राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी मागितले अर्ज
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.1- केंद्र शासनाच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय कल्याण
विभाग नवी दिल्ली यांनी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर युवकांच्या विकासासाठी
राष्ट्रीय, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 13 ते 15 वयोगटातील
युवक-युवती व स्वयंसेवी संस्थांकडून राष्ट्रीय युवा पुरस्कार 2016-2017 करिता
नामांकने मागविली आहेत. आवश्यक माहिती व
अर्ज wwwyas.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या पुरस्काराचे
स्वरुप पुढीलप्रमाणे आहेत. युवा पुरस्कार
(वैयक्तिक)-सदर पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रुपये
चाळीस हजार (प्रति युवक-युवतींसाठी). युवा पुरस्कार (संस्था) – प्रति
संस्थेसाठी सदरच्या पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रुपये
दोन लक्ष अशा स्वरुपाचा असेल.
जिल्ह्यातील इच्छुकांनी 4 सप्टेंबर पर्यंत आपले अर्ज तीन प्रतीत जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे दुपारी बाराच्या आत सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, नेहुली-संगम रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा
अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment