भात पिकावरील खोडकिड प्रतिबंधासाठी उपाययोजना



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29 कर्जत तालुक्यात या वर्षीच्या खरीप हंगामात 9170 हेक्टर वर भात पिकाची लावणी झाली असून आतापर्यंत 3500 मि.मी. इतका पाऊस झाला आहे.  सद्यस्थितीत भात पिकाची जोमदार वाढ झाली असून भातपिक वाढीच्या अवस्थेत आहे.  मर्यादित ठिकाणी खोडकिड्यांचा प्रादूर्भाव झाला आहे परंतु पिक आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या खाली आहे.  कृषि विभागामार्फत यासंदर्भात cropsap (कीड रोग सर्वेक्षण व सल्ला पध्दत) नावाची ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात करण्यात आली असून कर्जत तालुक्यात 23 कृषि सहाय्यक व 4 कृषी पर्यवेक्षक यांचेमार्फत दिवसाआड कीड व रोगांची निरीक्षणे घेऊन ऑनलाईन प्रणालीवर नोंदवली जातात.  कोणतीही कीड तसेच रोग आढळल्यावर संबधित शेतकरी यांना त्यासंबंधी उपाययोजना सांगितल्या जातात. 
या प्रकल्पांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत प्रमुख किडी व रोगांचे भित्तीपत्रके लावण्यात आली असून कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक यांचेमार्फत कीड व रोगांची ओळख व त्यासंबधीच्या उपाययोजनांसाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरु आहे.  खोडकिड्यांच्या संदर्भात कर्जत तालुक्यात भात पिकात 2225 एवढे कामगंध सापळे बसविण्यात आले असून त्याच्या माध्यमातून जैविक कीड नियंत्रण  करण्यात येत आहे.  खोड किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास पुढील उपाययोजना कराव्यात.  फोरेट 10 जी, 10 किलो प्रती हेक्टर.  क्विनालफोस 5 जी, 15 किलो प्रती हेक्टर.  कार्बोफुरोन 16.5 किलो प्रती हेक्टर.  एन्डोसल्फान 35 टक्के प्रवाही 850 मिली प्रती हेक्टर.   अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कृषी सहाय्क यांचेशी संपर्क साधावा असे, वै.ह.विश्वे, तालुका कृषी अधिकारी कर्जत यांनी कळविले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक