बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपाताच्या तक्रारीकरिता 1800 233 4475 हेल्पलाईन क्रमांक सुरु


 

रायगड,दि.27(जिमाका):- रायगड जिल्हयात स्वीभ्रुण हत्या रोखणे जनजागृती अभियान सुरु करण्यात आले असून बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात होत असल्यास नागरिकांना तक्रार देण्याकरिता 1800 233 4475 हा हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी दिली आहे.

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम 1994 सुधारित 2003 या कायद्यातील कोणत्याहीत तरतूदींचे अथवा नियमांचे उल्लघन झाल्याचे आढळून आल्यास जिल्हा शल्यचिकित्सक रायगड-अलिबाग यांच्याकडे प्रत्यक्ष किंवा अर्जाद्वारे कोणीही तक्रार नोंदणी करु शकतात माहिती देणाऱ्या व्यक्तीस बातमीची खातरजमा होवून दोषी व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतर शासनाच्या खबऱ्या या बक्षीस योजनेंतर्गत रु.1 लाख इतके बक्षीस देण्यात येईल.  माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

तेव्हा कोणीही गर्भलिंग निदान व गर्भपात करु नये तसे केल्याचे आढळल्यास, पीसीपीएनडीटी व गर्भपात कायद्यातील तरतुदीनुसार उचित कारवाई करण्यात येईल.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक