पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा दौरा



अलिबाग दि.30, बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण हे दि. 31 ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
शुक्रवार दि.31 रोजी सकाळी पाऊणे सात वा. शासकीय विश्रामगृह पनवेल येथे आगमन व राखीव. सकाळी आठ वा. मा.मंत्री (सा.बां.) महोदयांच्या समवेत राष्ट्रीय महामार्ग क्र.66 च्या पनवेल-इंदापूर-माणगांव रस्त्याचा पाहणी दौरा. सकाळी आकरा वा. शासकीय विश्रामगृह माणगांव जि.रायगड येथे आगमन व राखीव. सव्वा अकरा वाजता मा.मंत्री (सा.बां) महोदयांच्या समवेत राष्ट्रीय महामार्ग क्र.66 च्या माणगाव ते चिपळूण रस्त्याची पाहणी दौऱ्यासाठी रवाना.  रात्रौ पावनेबारा वाजता कणकवली येथून मुंबई एक्सप्रेसने पनवेलकडे प्रयाण. शनिवार दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 8.25 वाजता पनवेल येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण. 
0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक