स्वयंसेवी संस्थांनी सुरु केलेल्या वृद्धाश्रमाची माहिती पाठविण्याचे आवाहन

 

अलिबाग,दि.30 (जिमाका):-  जिल्ह्यात वृद्धापकाळ चांगल्या प्रकारे घालविता यावे यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांमार्फत अनेक प्रकारचे वृद्धाश्रम चालविले जातात. जिल्ह्यात सुरु असलेले वृद्धाश्रम व तेथे कार्यरत असणारे कर्मचारी यांची माहिती एकत्रित करून शासनाला सादर करण्याबाबत समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी निर्देश दिले आहेत.

या वृद्धाश्रमांची माहिती तपशिलाप्रमाणे समाज कल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद यांच्याकडे तात्काळ सादर करावी. तसेच अधिक माहितीसाठी समाजकल्याण विभाग, रायगड यांच्या 02141-222079 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे समाजकल्याण अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.

समाज कल्याण विभागास माहिती कळविताना वृद्धाश्रमाचे पूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, संस्थेचे नोंदणी क्रमांक व दिनांक, वृद्धाश्रम जागेचा तपशील, वृद्ध प्रवेशित संख्या, प्रति वृद्ध, प्रति माह आकारण्यात येणारे शुल्क,वृद्धाश्रम मधील कार्यरत कर्मचाऱ्यांचे नाव, पदनाम, शिक्षण व नियुक्ती दिनांक ही माहिती आवश्यक आहे. ही माहिती राज्य मानवी हक्क आयोग यांना सादर करण्यात येणार आहे, त्यामुळे संबंधितांनी ही माहिती अचूक सादर करावी, असेही समाज कल्याण अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक