नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदाचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नगरपरिषदांच्या संकेतस्थळावर 01 जुलै रोजी होणार प्रसिध्द

 

अलिबाग,दि.30 (जिमाका):- राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि.09 जून 2022 आदेशान्वये राज्यातील माहे एप्रिल 2020 ते मार्च 2022 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या तसेच मुदत समाप्त होणाऱ्या व नवनिर्मित अशा एकूण 207 नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 2022 जाहीर करण्यात आला आहे.

या कार्यक्रमातील टप्पा क्र.7 नुसार कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडील अंतिम मान्यतेनंतर नगरपरिषदेच्या सदस्य पदांच्या आरक्षणाची (अधिसूचना कलम 10 नुसार) रहिवाश्यांच्या माहितीसाठी वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषदांच्या वेबसाईटवर शुक्रवार, दि.01 जुलै 2022 पर्यंत प्रसिध्द करण्याबाबत आदेशित केले आहे.

राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील आदेशातील कार्यक्रमानुसार विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, कोकण भवन यांच्याकडील दि.29 जून 2022 अन्वये रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या आरक्षणास अंतिम मान्यता देण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश विचारात घेवून रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सदस्य पदाकरीताचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सांकेतीक स्थळावर तसेच नगरपरिषदांच्या सांकेतीक स्थळावर तसेच नोटीस बोर्डावर शुक्रवार, दि.01 जुलै 2022 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक