अलिबाग तालुका विकास कामांबाबत आढावा बैठक शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी करावी -- पालकमंत्री रविंद्र चव्हाण



अलिबाग, जि. रायगड, दि.24 (जिमाका)- शहरी व ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासन अनेक महत्वाकांक्षी योजना राबवित असून योजनांची तातडीने अंमलबजावणी करुन योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावा असे निर्देश राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड श्री. रविंद्र चव्हाण यांनी दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित अलिबाग तालुक्यातील विकास कामांबाबत आढावा बैठकीत ते आज बोलत होते.
            यावेळी सिडकोचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्र.जिल्हाधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीम.पद्यश्री बैनाडे  उपविभागीय अधिकारी अलिबाग श्रीम. शारदा पोवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, ॲङ महेश मोहिते, आदी उपस्थित होते.
            यावेळी मार्गदर्शन करताना श्री. चव्हाण म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजना शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.   केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष्य निर्धारित करून काम करावे, अशा सूचना श्री. चव्हाण यांनी आढावा बैठकीत दिल्या.    या योजनांची सर्वसामान्य माणसाला माहिती व्हावी यासाठी अधिकाधिक प्रचार प्रसिध्दी मोहिम राबवावी.   यावेळी श्री.चव्हाण यांनी अलिबाग तालुक्याच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, नगर परिषद, एसटी महामंडळ, पाणीपुरवठा, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, मत्स्य व्यवसाय, बंदर विभाग आदि विविध शासकीय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबतचा आढावा घेतला.  बैठकीच्या प्रारंभी अलिबाग तालुक्यातील मान तर्फे झिराड ग्रामपंचायत अंतर्गत मानीगाव येथील सिमेंट बंधारे लोकार्पण व जलपुजन मा.पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचेहस्ते करण्यात आले.या बैठकीला अलिबाग तालुक्यातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक