इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा शुभारंभ शुक्रवारी



                                                                                                                                  
             अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30 सर्वसामान्य ग्रामीण जनतेमध्ये अर्थसाक्षरता निर्माण करुन आर्थिक स्थैर्यासाठी निर्माण झालेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा शुभारंभ मा.प्रधानमंत्री  नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते होत असून त्याचाच प्रातिनिधिक भाग म्हणून रायगड डाकविभाग अंतर्गत अलिबाग शाखेचा शुभारंभ केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उद्योग मंत्री मा.अनंत गिते यांच्या हस्ते शनिवार दि. 1 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वा. अलिबाग पोस्ट ऑफीसच्या प्रांगणात होणार आहे. 
            या सोहळ्याच्या आयोजक PMG नवी मुंबई या आहेत.  या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण  तर आ. जयंत पाटील, आ.सुभाष पाटील उपस्थित राहणार आहेत.
              इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही पूर्णत: भारतीय डाक विभाग, संचार मंत्रालय संलग्न शंभर टक्के भारत सरकारचे  समभाग असणारी यंत्रणा आहे.  या बँकेचे सेव्हिंग खाते, बेसिक सेव्हिंग खाते, चालू खाते ग्राहक आधार कार्डाने उघडू शकणार आहे.  हे पूर्णत: कागद विरहीत खाते असल्याने (ना स्लीप भरण्याची गरज, ना पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज झिरो बँलन्स खाते) यामुळे ग्राहकाला आनंदी करणारे खाते आहे.  तसेच लेटेस्ट तंत्रज्ञानची सुविधा (मोबाईल ॲप, ऑनलाईन व व्यवहारासाठी क्यूआर कार्डची सोय) उपलब्ध आहे. ग्रामीण भागात असणाऱ्या नेटवर्कचा विचार केला गेला तर ग्रामीण भागात असणाऱ्या सर्व बँकाच्या अडीचपट जास्त शाखा असणारे भारतीय डाक विभागामुळे इंडिया पोस्ट पेमेंट बँकसाठी सर्वात मोठे नेटवर्क ग्रामीण स्तरावर सहज उपलब्ध होणार आहे.  इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या देशभरात 650 शाखा आणि 3250 सर्व्हिस सेवा केंद्र एकाच वेळी शुभारंभाने उघडली जाणार आहेत.  लवकरच याची संख्या 1 लाख 30 हजार होईल.  विद्यार्थी, शेतकरी DBT लाभार्थी, छोटे व्यापारी, गृहिणी यांच्यासाठी उपयुक्त असणारे खाते आहे.(पैसे भरण्याची, काढण्याची सुविधा घरपोच)
इंडिया पोस्ट पेमेंट बँक चे एक खाते जे जगाशी जोडते आपले नाते.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक