण्यात येतील तसेच या    महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम डिसेंबर 2019 पर्यंत    पूर्ण करण्यात येईल, असे राज्याचे सार्वजनिक बाधंकाम व महसुल मंत्री   ना. चंद्रकांत पाटील    यांनी माणगाव येथे शासकीय विश्राम गृह येथे   माध्यम प्रतिनिधींना सांगितले. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा ना. पाटील यांनी आज पनवेल ते माणगांव दरम्यान पाहणी दौरा केला. यावेळी त्यांचे समवेत केंद्रीय    अवजड उद्योग मंत्री ना.अनंत गिते , पालक मंत्री ना. रविंद्र चव्हाण , जिल्हा परिषद अध्यक्ष ‍आदिती तटकरे, आ.    अनिकेत तटकरे , ‍आ. निरंजन डावखरे ,   आ. प्रशांत ठाकूर , आ. भरतशेठ गोगावले , माणगाव नगराध्यक्ष योगिता चव्हाण ,    नगरसेवक ,    ‍विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्येकर्ते तसेच माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिगावकर , तहसिलदार उर्मिला पाटील , सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्गाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.           यावेळी ना. पाटील म्हणाले की,    रस्त्याचे पहिल्या

राष्ट्रीय महामार्ग क्र.66 पाहणी खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावी ना.चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.31-   कोकणातील अतिमहत्वाचा मानला जाणारा गणेशोत्सव सण 13 सप्टेंबर पासून होत आहे.   गणेशत्सवासाठी कोकणात राज्याच्या विविध शहरातून गणेशभक्त येत असतात. या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व सुरळीत व्हावा याकरिता राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी करावी, असे निर्देश महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सा.उ.वगळून) मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी दिले.   सायन-पनवेल, पनवेल ते पोलादपूर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग पाहणी दौरा कार्यक्रम प्रसंगी ते अधिकाऱ्यांशी बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, निरंजन डावखरे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपविभागीय अधिकारी पनवेल दत्तू नवले, उपविभागीय अधिकारी पेण श्रीमती प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार पनवेल दिपक आकडे, तहसलिदार पेण अजय पाटणे तसेच नॅशनल हायवे, बांधकाम विभागाचे अधिकारी आदि उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सुचना करतांना ते म्हणाले की, गणेशोत्सवासाठी विविध शहरातून मोठ्या प्रमाणात गणेशभक्त कोकणात येत असल्याने गणेशोत

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 5.79 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.31 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.79 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2850.33 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 2.00 मि.मि., पेण-11.00 मि.मि., मुरुड-2.00 मि.मि., पनवेल-5.80 मि.मि., उरण-3.00 मि.मि., कर्जत-6.20 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-11.11 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-3.00 मि.मि., तळा-26.00 मि.मि., महाड-3.00 मि.मि., पोलादपूर-4.00, म्हसळा-3.00मि.मि., श्रीवर्धन-4.00 मि.मि., माथेरान-8.60 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 92.71 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 5.79 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   90.70 टक्के इतकी आहे. 00000

पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा दौरा

अलिबाग दि.30, बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण हे दि. 31 ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. शुक्रवार दि.31 रोजी सकाळी पाऊणे सात वा. शासकीय विश्रामगृह पनवेल येथे आगमन व राखीव. सकाळी आठ वा. मा.मंत्री (सा.बां.) महोदयांच्या समवेत राष्ट्रीय महामार्ग क्र.66 च्या पनवेल-इंदापूर-माणगांव रस्त्याचा पाहणी दौरा. सकाळी आकरा वा. शासकीय विश्रामगृह माणगांव जि.रायगड येथे आगमन व राखीव. सव्वा अकरा वाजता मा.मंत्री (सा.बां) महोदयांच्या समवेत राष्ट्रीय महामार्ग क्र.66 च्या माणगाव ते चिपळूण रस्त्याची पाहणी दौऱ्यासाठी रवाना.   रात्रौ पावनेबारा वाजता कणकवली येथून मुंबई एक्सप्रेसने पनवेलकडे प्रयाण. शनिवार दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 8.25 वाजता पनवेल येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.   0000000

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम मतदार नोंदणीसाठी जनजागृती आवश्यक -उपजिल्हाधिकारी श्रीम.वैशाली माने

Image
      अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30 -    आगामी सन 2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत राबविण्यात येणार असून त्याकरिता मतदार नोंदणीसाठी मतदारांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीम.वैशाली माने यांनी यावेळी दिली.   जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित छायाचित्र मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम संदर्भात माहिती देण्याकरिता आयोजित पत्रकार परिषदेत त्याबोलत होत्या.            यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मतदार यादी अद्ययावत व जास्तीत जास्त शुध्द स्वरुपात व्हावी यासाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहा.मतदार नोंदणी अधिकारी तसेच सर्व बीएलओ यांची नियुक्ती करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.   मतदार यादीतील तफावतींचा शोध घेण्यात आला असून या तफावती दूर करण्यासाठी उपाययोजना निश्चित करण

सुधारित केंद्रीयमंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30 -    केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर सुधारित दौरा कार्यक्रम याप्रमाणे- गुरुवार दि.30 रोजी सायंकाळी सात वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेली नागोठणे येथे आगमन व मुक्काम शुकवार दि.31 रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेली नागोठणे येथून शासकीय विश्रामगृह माणगावकडे प्रयाण.   अकरा वाजता शासकीय विश्रामगृह माणगाव येथे आगमन.  दुपारी बारा वाजता शासकीय विश्रामगृह माणगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालय,अलिबागकडे प्रयाण.   तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे आगमन.  सायं. सहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून हॉटेल रेडिसनकडे प्रयाण.  सव्वा सहा वाजता हॉटेल रेडिसन येथे आगमन व मुक्काम. शनिवार 01 सप्टेंबर 2018 रोजी दुपारी दोन वाजता हॉटेल रेडिसन येथून अलिबागकडे प्रयाण.  सव्वा दोन वाजता अलिबाग मुख्य पोस्ट ऑफीस येथे आगमन.  साडेचार वाजता मुख्य पोस्ट ऑफीस अलिबाग येथून मुंबईकडे प्रयाण. 00000

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा शुभारंभ शुक्रवारी

                                                                                                                                                अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30 सर्वसामान्य ग्रामीण जनतेमध्ये अर्थसाक्षरता निर्माण करुन आर्थिक स्थैर्यासाठी निर्माण झालेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा शुभारंभ मा.प्रधानमंत्री   नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते होत असून त्याचाच प्रातिनिधिक भाग म्हणून रायगड डाकविभाग अंतर्गत अलिबाग शाखेचा शुभारंभ केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उद्योग मंत्री मा.अनंत गिते यांच्या हस्ते शनिवार दि. 1 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वा. अलिबाग पोस्ट ऑफीसच्या प्रांगणात होणार आहे.               या सोहळ्याच्या आयोजक PMG नवी मुंबई या आहेत.   या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण   तर आ. जयंत पाटील, आ.सुभाष पाटील उपस्थित राहणार आहेत.               इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही पूर्णत: भारतीय डाक विभाग, संचार मंत्रालय संलग्न शंभर टक्के भारत सरकारचे   समभाग असणारी यंत्रणा आहे.   या बँकेचे सेव्हिंग खाते, बेसिक सेव्हिंग खाते, चालू खाते ग्राहक आधार

भात पिकावरील खोडकिड प्रतिबंधासाठी उपाययोजना

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29 कर्जत तालुक्यात या वर्षीच्या खरीप हंगामात 9170 हेक्टर वर भात पिकाची लावणी झाली असून आतापर्यंत 3500 मि.मी. इतका पाऊस झाला आहे.   सद्यस्थितीत भात पिकाची जोमदार वाढ झाली असून भातपिक वाढीच्या अवस्थेत आहे.   मर्यादित ठिकाणी खोडकिड्यांचा प्रादूर्भाव झाला आहे परंतु पिक आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या खाली आहे.   कृषि विभागामार्फत यासंदर्भात cropsap (कीड रोग सर्वेक्षण व सल्ला पध्दत) नावाची ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात करण्यात आली असून कर्जत तालुक्यात 23 कृषि सहाय्यक व 4 कृषी पर्यवेक्षक यांचेमार्फत दिवसाआड कीड व रोगांची निरीक्षणे घेऊन ऑनलाईन प्रणालीवर नोंदवली जातात.   कोणतीही कीड तसेच रोग आढळल्यावर संबधित शेतकरी यांना त्यासंबंधी उपाययोजना सांगितल्या जातात.   या प्रकल्पांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत प्रमुख किडी व रोगांचे भित्तीपत्रके लावण्यात आली असून कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक यांचेमार्फत कीड व रोगांची ओळख व त्यासंबधीच्या उपाययोजनांसाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरु आहे.   खोडकिड्यांच्या संदर्भात कर्जत तालुक्यात भात पिकात 2225 एवढे कामगंध सापळे बसविण्यात आल

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार 28 सप्टेंबर पर्यंत अर्ज मागविले

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29 शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क, ड, वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये पन्नास हजार, तीस हजार, वीस हजार, दहा हजार रोख रक्कम व शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.             राज्यस्तरीय प्रत्येक एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांनी प्रत्येक रुपये पंचवीस हजार रोख रक्कम, शाल, श्रीफळ, आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभाग स्तरावर प्रत्येक एक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रु

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लाभ घेण्याचे आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29 -   शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे.   या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन   सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना दहावी, बारावी, पदवी, पदविका पन्नास टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.   अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा चाळीस टक्के असेल.   या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर (इयत्ता अकरावी, पदवी, पदव्युत्तर पदवी) शिक्षण घेण्यासाठी शासकीय   वसतिगृहात प्रवेशित नसणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी पुढीलप्रमाणे रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरीत करण्यात येईल. निकषः- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा व विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा. शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नव

सप्टेंबर महिन्याचा लोकशाही दिन मंगळवारी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29 -   प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सेामवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.   माहे सप्टेंबर मध्ये पहिल्या सोमवारी (दि.3 सप्टेंबर 2018 रोजी) गोपाळकाला निमित्त स्थानिक सुट्टी असल्याने जिल्हास्तरीय लोकशाही दिन मंगळवार 4 रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी रायगड यांनी कळविले आहे. 000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 9.23 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.23 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2838.50 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 19.00 मि.मि., पेण-2.00 मि.मि., मुरुड-3.00 मि.मि., पनवेल-11.20 मि.मि., उरण-8.00 मि.मि., कर्जत-10.10 मि.मि., खालापूर-10.00 मि.मि., माणगांव-7.00 मि.मि., रोहा-4.00 मि.मि., सुधागड-15.00 मि.मि., तळा-10.00 मि.मि., महाड-800 मि.मि., पोलादपूर-13.00, म्हसळा-5.20मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-12.20 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 147.70 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 9.23 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   90.32 टक्के इतकी आहे. 00000

केंद्रीयमंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29 -    केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते हे शुक्रवार,दि.31 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे- शुक्रवार दि.31 रोजी दुपारी एक वाजता हॉटेल रेडिसन अलिबाग येथे आगमन.   तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे आगमन.   सायं. सहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून हॉटेल रेडिसनकडे प्रयाण.   सव्वा सहा वाजता हॉटेल रेडिसन येथे आगमन व मुक्काम. शनिवार 01 सप्टेंबर 2018 रोजी दुपारी दोन वाजता हॉटेल रेडिसन येथून अलिबागकडे प्रयाण.   सव्वा दोन वाजता अलिबाग मुख्य पोस्ट ऑफीस येथे आगमन.   साडेचार वाजता मुख्य पोस्ट ऑफीस अलिबाग येथून मुंबईकडे प्रयाण. 00000