आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज मागविले



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.31- राज्यात सध्या कार्यरत असलेली सर्व महा ई सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्रे, नागरी सुविधा केंद्रे तसेच  संग्राम केंद्रे यांना आपले सरकार सेवा केंद्र हे नाव देऊन सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरचे एकसारखे ब्रँडिग करण्यात येत आहे.  ‘आपले सरकार सेवा केंद्र’ यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी माहिती व तंत्रज्ञान महामंडळावर सोपविण्यात आलेली आहे.  प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात एक आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येईल.  मात्र 5000 पेक्षा अधिक लोकसंख्या (2011 च्या जनगणनेनुसार) असलेल्या ग्रामपंचायतीत किमान दोन केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.   शहरी भागासाठी आपले सरकार केंद्रासाठी महानगरपालिका व नगरपरिषद दहा हजार लोकसंख्येसाठी एक केंद्र, प्रत्येक नगर पंचायत क्षेत्रात किमान एक केंद्र स्थापन करण्यात येईल. पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नगर पंचायतीत किमान दोन केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.  सध्या रिक्त आलेल्या आपले सरकार सेवा केंद्राची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://raigad.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी वरील संकेत स्थळावरुन अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन सदरचे अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांच्याकडे सादर करावेत असे तहसिलदार (सर्वसामान्य) के.डी.नाडेकर यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक