लोकराज्य वाचक अभियान : लोकराज्य वाचणे ही एक चांगली सवय- डॉ. अजित गवळी






अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1-  राज्य शासनाचे मुखपत्र असलेले ‘लोकराज्य’ मासिकात विविध शासकीय योजनांची अधिकृत आणि विश्वासार्ह माहिती दिलेली असते. हे मासिक अत्यंत माहितीपूर्ण आणि वाचनीय आहे. ही माहिती वाचून आपल्या ज्ञानात वाढ होते, म्हणूनच लोकराज्य वाचणे ही एक चांगली सवय आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी आज येथे केले.
लोकराज्य वाचक अभियानांतर्गत अलिबाग येथील डोंगरे हॉल येथील सार्वजनिक वाचनालयात  वाचकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने हे ही उपस्थित होते. यावेळी  उपस्थित मान्यवरांचे लोकराज्य अंक भेट देऊन स्वागत करण्यात आले. डॉ. गवळी वाचकांशी संवाद साधतांना पुढे म्हणाले की, आपले ज्ञान अद्यावत करण्यात लोकराज्यच्या माहितीचा खूप उपयोग होतो. स्पर्धा परीक्षेसाठीही ते आवश्यक असते.  असा हा लोकराज्य प्रत्येकाने अवश्य वाचायला हवा. आपल्या जवळच्या लोकांना, मित्रांना वाचवयास सांगा, असे आवाहन डॉ. गवळी यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी वळवी म्हणाले की, लोकराज्य वाचक अभियानाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध ग्रंथालयांमार्फत वाचकांपर्यंत ही चळवळ पोहोचविण्यात येईल. यावेळी उपस्थित ज्येष्ठ वाचक सुभाष पाणसकर यांनीही आपल्या मनोगतात, लोकराज्य सारखे वाचनीय व माहितीने परिपूर्ण मासिक  जनमानसात पोहोचवले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. दुसाने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे अजित पवार, सार्वजनिक वाचनालयाचे    , जिल्हा माहिती कार्यालयाचे विठ्ठल बेंदूगडे, सचिन काळोखे, धनंजय कासार, सचिन राऊत आदींनी परीश्रम घेतले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड