आदर्श पतसंस्था कार्यालय उद्घाटन : ग्राहकांचा विश्वास,संचालकांची मेहनत हिच सहकाराची विश्वासार्हता - ना.रविंद्र चव्हाण



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 7- सहकारी संस्थांनी चांगल्या पध्दतीने काम करावे, ग्राहकांमधील विश्‍वास संपादन करून तो टिकवणे महत्त्वाचे आहे. संचालकांची मेहनत ही सहकार चळवळ पुढे नेण्याचे काम करते. ग्राहकांचा विश्वास आणि संचालकांची मेहनत हिच सहकार चळवळीची विश्वासार्हता आहे, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आज येथे केले.
येथील आदर्श  पतसंस्थेच्या ‘आदर्श भवन’ या मुख्य कार्यालयाच्या वास्तूचा उद्घाटन सोहळा आज  पार पडला. या सोहळ्यास उद्घाटक म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद सदस्य आ. जयंत पाटील हे होते. यावेळी  सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, अलिबाग-मुरुडचे आमदार सुभाष उर्फ पंडितशेट पाटील,अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांतशेट नाईक सहकार भारतीचे महासचिव डॉ. उदय जोशी, जिल्हा उपनिबंधक पी.एम खोडका आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ना. चव्हाण म्हणाले की, पतसंस्थेतील संचालक,कर्मचारी वर्गाने आदर्शवत काम करून  अद्ययावत पतसंस्था मेहनतीने उभारली आहे. या पतसंस्थेने सहकार चळवळ वाढवत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करुन  वेगळी उंची गाठली आहे.
या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष हिम्मतमल जैन, सचिव कैलास जगे,  संचालक  विजय पटेल, अनंत म्हात्रे, सतिश प्रधान, विलास सरतांडेल, ॲड. आत्माराम काटकर, जगदीश पाटील, अभिजीत पाटील, ॲड. सौ. रेश्मा पाटील, ॲड. सौ. वर्षा शेठ, विलास ठाकूर, सुरेश गावंड, कार्यकारी संचालक मिनाक्षी पाटील आदी  तसेच संस्थेचे सभासद, ठेविदार, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक