मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण डिसेंबर 2019 अखेर पूर्ण करणार-ना.चंद्रकांत पाटील



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.31- मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे गणेशोत्सावापूर्वी तातडीने भरण्यात येतील तसेच या  महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम डिसेंबर 2019 पर्यंत  पूर्ण करण्यात येईल, असे राज्याचे सार्वजनिक बाधंकाम व महसुल मंत्री ना.चंद्रकांत पाटील  यांनी माणगाव येथे शासकीय विश्राम गृह येथे  माध्यम प्रतिनिधींना सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा ना. पाटील यांनी आज पनवेल ते माणगांव दरम्यान पाहणी दौरा केला. यावेळी त्यांचे समवेत केंद्रीय  अवजड उद्योग मंत्री ना.अनंत गिते, पालक मंत्री ना. रविंद्र चव्हाण , जिल्हा परिषद अध्यक्ष ‍आदिती तटकरे, आ.  अनिकेत तटकरे, ‍आ. निरंजन डावखरे,  आ. प्रशांत ठाकूर, आ. भरतशेठ गोगावले, माणगाव नगराध्यक्ष योगिता चव्हाण,  नगरसेवक,  ‍विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्येकर्ते तसेच माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिगावकर, तहसिलदार उर्मिला पाटील, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्गाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
         यावेळी ना. पाटील म्हणाले की,   रस्त्याचे पहिल्या टप्प्याचे काम निधीअभावी रखडले होते. केंद्राने 10 हजार कोटीचा निधी उपलब्ध करुन दिल्याने पनवेल ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा पत्रादेवी पर्यंत काम डिसेंबर 2019 पर्यंत पुर्ण करू, हा संपुर्ण रस्ता सिमेंट काँक्रीटचा करणार असून 10 ते 12 वर्ष या रस्त्यावर खड्डा पडणार नाही, याची काळजी घेतली जाईल. तरीही खड्डे पडले तर ठेकेदारास  जबाबदार धरले जाईल. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबईतून कोकणात येत असतात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावर पडलेले सर्व खड्डे बुजवण्यात येतील, असेही ना. पाटील यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक