राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी अर्ज मागितले



अलिबाग,जि.रायगड दि.1 (जिमाका)-  केंद्र शासनाच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय कल्याण विभाग नवी दिल्ली यांनी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर युवकांच्या विकासासाठी राष्ट्रीय, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 13 ते 15 वयोगटातील युवक-युवती व स्वयंसेवी संस्थांकडून राष्ट्रीय युवा पुरस्कार 2016-2017 करिता नामांकने मागविली आहेत.   आवश्यक माहिती व अर्ज wwwyas.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
या पुरस्काराचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहेत. युवा पुरस्कार (वैयक्तिक)-सदर पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रुपये चाळीस हजार (प्रति युवक-युवतींसाठी).  युवा पुरस्कार (संस्था) – प्रति संस्थेसाठी सदरच्या पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रुपये दोन लक्ष अशा स्वरुपाचा असेल.   जिल्ह्यातील इच्छुकांनी 4 सप्टेंबर पर्यंत आपले अर्ज तीन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे दुपारी बाराच्या आत सादर करावेत.  तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहुली-संगम रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक