Posts

Showing posts from July 21, 2019

आपदग्रस्त शेतकऱ्यांनी आपला बँकेचा अकाऊंट नंबर कळविणेबाबत

अलिबाग,जि.रायगड   दि.25 - (जिमाका)   अलिबाग तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे सन 2017-18 मध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतीचे नुकसान झालेले अशा शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे नुकसान भरपाई देण्याकरिता शासनाकडून अनुदान प्राप्त झालेले आहे.   मात्र बऱ्याच आपदग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांचे बँकेचे अकाऊंट नंबर संबंधित तलाठी ,ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांचेकडे दिलेले नसल्याने नुकसान भरपाईची रक्कम बँकेमध्ये जमा करता येत नाही.   यासाठी अलिबाग तालुक्यातील सन 2017-18 मध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांनी आपला बँकेचा अकाऊंट नंबर अथवा पासबुकची छायांकीत प्रत संबंधित तलाठी ,ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांच्याकडे पाच दिवसात जमा करावी. मुदतीत बँकेचा अकाऊंट नंबर अथवा पासबुकची छायांकीत प्रत जमा न केल्यास नुकसान भरपाईपोटी प्राप्त झालेले अनुदान शासनास जमा करावे लागेल.याबाबतची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. असे आवाहन तहसिलदार अलिबाग सचिन शेजाळ यांनी केले आहे. 000000

राज्यस्तरीय युवा जागर- महाराष्ट्रावर बोलु काही, युवा संसद स्पर्धा कार्यक्रमाबाबत

अलिबाग,जि.रायगड   दि.25 - (जिमाका)   युवामंध्ये समाजाविषयी जाणीव व जागृती व्हावी, महाराष्ट्र व देशाच्या विकासाबाबत युवांनी विचार करावा, त्यांच्यामध्ये नेतृत्व व वक्तृत्वाचे गुण निर्माण व्हावेत या उद्देशाने क्रीडा व युवकसेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य युवक कल्याण उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय युवा जागर- महाराष्ट्रावर बोलु काही, युवा संसद स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील / उच्च माध्यमिक विद्यालयातील (इ.11 ते 12 वी) युवा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री,मा.आशिष शेलार, यांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांची व्हिडीओ कॅान्फरन्स व्दारे बैठक घेऊन सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत निर्देश व सुचना दिल्या आहेत.   या स्पर्धेतील विजेत्यांना पुढील प्रमाणे रोख बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.   राज्यस्तर – प्रथम क्रमांक – रु.1,00,000/- व्दितीय क्रमांक रु.75,000/- व तृतीय क्रमांक रु.50,000/- जिल्हास्तर – प

नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजनांसाठी प्रस्तावाबाबत

अलिबाग,जि.रायगड   दि.25 - (जिमाका)   नाविन्यपूर्ण योजनांतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती या प्रवर्गातील 18 वर्षावरील अर्जदारांकडून (दुधाळ गाई/म्हशीचे गट वाटप करणे,शेळी/मेंढी गट वाटप करणे,मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करणे) दि.25 जुलै 2019 ते 8 ऑगस्ट 2019 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.    योजनेची पूर्ण माहिती व अर्ज करण्याची कार्यपध्दती याबाबतचा संपूर्ण तपशिल    https.//ah.mahabms.com, या संकेतस्थळावर व गुगल प्ले स्टोअर वरील AH MAHABMS या मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे.   अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील.   अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत एसएमएसद्वारे संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने आपला भ्रमणध्वनी क्रमांक योजनेंतर्गत अंतिम निवड होईपर्यंत बदलू नये.   अर्जदाराची प्राथमिक निवड अर्जदाराने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीनुसार संगणकाद्वारे करण्यात येणार असली तरी अंतिम निवड ही त्याने अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या आधारेच करण्यात येईल.   तरी इच्छुक अर्जदारांनी आपला   अर्ज

अलिबाग तालुका विकास कामांबाबत आढावा बैठक शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी करावी -- पालकमंत्री रविंद्र चव्हाण

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.24 (जिमाका)- शहरी व ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासन अनेक महत्वाकांक्षी योजना राबवित असून योजनांची तातडीने अंमलबजावणी करुन योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावा असे निर्देश राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड श्री. रविंद्र चव्हाण यांनी दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित अलिबाग तालुक्यातील विकास कामांबाबत आढावा बैठकीत ते आज बोलत होते.             यावेळी सिडकोचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्र.जिल्हाधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीम.पद्यश्री बैनाडे  उपविभागीय अधिकारी अलिबाग श्रीम. शारदा पोवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, ॲङ महेश मोहिते, आदी उपस्थित होते.             यावेळी मार्गदर्शन करताना श्री. चव्हाण म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजना शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.   केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदार

मुरुड तालुका विकास कामांबाबत आढावा बैठक शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा-- पालकमंत्री रविंद्र चव्हाण

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.24 (जिमाका)- शहरी व ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासन अनेक लोकाभिमुख योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत  पोहचला पाहिजे असे प्रतिपादन, राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड श्री. रविंद्र चव्हाण यांनी केले.  प्रकृती रिसॉर्ट काशिद येथे मुरुड तालुक्यातील विकास कामांबाबत आढावा बैठकीत ते आज बोलत होते.             यावेळी सिडकोचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, मुरूड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीम.स्नेहा पाटील, उपविभागीय अधिकारी अलिबाग श्रीम. शारदा पोवार, तहसिलदार परिक्षित पाटील, मुरूड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर साळे, ॲङ महेश मोहिते, शशी  धारप  आदी उपस्थित होते.              यावेळी मार्गदर्शन करताना श्री. चव्हाण म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.  शेतकरी कर्जमाफी, जलयुक्त शिवार, पिक विमा योजना, शेतजमीन वर्ग करण्याचा निर्णय, सरळसेवा भरती, सेवा हमी कायदा, महिलांना संरक्षण अशा अनेक नाविण्यपूर्ण योजना शासन राबवित आहे. केंद्र व