निवृत्तीवेतन धारकांचा बुधवारी मेळावा
अलिबाग जि.रायगड
(जिमाका)दि.31- येथील जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत बुधवार
दि.5 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जंजीरा सभागृह, पोलीस परेड मैदान अलिबाग येथे
सर्व निवृत्तीवेतन धारकांचा मेळाव्याचे आयोजन केले आहे. कोषागारात निवृत्तीवेतन
घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी या
मेळाव्यास हजर राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, फिरोज मुल्ला,
रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment