Posts

Showing posts from December 24, 2023

शासन आपल्या दारी” कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सर्वांनी योगदान द्यावे--जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे

       रायगड(जिमाका)दि.29:-  शासनाच्या विविध योजना खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने शुक्रवार दि.5 जानेवारी 2023 रोजी  दु. 12.30 वा माणगाव तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे शासन आपल्या दारी या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.             या कार्यक्रमाबाबत माहिती देतांना जिल्हाधिकारी श्री.म्हसे पुढे म्हणाले  अनेक नागरिक हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही ते केवळ संबंधित शासकीय कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात. शासकीय योजनांसाठी पात्र असलेले लाभधारक व शासन यांच्यामध्ये अधिक समन्वय व्हावा व जबाबदार शासनाचा प्रत्यय सर्वसामान्यांना मिळावा, यासाठी शास

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीसाठी दि.15 जानेवारी पर्यत मुदतवाढ

    रायगड(जिमाका)दि.29:-  पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदी करीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता दि.31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापी. ऑनलाईन पोर्टलवरील माहितीनुसार, मागील हंगामाचा विचार करता शेतकरी नोदणी पुरेशी झाल्याचे न दिसल्याने शासनाने या बाबीचा विचार करुन या चालू हंगामामध्ये पुरेशा प्रमाणात शेतकरी नोंदणी व्हावी, म्हणून पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता, दि. 15 जानेवारी 2024 अखेरपर्यत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी दिली आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून आधारभूत किंमतीचा शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने  व त्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये, यासाठी राज्य शासनाने राज्यात खरेदी केंद्र सुरु केली आहेत.  हंगाम 2016-2017 पासून विकेंद्रीत खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्याव

आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी अर्ज सादर करावेत-जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे

  रायगड(जिमाका)दि.29:- रायगड जिल्ह्यातील सध्या रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  https://raigad.gov.in ,  या वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. रिक्त असलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी  https://raigad.gov.in , या संकेत स्थळावरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करून सदरचे अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दि.30 जानेवारी 2024 रोजी सायं. 06.00 वा. पर्यंत नोंदणी शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे.   महाराष्ट्र राज्यात सध्या कार्यरत असलेली सर्व महा ई सेवा केंद्रे, सेतु सुविधा केंद्रे, नागरी सुविधा केंद्रे तसेच संग्राम केंद्रे यांना "आपले सरकार सेवा केंद्र" हे नाव देऊन सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरचे एकसारखे बँडींग करण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रात किमान एक केंद्र स्थापन करण्यात येईल, मात्र 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या (2011 च्या जनगणनेनुसार) किमान 2 केंद्रे स्थापन करण्यात येईल. शहरी भागासाठी आपले सरकार केंद्रासाठी महानगरपा

भारत निवडणूक आयोगाकडून पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ

    रायगड,दि.28(जिमाका):-  भारत निवडणूक आयोगाने 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि.29 मे व दि.25 सप्टेंबर 2023 च्या पत्राने जाहीर केला आहे. त्यानुसार दावे व हरकती निकाली काढण्याचा अंतिम दि.26 डिसेंबर 2023 हा होता. भारत निवडणूक आयोगाकडून पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ देण्यात आलेली असून, सुधारित पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सुधारित कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे :- शुक्रवार दि.12 जानेवारी 2024 दावे व हरकती निकाली काढणे, बुधवार, दि.17 जानेवारी 2024 मतदार यादीचे Health Parameter तपासणे आणि अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी घेणे, डेटा बेस अद्ययावत करणे व पुरवणी याद्यांची छपाई करणे, सोमवार दि.22 जानेवारी 2024  अंतिम प्रसिध्दी असा आहे.    प्रारुप मतदार यादी दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिध्द झाली आहे. नागरिकांनी प्रारुप मतदार यादीमध्ये आपले नाव आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. बऱ्याचवेळा मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असतात. तरी आपले नाव, पत्ता, जन्म दि

नागोठणे पोलीस ठाणे नवीन प्रशासकीय इमारतीचा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करावा-- पालकमंत्री उदय सामंत

Image
    रायगड,दि.27(जिमाका):-  रायगड जिल्ह्यातील नागोठणे पोलीस ठाणेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन  राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते आज झाले. पोलिसांविषयी जनतेच्या मनात आदरयुक्त भिती आहे. याप्रमाणेच गुन्हेगारांवर वचक निर्माण करा, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. नागोठणे येथे आयोजित या कार्यक्रमास आमदार अनिकेत तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उप वनसंरक्षक राहुल पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, रायगड पोलीस विभागाने ड्रग्ज पकडण्याची केलेली कामागिरी कौतुकास्पद असून यासाठी रायगड पोलिसांचे विशेष अभिनंदन करतो. समाजातील वाईट प्रवृत्तीबाबत पोलीस आणि नागरिकांनी दक्ष राहिले पाहिजे, समाजातील ड्रग्ज आणि सावकारी समूळ नष्ट झाले पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत असेही पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी

बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपाताच्या तक्रारीकरिता 1800 233 4475 हेल्पलाईन क्रमांक सुरु

  रायगड,दि.27(जिमाका):-   रायगड जिल्हयात स्वीभ्रुण हत्या रोखणे जनजागृती अभियान सुरु करण्यात आले असून बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात होत असल्यास नागरिकांना तक्रार देण्याकरिता 1800 233 4475 हा हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी दिली आहे. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम 1994 सुधारित 2003 या कायद्यातील कोणत्याहीत तरतूदींचे अथवा नियमांचे उल्लघन झाल्याचे आढळून आल्यास जिल्हा शल्यचिकित्सक रायगड-अलिबाग यांच्याकडे प्रत्यक्ष किंवा अर्जाद्वारे कोणीही तक्रार नोंदणी करु शकतात माहिती देणाऱ्या व्यक्तीस बातमीची खातरजमा होवून दोषी व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतर शासनाच्या खबऱ्या या बक्षीस योजनेंतर्गत रु.1 लाख इतके बक्षीस देण्यात येईल.  माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तेव्हा कोणीही गर्भलिंग निदान व गर्भपात करु नये तसे केल्याचे आढळल्यास, पीसीपीएनडीटी व गर्भपात कायद्यातील तरतुदीनुसार उचित कारवाई करण्यात येईल. 00000000

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

    रायगड,दि.27(जिमाका):-   राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दि.28 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8.00 वा.पलावा डोंबिवली येथून पाली, ता.सुधागड, जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा.शासकीय रुग्णालय, पाली येथे आगमन व भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 12.00 वा. पेडली नवघर रस्त्यावरील लहान पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन. स्थळ:- पेडली तालुका सुधागड.  दुपारी 12.30 वा. पेडली ता. सुधागड येथून पेणकडे प्रयाण.  दुपारी 1.30 वा. शासकीय विश्रामगृह, पेण येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वा. बोरगाव, पेण येथे पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3.00 वा. पेण शहरालगत असणाऱ्या भुंड्या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन. दुपारी 3.30 वा.अंतोरा पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन.  सायंकाळी 4.15 वा. खरोशी दूरशेत पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन. सायंकाळी 5.00 वा. रावे येथील पुलांच्या बांधकामाचे व पाणीपुरवठा योजनेतील टाकी बांधकामाचे भूमिपूजन. सायंकाळी 6.00 वा.पलावा डोंबिवलीकडे प्रयाण. 0000

मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी दि.5 जानेवारी पर्यंत अर्ज करावेत

    रायगड,दि.27(जिमाका):-   एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2023-24 मध्ये मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेर प्रक्षेत्र भेट हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. त्यानुषंगाने शेतकऱ्यांना इतर राज्यातील शेती उद्योगांची माहिती व्हावी, यासाठी राज्याबाहेरील अभ्यास दौरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीमती  उज्वला बाणखेले यांनी केले आहे. राज्याबाहेर अभ्यास दौरा राबविताना शेतकऱ्यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतूने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी, शेत स्तरावर करावयाची प्रक्रिया, उद्योग स्थापन करणे, आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत व काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त ज्ञान उपलब्ध करुन देणे व या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतः ची व त्याचबरोबर समूहाची फलोत्पादन विषयक शेती उन्नत करणे या बाबीसाठी शेतकऱ्यांचा राज्याबाहेर अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. हा अभ्यास दौरा कर्नाटक राज्यातील तीन ठिकाणी मैसूर-कर्नाटका, सी.एस.आय.आर.सेन्ट्रल फुड तंत्रज्ञान आणि संशो

जिल्हास्तरीय लोकशाही दिन दि.1 जानेवरी रोजी

    रायगड,दि.27(जिमाका):-   प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार माहे जानेवारी 2024 रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि.01 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकरी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)  विठ्ठल इनामदार, यांनी कळविले आहे. 000000

वीर बाल दिवसानिमित्त वीर साहिबजादे यांच्या शौर्य आणि बलिदानास जिल्हाधिकारी कार्यालयात विनम्र अभिवादन

Image
रायगड,दि.26(जिमाका):-   वीर बाल दिवसानिमित्त तहसिलदार (सर्वसाधारण) उमाकांत कंडोर यांनी वीर साहिबजादे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शौर्य आणि बलिदानास विनम्र अभिवादन केले.  यावेळी  जिल्हाधिकारी कार्यालयातील  कर्मचारी उपस्थित होते. 00000

ग्राहक दिनानिमित ग्राहक जनजागृतीसाठी पथनाटय कार्यक्रम संपन्न

Image
      रायगड,दि.26(जिमाका):-   जिल्हा पुरवठा कार्यालय रायगड-अलिबाग, सहा.आयुक्त, अन्न औषध प्रशासन, पेण, सहा. नियंत्रक, वैध मापन विभाग, अलिबाग तसेच प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.24 डिसेंबर 2023 रोजी ग्राहक दिनानिमित अलिबाग बसस्थानक तसेच अलिबाग बीच येथे ग्राहक जनजागृतीसाठी पथनाटय कार्यक्रम संपन्न झाला. दि.24 डिसेंबर 2023 रोजी ग्राहक दिनानिमित प्राप्त असणाऱ्या हक्कांचे जसे की, सुरक्षिततेचा हक्क, माहिती मिळविण्याचा हक्क, निवडीचा हक्क, तक्रार निवारणाचा हक्क, बाजू ऐकून घेतली जाण्याचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्क इ.चे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ग्राहकांनी शासनाला सहाय करण्याबाबत, जबाबदाऱ्या व कर्तव्ये, पावतीशिवाय माल खरेदी करताना किंमत व गुणवत्ता तपासून घेणे, तक्रार निवारणासाठी योग्य ठिकाणी दाद मागण्यास शिकावे, स्वतःची फसवणूक होऊ नये म्हणून शक्यतो काळजी घेणे इ. बत ग्राहकांमध्ये जागरुकता येणे आवश्यक असल्याने त्याप्रकारचे संदेश व माहिती प्रसिध्दी माध्यमांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचविण्याविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा