भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लाभ घेण्याचे आवाहन



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29- शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे.  या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन  सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.
या योजनेसाठी विद्यार्थ्यांना दहावी, बारावी, पदवी, पदविका पन्नास टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.  अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा चाळीस टक्के असेल.  या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर (इयत्ता अकरावी, पदवी, पदव्युत्तर पदवी) शिक्षण घेण्यासाठी शासकीय  वसतिगृहात प्रवेशित नसणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी पुढीलप्रमाणे रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरीत करण्यात येईल.
निकषः- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा व विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा. शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द या प्रवर्गाचा असावा व विद्यार्थ्यांने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.   विद्यार्थ्यांचे स्वत:चा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत, शेड्युल्ड बँकेत खाते उघडलेले असावे व त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल.  विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अडीच  लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी स्थानिक नसावा (ज्या महाविद्यालय, शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतलेला आहे तो विद्यार्थी ते महाविद्यालय, शैक्षणिक संस्था ज्या महानगरपालिका येथील रहिवासी नसावा.)  महानगर पालिकेच्या हद्दीपासून पाच कि.मी.परिसरात असलेल्या महाविद्यालयात, शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थी सुध्दा या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील.  विद्यार्थी इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा.  पदवी, पदविका, दोन वर्षापेक्षा कमी नसणाऱ्या कोणत्याही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमास सदर विद्यार्थ्यास पुढे लाभ घेण्याकरिता किमान पन्नास टक्के गुण किंवा त्याप्रमाणात ग्रेडेशन,CGPA असणे आवश्यक राहिल.  बारावी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा.  सन 2018-19 मध्ये जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेशित असलेले विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी महाविद्यालयांनी खबरदारी घ्यावी, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी कळविले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक