जिल्ह्यातील 121 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.31- ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या राज्यातील 1041 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून त्यात रायगड जिल्ह्यातील 121 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.तसेच सरपंच पद रिक्त असलेल्या तीन ग्रामपंचायतींची सरपंच पदासाठी थेट निवडणूक होणार आहे.
या कार्यक्रमात दि.5 ते 11 सप्टेंबर सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळात नामनिर्देशन पत्र मागविणे व सादर करणे,  दि.12 सप्टेंबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी सकाळी 11 ते छाननी संपेपर्यंत, नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा व निवडणूक चिन्ह  नेमून देण्याचा दिनांक शनिवार दि. 15 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत,   आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक बुधवार दि.26 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायं. साडेपाच दरम्यान. मतमोजणी गुरुवार दि.27 सप्टेंबर , निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्धी शनिवार दि.29 सप्टेंबर रोजी करण्यात येईल. या प्रमाणे कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण शाखेने कळविला आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक