जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांनी मानीव अभिहस्तांतरण मोहिमेचा लाभ घ्यावा

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.24 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भाग मिळून एकूण 4 हजार 75 गृहनिर्माण संस्था असून या संस्थांपैकी विकासक, बिल्डर, जागामालक यांच्या असहकार्यामुळे संस्थांचे अभिहस्तांतरण खूपच अल्प प्रमाणात झालेले आहे. वास्तविक पहाता सहकारी संस्था नोंदणी झाल्यानंतर 4 महिन्यात विकासकानी संस्थेच्या इमारतीचे अभिहस्तांतरण करुन देण्याची जबाबदारी विकासक यांची असूनदेखील विकासक यांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले असल्यामुळे गृहनिर्माण संस्था अभिहस्तांतरणापासून वंचित राहिलेल्या आहेत.

                शासनाने या बाबतीत इमारतीचे मानीव अभिहस्तांतरण करण्यासाठी मोलाचा वाटा उचलून विकासक यांना बाजूला ठेवून गृहनिर्माण संस्थांना मानीव अभिहस्तांतरण करण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे. शासन अधिसूचना क्रमांक 129 दिनांक 27 सप्टेंबर 2010 तसेच शासन निर्णय क्रमांक माहस-2008/प्र.क्र.24/भाग-2/दुवपू-2 दिनांक 25 फेब्रुवारी 2011 अन्वये महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकाबाबत अधिनियम 1963 मध्ये दिनांक 25 फेब्रुवारी 2008 रोजी सुधारणा करण्यात आलेले आहेत व त्यांना सदर अधिनियमातील कलम 5,10 व 11 खालील अधिकाराचा वापर करण्याचा आणि कर्तव्य पार पाडण्याच्या प्रयोजनासाठी अधिसूचित करण्यात आलेले आहेत.

                ज्या ठिकाणी  विकासकाने बांधलेली इमारत पूर्ण होवून देखील गृहनिर्माण संस्था स्थापन होवून देखील, नियमाप्रमाणे सदर इमारतीच्या खालील जमिनीचे हस्तांतरण झालेले नसेल, अशा वेळी मानीव अभिहस्तांतरण पद्धतीने हे अभिहस्तांतरण होण्यासाठी शासनाने वरील कार्यवाही केलेली आहे. या अधिनियमाचा वापर करण्याच्या आणि कर्तव्य पार पाडण्याच्या प्रयोजनासाठी जिल्हा उपनिबंधक यांची सक्षम प्राधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे.त्याबाबतची अधिसूचना गृहनिर्माण विभाग क्रमांक माहस-2008/प्र.क्र.24/भाग-2/दुवपू 25 फेब्रुवारी 2008 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

                विकासक कन्व्हेयन्स डीड करुन देण्यास टाळाटाळ करतात व जमिनीची मालकी ही आपल्याकडे ठेवतात, त्यामुळे इमारत जुनी झाल्यास, मोडकळीस आल्यास  त्या इमारतीचा पुर्नविकास करताना अडचण निर्माण होते व वाढीव एफ.एस.आय.चा फायदा संस्थेस मिळत नाही. 

                सहकार आयुक्त व निबंधक श्री.अनिल कवडे यांनी दि.1 ते 15 जानेवारी दरम्यान राज्यभरात मानीव अभिहस्तांतरणाबाबत विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत.याचा सहकारी गृहनिर्माण संस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गोपाळ मावळे, जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, रायगड- अलिबाग यांनी केले आहे.

 

00000

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक