मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान धनंजय माळी यांची नांदगाव येथे भेट व पाहणी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.9- मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (VSTF) अंतर्गत नांदगांव ग्रामपंचायत क्षेत्रात महाराष्ट्र राज्य गृह निर्माण संचालक व ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्यकारी अधिकारी धनंजय माळी यांनी नांदगाव ता.सुधागड या गावात शनिवारी (दि.5) मुक्कामी राहून ग्रामस्थांशी संवाद साधला.
या भेटीत माळी यांनी गावातच मुक्काम व सहभोजन करित रात्र सभेत आवास योजना,समाज परिवर्तन, वार्षिक उत्पन्न वाढण्यासाठीचे पर्याय,अशा अनेक विषयांवर ग्रामस्थांशी चर्चा केली विनोद मानेकर, सरपंच, ग्रामस्थ, ग्रामपरिवर्तक,ग्रामसेवक उपस्थित होते.यावेळी त्यांनी ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानाचे स्वयंमुल्यनिर्धारणाबाबत ग्रामपरिवर्तकांचा आढावा घेतला व अडचणी असलेल्या समस्या सोडविण्याचे नियोजन केले. तसेच गेल्या दिड वर्षात ग्रामविकास आराखडा नुसार झालेल्या कामांचाआढावा घेतला. गावातील भूमिहीन कुटुंबांना स्वयंरोजरासाठी कौशल्य विकासावर भर देऊन शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले. या दौऱ्यात माळी यांनी  शिवार फेरी केली. तसेच जलसंधारण ची कामे करण्यासंदर्भात पाहणी केली.  या भेटी करिता गट विकास अधिकारी म्हात्रे, सरपंच सौ.सोनल ठकोरे, ग्रामसेवक सौ.वर्षा जाधव, ग्रामपरिवर्तक नीता गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक