मौजे करंजखोल येथे दरडग्रस्त भागांची अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी केली पाहणी

 


अलिबाग, दि.29 (जिमाका):- मौजे करंजखोल येथे दरडग्रस्त भागांची अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी पाहणी केली. तिथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांशी दरडीच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांची चर्चा केली. या भेटीदरम्यान महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशीद, सरपंच श्री.उतेकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

उपस्थित ग्रामस्थांना अपर जिल्हाधिकारी श्री.यादव यांनी पावसाचा ऑरेंज अलर्ट किंवा रेड अलर्ट आला असल्यास तात्काळ गावातील काही तरुण मंडळींचा गट स्थापन करून संभाव्य दरडग्रस्त भागातील घरांची विभागणी करून दहा ते पंधरा घरांचा एक गट तयार करून तिथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी पथक तयार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिल व उपविभागीय कार्यालय यांच्याशी संपर्कात राहण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक