डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार 28 सप्टेंबर पर्यंत अर्ज मागविले




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29 शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क, ड, वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये पन्नास हजार, तीस हजार, वीस हजार, दहा हजार रोख रक्कम व शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.
            राज्यस्तरीय प्रत्येक एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांनी प्रत्येक रुपये पंचवीस हजार रोख रक्कम, शाल, श्रीफळ, आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभाग स्तरावर प्रत्येक एक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रुपये पंधरा हजार रोख रक्कम, शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.  सन 2018-19 च्या पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रंथालय, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज 28 सप्टेंबर पर्यंत तीन प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी या कार्यालयाकडे सादर करावेत असे आवाहन प्र.ग्रंथालय संचालक सुभाष हि.राठोड यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक