“युवा महोत्सव- जल्लोष तरुणाईचा 2020” चे ऑनलाइन आयोजन 26 डिसेंबर रोजी

 

           अलिबाग,जि.रायगड दि.22 (जिमाका) :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय,अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. 26 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे.

                 या युवा महोत्सवामध्ये युवक-युवतींना आपल्या विविध सुप्त कला गुण प्रदर्शित करण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होत आहे.जिल्हास्तरावर प्रावीण्य मिळविणा-या युवा कलाकारांना  शासनाच्या वतीने आयोजित राज्य व राष्ट्रीय पातळीवरील युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात येणार असून युवा महोत्सवासाठी 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक / युवती सहभाग घेऊ शकतात.जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन स्पर्धात्मक पद्धतीने केले जाणार आहे.

            कलाप्रकार:- लोकनृत्य, कलाकार संख्या- 20, वेळ मर्यादा मिनिटांमध्ये-15.  कलाप्रकार:- लोकगीत- कलाकार संख्या-06, वेळ मर्यादा मिनिटांमध्ये-07, कलाप्रकार:- एकांकिका (इंग्रजी/हिंदी), कलाकार संख्या-12, वेळ मर्यादा मिनिटांमध्ये-45, कलाप्रकार:- शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी), कलाकार संख्या-01, वेळ मर्यादा मिनिटांमध्ये-15, कलाप्रकार:- शास्त्रीय नृत्य- भरतनाट्यम, कथक, मणिपुरी,ओडिसी, कुचीपुडी, कलाकार संख्या- प्रत्येकी 01, वेळ मर्यादा मिनिटांमध्ये-प्रत्येकी 15, कलाप्रकार:- वक्तृत्व- कलाकार संख्या-1, वेळ मर्यादा मिनिटांमध्ये-4,   कलाप्रकार:- शास्त्रीय बासरी- कलाकार संख्या-1, वेळ मर्यादा मिनिटांमध्ये-15, सितार- कलाकार संख्या-1, वेळ मर्यादा मिनिटांमध्ये-15, तबला- कलाकार संख्या-1, वेळ मर्यादा मिनिटांमध्ये-10, वीणा- कलाकार संख्या-1, वेळ मर्यादा मिनिटांमध्ये-15, मृदुंग- कलाकार संख्या-1, वेळ मर्यादा मिनिटांमध्ये-10, हार्मोनियम (लाईट)- कलाकार संख्या-1, वेळ मर्यादा मिनिटांमध्ये-10, गिटार- कलाकार संख्या-1, वेळ मर्यादा मिनिटांमध्ये-10,

            विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्रे देण्यात येतील व त्यांना विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावील युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त करून दिली जाणार आहे.

             युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे:-

     युवा महोत्सवामध्ये आयोजित करण्यात येणा-या बाबी व सहभागी होण्यासाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे -

          युवा महोत्सवाचे आयेाजन ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.

          दि.25 डिसेंबर 2020 रोजीपर्यंत पूर्व नोंदणी केलेल्या स्पर्धकांनाच सहभागी होता येणार आहे.

          पूर्व नोंदणी मोबाईल क्र.8856093608 वर व्हॉट्सॲपव्दारे केली जाईल.

          सहभागी युवा 15 ते 29 वयोगटातील असावा.ज्या बाबींना साथसंगत आवश्यक आहे त्या कलाकारांना वयोमर्यादा लागू नाही.

          एकांकिकेमध्ये सहभागी होणारे सर्व युवा कलाकार तसेच एकांकिका लेखक, निर्माता, दिग्दर्शकसुद्धा 15 ते 29 वयोगटातील असणे आवश्यक राहील.

          सहभागी होणारा युवा हा रायगड जिल्ह्यातील असणे आवश्यक आहे.

          ओडीसी, भरतनाट्यम, मणिपुरी, कथ्थक, कुचीपुडी नृत्य सादर करणा-या कलाकारांना पुर्वमुद्रीत ध्वनीफीतीवर (कॅसेट/सीडी) कार्यक्रम सादर करता येईल.

          लोकगीत व लोकनृत्य या प्रकारातील गीते चित्रपट बाह्य असावीत. लोकनृत्य प्रकाराकरीता टेप अथवा कॅसेटसाठी परवानगी दिली जाणार नाही.

          कलाकारांनी आवश्यक असणारे साहित्य स्वत:च्या जबाबदारीवर आणावे उदा.मेक अप किट इ.

          इलेक्ट्रॉनिक वाद्य स्पर्धात्मक प्रकारांमध्ये वापरण्यास परवानगी नाही.

          शास्त्रीय गायनामध्ये चित्रपटातील गीतास परवानगी दिली जाणार नाही.

          वक्तृत्व स्पर्धांसाठी चिठ्ठी काढून जो विषय मिळेल त्या विषयावर बोलणे आवश्यक आहे.

          युवा महोत्सवातील कार्यक्रमामध्ये बदल करण्याचे अधिकार आयोजन समितीने राखून ठेवले आहेत.

          कलाकाराचे वय हे दि. 12 जानेवारी, 2021 रोजीपर्यंत 15 ते 29 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. स्पर्धकाने स्पर्धेस येताना सोबत जन्मतारखेचा दाखला/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स/पॅन कार्ड पैकी एकाची साक्षांकित प्रत आणणे आवश्यक आहे.

             जिल्ह्यातील प्रतिभावंत कलाकार, संगीत विद्यालय, महाविद्यालये, सांस्कृतिक मंडळे, नामांकित कलाकार, सस्थांनी महोत्सवात सहभागी व्हावे, जेणेकरून उत्कृष्ठ कलाकारांना विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी दाखविण्याची संधी उपलब्ध होईल.

             विहीत नमुन्यातील प्रवेशिका बाब निहाय सादर करावी. प्रवेशिका प्राप्त करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा संकुल,नेहुली संगम, पो.वेश्वी, ता.अलिबाग, सचिन निकम, क्रीडा अधिकारी मो. 8856093608 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडीक यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक