दिलीप पाटील यांची एमपीएससीत “गरुडझेप”; “कर सहाय्यक” व “मंत्रालय लिपिक” पदाच्या पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण


 

अलिबाग, दि.29 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गरुडझेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील धोकवडे येथील सदस्य, माजी सैनिक दिलीप बाळकृष्ण पाटील हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या गट-क मधील कर सहाय्यक व मंत्रालय लिपिक या पदाच्या पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

श्री.दिलीप पाटील यांनी या यशाबद्दल जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे विशेष आभार मानून जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या गरुडझेप स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र व गरुडझेप ॲप या उपक्रमांचा लाभ घेण्याचे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवाहन केले.

या यशाकरिता जिल्हा प्रशासनातर्फे अलिबाग तहसिलदार श्रीमती मीनल दळवी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक