“समग्र रायगड” कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न


अलिबाग, दि.17 (जिमाका):- जिल्ह्यातील प्राचीन लेणी, गड किल्ले, समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्ट्स, धरणे, बंदरे, धबधबे-गिरीस्थाने, अभयारण्य, ऐतिहासिक-धार्मिक स्थळे अशा पर्यटन स्थळांसोबतच उद्योग-कारखाने, स्थानिकांच्या सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण योजना, पर्यटकांसाठी मार्गदर्शक नकाशे, अशा उपयुक्त माहितीचे संकलन असलेल्या जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या समग्र रायगड - पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आज मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाले.

यावेळी राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत तसेच राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, रायगड जिल्हाधिकारी तथा प्रभारी कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हे कॉफी टेबल बुक तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप व मीडिया आर अँड डी चे श्री.दिलीप कवळी यांचे विशेष सहकार्य लाभले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक