राज्यस्तरीय युवा जागर- महाराष्ट्रावर बोलु काही, युवा संसद स्पर्धा कार्यक्रमाबाबत



अलिबाग,जि.रायगड दि.25-(जिमाका) युवामंध्ये समाजाविषयी जाणीव व जागृती व्हावी, महाराष्ट्र व देशाच्या विकासाबाबत युवांनी विचार करावा, त्यांच्यामध्ये नेतृत्व व वक्तृत्वाचे गुण निर्माण व्हावेत या उद्देशाने क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य युवक कल्याण उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय युवा जागर- महाराष्ट्रावर बोलु काही, युवा संसद स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील / उच्च माध्यमिक विद्यालयातील (इ.11 ते 12 वी) युवा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री,मा.आशिष शेलार, यांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांची व्हिडीओ कॅान्फरन्सव्दारे बैठक घेऊन सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत निर्देश व सुचना दिल्या आहेत.  या स्पर्धेतील विजेत्यांना पुढील प्रमाणे रोख बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. 
राज्यस्तर – प्रथम क्रमांक – रु.1,00,000/- व्दितीय क्रमांक रु.75,000/- व तृतीय क्रमांक रु.50,000/-
जिल्हास्तर – प्रथम क्रमांक – रु.10,000/- व्दितीय क्रमांक रु.7,000/- व तृतीय क्रमांक रु.5,000/-
गटस्तर – प्रथम क्रमांक – रु.3,000/- व्दितीय क्रमांक रु.2,000/- व तृतीय क्रमांक रु.1,000/-
            या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील / उच्च माध्यमिक विद्यालयातील  (इ.11 ते 12 वी) चे युवा विद्यार्थी सहभागी होणार आहेत.  यामध्ये प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात / उच्च माध्यमिक विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयेाजन करण्यात येईल. त्यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या योजना संबंधीचे विषय, कार्यक्रम आयोजनाबाबत सविस्तर माहिती सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील प्रथम तीन क्रमांकाचे युवा गटस्तरावरील स्पर्धेमध्ये सहभागी होतील. गटस्तरावरील प्रथम तीन क्रमांकाचे युवा जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होतील व जिल्हास्तरावरील प्रथम तीन क्रमांकांचे युवा राज्यस्तरावरील युवा संसद स्पर्धेमध्ये सहभागी होतील.  स्पर्धांचे आयेाजन कार्यक्रम महाविद्यालयस्तरावर दि.01 ते 08 ऑगस्ट 2019, गटस्तरावर 09 ते 15 ऑगस्ट 2019, जिल्हास्तरावर दि.16 ते 25 ऑगस्ट 2019 व राज्यस्तरीय स्पर्धेचे आयेाजन दि.26 ते 30 ऑगस्ट 2019 या कालावधीत होईल.
            या स्पर्धेसाठी साधारणपणे प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, निर्मल ग्राम योजना, श्रमदान, उज्वला योजना,आयुष्यमान भारत, सेवा हमी कायदा, मुद्रा योजना, पीक विमा योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक  योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, इत्यादी विषयांचा अंतर्भाव असणार आहे.
            कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर या कार्याक्रमाचे आयेाजन करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालय / उच्च माध्यमिक विद्यालयातील एक प्राध्यापक / शिक्षक यांची समन्वयक म्हणुन नियुक्ती करावयाची आहे. या कार्यक्रमाचे आयेाजन करण्यासाठी तसेच याबाबत अधिक माहीतीसाठी सचिन निकम, क्रीडा अधिकारी (मो.क्र.8856093608) यांच्याशी संपर्क साधावा किंवा dsoraigad.2009@rediffmail.comया ईमेलवर कळवावे असे प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम. अंकिता मयेकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक